Varun Dhawan Switching Black Coffee : बॉलीवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) हा फिटनेसप्रेमी आहे. ही गोष्ट त्याच्या जिममधील समर्पणावरून (डेडिकेशन) अगदी सहज दिसून येते. पण, तो फक्त व्यायाम करण्यावर लक्ष देत नाही, तर स्वतःच्या आहाराबाबतदेखील जागरूक आहे. तर याचबद्दल सांगताना प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या शोमध्ये अभिनेता वरूण धवनने सांगितले की, त्याने सकाळी ब्लॅक कॉफी सोडून ब्लॉन्ड रोस्ट्स (blonde roasts) कॉफी पिण्यास सुरुवात केली. कारण – आतड्यासाठी हे पेय चांगले आहे.

या पेयाचा नियमित आहारात समावेश करण्यासाठी कोणते मार्ग आहेत?

तर हे जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संवाद साधला. चेन्नई येथील द क्लेफ्ट अँड क्रॅनिओफेशियल सेंटर आणि श्री बालाजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या रजिस्टर डायटिशियन (आहारतज्ज्ञ) दीपलक्ष्मी म्हणाल्या की, ब्लॉन्ड रोस्ट्स कॉफी हे पेय आतड्यांसाठी चांगले असू शकते. पण, हा दावा व्यक्तिनिष्ठ असू शकतो आणि वैयक्तिक सहनशीलता आणि पद्धतींवर आधारित बदलूसुद्धा शकतो.

ब्लॉन्ड रोस्ट्स हा कॉफीचा एक प्रकार आहे, जो हलका भाजला जातो. पण, परिणामी मध्यम किंवा गडद भाजलेल्या कॉफीच्या प्रकारापेक्षा याची चव सौम्य असते. त्यांचा भाजण्याचा वेळ कमी असल्यामुळे डार्क रोस्ट्स करण्यापेक्षा (भाजण्यापेक्षा) त्याची नैसर्गिक आम्लता जास्त असते. या आंबटपणामुळे संवेदनशील व्यक्तींना अस्वस्थता निर्माण होऊ शकते. पण, इतरांसाठी ते योग्यसुद्धा असू शकते; असे आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी म्हणाल्या आहेत.

हेही वाचा…Nutritional Powerhouses For Liver : क्रूसीफेरस भाज्या म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? यकृतासाठी होतो मोठा फायदा; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात…

आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांच्या मते, ब्लॉन्ड रोस्ट्समध्ये डार्कर रोअस्ट्सपेक्षा किंचित जास्त कॅफीन असते, जे पोटात जळजळ होण्याची शक्यता असलेल्यांसाठी चिंतेची बाब ठरू शकते. कारण कॅफिन ॲसिड उत्पादनास उत्तेजन देऊ शकते. या कॉफीचे सेवन करताना जिभेवर हलके वाटू शकते, पण आतड्याच्या आरोग्यासाठी तिची उपयुक्तता वैयक्तिक पचनसंवेदनशीलता, ती कशी तयार केली जाते किंवा वापरली जाते यावरसुद्धा अवलंबून असते.

ब्लॉन्ड रोस्ट्स कॉफी म्हणजे काय?

ब्लॉन्ड रोस्ट्स कॉफी ही हलकी भाजली जाते, ज्यामुळे ती बीन्सचा मूळ स्वाद, आम्ल, फायदेशीर संयुगे यांसह अनेक नैसर्गिक वैशिष्ट्ये टिकवून ठेवण्यास मदत करते आणि मध्यम किंवा डार्क रोस्ट्स करण्यापेक्षा (भाजण्यापेक्षा) स्मूथ फिनिशसह चमकदार आणि हलकी चव देते. हलकी भाजण्याची प्रक्रिया क्लोरोजेनिक ॲसिड, पॉवरफुल अँटिऑक्सिडंट्स सुरक्षित ठेवते, जे फ्री रॅडिकल्स निष्प्रभ करण्यास मदत करून ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात आणि सेल्युलर नुकसान टाळतात, जे सामान्यत: डार्क रोस्ट (भाजल्यामुळे) केल्यामुळे कमी होऊ शकतात, ज्यामुळे ब्लॉन्ड रोस्ट्सचे आरोग्य फायदे जास्त आहेत; असे आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले आहे.

तुम्ही ब्लॉन्ड रोस्ट्स तुमच्या नियमित आहारात कशी समाविष्ट करू शकता?

आतडे कशी प्रतिक्रिया देतात हे पाहण्यासाठी रोज एक कप ब्लॉन्ड रोस्ट्स कॉफी पिण्यास सुरुवात करा, असे आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांनी सुचवले आहे. विशेषत: संवेदनशील पोट असलेल्यांसाठी जेवणाबरोबर ब्लॉन्ड रोस्ट्स कॉफी प्यायल्याने आम्लता आणि पोटात जळजळ होण्याची शक्यता कमी होते.

ब्लॉन्ड रोस्ट कॉफीचे काही फायदे आहेत. जसे की, अँटिऑक्सिडंट्स टिकवून ठेवणे. पण, ती प्रत्येकाच्या आतडयासाठी फायदेशीर असू शकत नाही. त्याचा आंबटपणा, कॅफिनच्या पातळीसाठी वैयक्तिक सहनशीलता महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आहारात त्याचा समावेश करण्यासाठी सावधगिरीने सेवन करणे आणि वैयक्तिक प्राधान्यांनुसार तयारीच्या पद्धतींचा प्रयोग करणे आवश्यक आहे; असे आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी म्हणाल्या आहेत.

Story img Loader