महिलांच्या आरोग्याशी संबंधित सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची योनी मार्गाची स्वच्छता. शरीर पूर्णपणे निरोगी ठेवण्यासाठी योनीमार्ग निरोगी असणे खूप गरजेचे आहे. योनी आणि प्रजनन मार्ग निरोगी ठेवण्यासाठी, महिलांचे गुप्तांग स्वच्छ आणि निरोगी असणे सर्वात महत्वाचे आहे. योनी हा स्त्रियांच्या सर्वात संवेदनशील अवयवांपैकी एक आहे. त्यामुळे त्याकडे थोडेसा निष्काळजीपणाही महिलांना जड जाऊ शकतो. योनीमार्गाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने महिलांना नंतर अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. महिलांनी दररोज आंघोळ करण्याइतकंच त्यांच्या योनीमार्गाच्या आरोग्याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

बऱ्याच जणी आपल्या योनी मार्गाला सुगंधित करण्यासाठी विविध उत्पादनं वापरतात. मागच्या काही वर्षात योनीमार्ग साफ करणाऱ्या महिलांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण तज्ज्ञ सांगतात योनी मार्गाची स्वच्छता करण्यासाठी काहीही वापरण्याची गरज नाही. योनी मार्गाची रोगप्रतिकार शक्ती ही नैसर्गिकरित्या सांभाळली जाते. यामध्ये चांगले आणि वाईट असे दोन बॅक्टेरिया असतात. हे एकमेकांच्या मदतीने योनी मार्गाचे आरोग्य सांभाळतात. त्यामुळे यासाठी कोणतेही अनैसर्गिक प्रयत्न करणे चुकीचे ठरते.

Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
Shortage of public toilets in Pune city
वानवा.. स्वच्छतागृहांची
Comprehensive sanitation campaign begins in slums in Thane
ठाण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीमेला सुरूवात
bmc to rehabilitate fisherwomen in tardeo
मासळी विक्रेत्या महिलांचे पुनर्वसन होणार ? पालिका अधिकाऱ्यांची मासळी विक्रेत्या महिलांसह बैठकीत चर्चा
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक

योनी म्हणजे स्त्रियांच्या शरीराचा खाजगी आणि महत्त्वाचा भाग. स्त्रियांनी आपल्या खाजगी भागाची नियमित स्वच्छता राखणं गरजेचं असतं. योनी हा एक अतिशय संवेदनशील भाग आहे आणि रासायनिक साबण वापरल्याने योनीची pH पातळी बिघडू शकते. खराब पीएचमुळे योनी मार्गाचे संतुलन बिघडून चिडचिड सारख्या समस्या उद्भवतात. शरीराचे प्रत्येक अवयव स्वच्छ केले तरीही प्रायव्हेट पार्टची जागा कशी स्वच्छ करावी याबाबत महिलांच्या मनात असंख्य प्रश्न असतात. प्रायव्हेट पार्टची जागा नेमकी कशी स्वच्छ करावी? याबाबत प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अर्पणा हरितवाल, यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे.

(हे ही वाचा : १०० ग्रॅम मखाण्यामध्ये किती पौष्टिकता असते? दररोज मुठभर खाणे चांगले? आहारतज्ज्ञ सांगतात की… )

योनी मार्गाची स्वच्छता कशी करावी?

या नाजूक भागाची स्वच्छता राखण्याकरिता साध्या पाण्याने हा भाग धुवून घ्यावा.

योनीमार्गाच्या आता पाणीही जाणार नाही याची काळजी घ्या.

योनी साफ करताना योनीच्या आतील भागात कोणत्याही गोष्टीचा वापर करू नये.

पॅन्टी नियमितपणे स्वच्छ धुतलेल्याच घालाव्यात. 

पाळीच्या काळात आपला प्रायवेट पार्ट खूप ओला असतो. शौचालयात गेल्यानंतर किंवा पाण्याचा वापर करूनही प्रायवेट पार्टचा भाग कोरडा करत नाहीत. त्यामुळे त्याभागात ओलावा आणखी वाढतो. ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच,टॉयलेटमध्ये गेल्यावर किंवा पाण्याचा वापर केल्यानंतर खासगी भाग टिशू पेपरच्या सहाय्याने पूर्णपणे सुकवून त्यानंतर पॅड वापरा.

योनीमार्गाचा भाग किती नाजूक असतो याची जाणीव सर्वांनाच आहे. म्हणूनच मासिक पाळीत कॉटन पॅन्टीज निवडणे आवश्यक आहे.

अधिक वेळ एकाच सॅनिटरी पॅडचा वापर करणं तुम्ही टाळलं पाहिजे. बराच वेळ एकाच सॅनिटरी पॅडचा वापर केल्यास संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. 

योनी मार्गाजवळ कोणतीही पावडर किंवा तेल लावू नये. यामुळे त्या भागाला मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. यामुळे बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता असते. तसेच परफ्यूम मारणे देखील चुकीचे आहे. योनी मार्ग पाण्याने स्वच्छ करणे हा उत्तम पर्याय आहे.

व्हजायनामध्ये नैसर्गिकरित्या हा भाग स्वच्छ ठेवणारे चांगले बॅक्टेरीया कार्यरत असतात. त्यामुळे आपण सतत व्हजायना धुतली तर ते बॅक्टेरीया नाहीसे होतात आणि त्यामुळे व्हजायना साफ न राहता त्याठिकाणी इन्फेक्शन होऊ शकतात. त्यामुळे साध्या पाण्याने व्हजायना दिवसातून एखादवेळी धुणे ठिक आहे, पण सतत शॉवरने, कपड्याने किंवा आणखी कोणत्या गोष्टीने व्हजायना साफ करण्याची आवश्यकता नाही.

स्वच्छतेसाठी व्हजायनल वॉशची गरज आहे का?

अनेक महिला व्हजायनल वॉशचा वापर करतात. योनीचा भाग स्वच्छ करण्यास हे मदत करते असे त्यांना वाटते. व्हजायनाची स्वच्छता राखणे आवश्यक असते. व्हजायना स्वच्छ असेल तर महिलांना खाज, दुर्गंधी, इरिटेशन आणि रॅशेस अशा समस्यांचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे व्हजायना स्वच्छ करणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी व्हजायनल वॉशच वापरले पाहिजे असे नाही. खरं तर योनीची स्वच्छता बाहेरूनच करणे योग्य असते आणि तेही केवळ पाण्याने स्वच्छ केले पाहिजे. यासाठी कोणत्या उत्पादनांचा वापर करु नये, असे डाॅक्टर सांगतात.

Story img Loader