“मी गेले पाच दिवस मीठ अजिबात खात नाहीए आणि मला इतका छान वाटतंय” रिया आनंदाने सांगत होती. “पहिले तीन दिवस खूप अवघड गेलं, पण आता सवय झाली” नवरात्रीच्या उपवासामध्ये प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ वर्ज्य करावेत या विचारातून पांढरे मीठ पूर्ण बंद करण्याचा निर्णय अनेकजण घेतात . सैंधव मीठ किंवा तत्सम मिठाचा वापर केला जातो त्यानिमित्ताने मीठ आणि त्याचा आहारात असणारा उपयोग याबद्दल थोडसं लिहावसं वाटलं…

आहारातील चव हा महत्वाचा विषय आणि त्यासाठी ‘चवीपुरतं मीठ’ हा नित्यनियमाने वापरला जाणारा वाक्प्रचार. नेहमीचे पदार्थ करताना आपण मिठाचा वापर करतोच, पण अनेकजण जेवणात पुरेसं मीठ असूनदेखील वरून थोडं मीठ घेतातच. नेहमीच्या जेवणात कमी मीठ वापरताना पापड, लोणचं खारट चटणी, खारेदाणे यासारखे पदार्थ आहारातील मिठाचे प्रमाण आपोआप वाढवतात.

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Neena Gupta says she was not allowed to carry homemade dhaniya powder
Why Spices Are Not Allowed On Flights: घरी बनवलेले मसाले विमान प्रवासात घेऊन जाऊ शकतो का? वाचा, नीना गुप्ता यांचा अनुभव आणि तज्ज्ञांचे मत…
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर

मीठ म्हणजे सोडियम क्लोराइड! मिठामध्ये ४०% सोडियम आणि ६०% क्लोराइड असतं. सोडियम आपल्या शरीरातील द्रव पदार्थांचा योग्य संतुलन राखण्यासाठी मदत करतं. २.३ ग्रॅम इतकेच सोडियमचे प्रमाण शरीराला आवश्यक होते, असे यापूर्वी मानले जायचे. आता १.५ ग्रॅम हे आवश्यक मिठाचे प्रमाण आहे, अशी मान्यता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्ती व्यायाम करतात किंवा खेळाडू यांना दिवसभरातील मिठाची आवश्यकता पूर्ण न झाल्यास अतिरिक्त मिठाची आवश्यकता भासू शकते. मिठाची आवश्यकता ही तुमच्या व्यायाम करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते आणि खेळाडूंसाठी मिठाचे प्रमाण अधिक असू शकते.

हेही वाचा… Health Special: स्तनामधील गाठी कॅन्सरच्याच असतात का?

अनेकदा मिठामुळे रक्तदाब वाढण्याचे प्रमाण जास्त असते किंवा मीठ जास्त खाल्ल्यामुळे वजन कमी होत नाही किंवा एका प्रकारे शरीराला सूज येते असे अनेक प्रकार आपण पाहतो. तर हा मिठाचा मुद्दा नक्की काय आहे? सगळ्यात पहिली गोष्ट मीठ आपल्या शरीराला आवश्यक आहे का? नक्कीच आवश्यक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे काय तर आपण आहारामध्ये ज्या प्रकारचे मीठ वापरतो किंवा आहारात ज्या प्रकारच्या मिठाचा समावेश करतो त्यावर आपल्या शरीराला होणारे फायदे किंवा त्याचं होणारं नुकसान अवलंबून असतं. मिठाचे आपल्या शरीराला विशेषतः हृदयाला अनेक फायदे देखील होऊ शकतात आणि त्याचप्रमाणे मिठाचे तोटेदेखील होऊ शकतात. तुम्हाला कमी रक्तदाबाचा आहार करायचा असेल तर आहारातील मिठाचे प्रमाण कमी करणे अत्यंत जादुई परिणाम दाखवू शकते.

हेही वाचा… Health Special: गरोदरपण आणि मानसिक आरोग्याच्या समस्या

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ‘रेडी टू इट’ म्हणजेच तत्काळ बनवण्यासाठीचे पदार्थ आणणार असू किंवा फ्रोजन म्हणजे गोठवलेले पदार्थ आणणार असू तर त्याच्यामध्ये कायमच मिठाचे प्रमाण जास्त असते. जास्तीत जास्त अन्नप्रक्रिया केलेले अन्नपदार्थ हे ७५% हून अधिक मिठाने तयार केलेले असतात त्यामुळे आहारातील मिठाचे प्रमाण योग्य प्रमाणात राखणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरतो. आपण चिप्स, स्प्रेड्स किंवा खारवलेल्या तेलबिया हे पदार्थ खाताना आपोआप मीठ अतिरिक्त प्रमाणात घेतले जाते .

मिठाचे विविध प्रकार आढळतात

१. कोशर सॉल्ट: आयोडीनचे अत्यल्प प्रमाणात असणारे हे टेबल सॉल्ट अनेकदा मांसाहारी पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते. अनेक प्रसिद्ध शेफ हे नियमितपणे वापरतात.

२. सी ग्रेस: आहारामध्ये अत्यंत नियमितपणे वापरला जाणारा असा मिठाचा हा दुसरा प्रकार. सगळ्यात जास्त आर्द्रता असणारे हे मीठ अत्यंत कल्पक पद्धतीने तयार केले जाते. मिठाचे मोठे खडे असणारे हे मीठ ‘खडे मीठ’ म्हणूनही ओळखले जाते. हिरव्या भाज्या किंवा सलाड किंवा सूपमध्ये अथवा पास्ता तयार करताना हे खडे मीठ आवर्जून वापरले जाते.

३. समुद्री मीठ: समुद्री मीठ हे सगळ्या प्रकारच्या आहारपद्धतीमध्ये वापरण्याजोगे मीठ आहे . सगळ्यात खारट असणाऱ्या या मिठात (अर्थातच ) सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते, त्याशिवाय त्यात इतर अनेक खनिजेदेखील असतात. समुद्री मीठ तुम्हाला खडे मीठ किंवा अत्यंत बारीक मीठ अशा स्वरूपातदेखील उपलब्ध आहेत.

४ काळं मीठ: काळं मीठ हे समुद्री लाव्हारसापासून तयार होते. शरीरातील चयापचय क्रिया पूर्ववत करण्यासाठी आणि पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी काळ्या मीठाचे पाणी अत्यंत उपयुक्त आहे.

५. गंधमय / फ्लेवर्ड सॉल्ट: दक्षिण आशियाई डाळींमध्ये आणि भाज्यांच्या कढईमध्ये आवर्जून वापरले जाणारे हे मीठ, याला थाई जिंजर मीठ असेदेखील म्हटले जाते . हे मीठ नूडल्स आणि मासे तयार करण्यासाठी विशेषतः वापरले जाते.

६. स्मोक सॉल्ट: अनेकदा बांबूच्या लाकडांमध्ये प्रक्रिया केल्या जाणाऱ्या या मीठाला बांबू मीठ असे देखील म्हटले जाते. विविध प्रकारच्या सॅलड्समध्ये या मिठाचा वापर आवर्जून केला जातो.

७. हवाईयन सी सॉल्ट: अत्यंत कमी आर्द्रता असणारे हे मीठ हे समुद्री लाव्हापासून तयार होते. यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. आशियाई देशांमध्ये ग्रील्ड मांसाहारी पदार्थ करण्यासाठी हवाईयन सी सॉल्ट वापरले जाते.

८. हिमालयन पिंक सॉल्ट: म्हणजेच हिमालयातील गुलाबी मीठ हे भारतीय आहारामध्ये सर्रास वापरले जाते. पारंपरिक आहारामध्ये वापरले जाणारे मीठ पुन्हा एकदा स्वयंपाक घरात दिसू लागले आहे. ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा ज्यांना वजनाकडे लक्ष ठेवायचे आहे त्यांनी आहारात हिमालय गुलाबी मिठाचा समावेश आवर्जून करावा. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी आवर्जून हे मीठ आहारात वापरावे.