Varun Dhawan on black coffee: बॉलीवूडचा अभिनेता वरुण धवन याने त्याच्या आगामी चित्रपट ‘बेबी जॉन’च्या प्रमोशनदरम्यान, ब्लॅक कॉफी आणि गट हेल्थवर (आतड्यांचे आरोग्य) चर्चा केली. रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये वरुणने खुलासा केला की, त्याने पोट रिकामे असताना ब्लॅक कॉफी पिणे बंद केले. कारण- त्याला गट हेल्थसंबंधीच्या अनेक समस्या होत्या.
“जर तुम्ही सकाळी उठून फक्त ब्लॅक कॉफी प्यायला सुरुवात केली आणि जर तुम्हाला गट हेल्थशी संबंधित समस्या नसतील तरी तुम्हाला त्या समस्या सुरू होऊ शकतात,” असे वरुणने म्हटले.
या विधानावर ‘लाँगेव्हिटी बायोहॅकर’ (longevity biohacker) प्रशांत देसाईने टीका केली, आणि त्याचे मत इन्स्टाग्रामवर मांडले. प्रशांतने वरुणच्या विधानाचा प्रतिवाद करीत म्हटले, “अरे वरुण, खरंच? हे खरं नाही. मी १५ वर्षांपासून सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पीत आहे. मला कधीच कोणतीही समस्या आली नाही.”
व्यक्तीनुसार गट हेल्थ वेगवेगळं असतं, असं प्रशांत देसाईंनी स्पष्ट केलं. “प्रत्येकाचं आतड्यांचं आरोग्य वेगळं असतं, जसं तुमचं फिंगरप्रिंट. प्रत्येकालाच आतड्याच्या आरोग्यासंबंधित समस्या होतील, हे काही खरं नाही. वरुण धवनला कदाचित ॲसिडिटी होती,” असं त्यांनी पुढे म्हटलं.
हेही वाचा… सनस्क्रीन लावताच डोळ्यांमध्ये जळजळ होते? मग तज्ज्ञांनी सांगितलेला ‘हा’ सल्ला लक्षात ठेवा
या प्रतिक्रियेनंतर वरुणने आदरपूर्वक प्रत्युत्तर दिले, “हे अगदी खरं आहे की, त्याचा माझ्यावर परिणाम झाला. पण मला आनंद आहे की, त्याचा तुमच्यावर परिणाम झाला नाही आणि तुम्ही निरोगी आणि फिट आहात. मी सांगितलं होतं, ‘एकच उपाय सर्वांसाठी काम करत नाही.’ मला आनंद आहे की, तुम्ही मला एक उदाहरण समजून लोकांना शिकवू शकता, सर. पण कृपया मलाही काही टिप्स द्या. मला नेहमीच तज्ज्ञांकडून शिकायला आवडतं.”
याविषयी यथार्थ हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा येथील न्यूट्रिशन आणि हेल्थ विभागाच्या प्रमुख डॉ. किरण सोनी म्हणाल्या की, रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी प्यायल्याने पोटातील ॲसिडचे उत्पादन वाढू शकते; ज्यामुळे अस्वस्थता वाटू शकते, जसे की :
- ॲसिड रिफ्लक्स
- ब्लोटिंग
- अपचन
तथापि, त्या म्हणाल्या की हे प्रभाव सर्वांवर सारखे होत नाहीत आणि ते प्रत्येकाच्या आतड्याच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असते. ब्लॅक कॉफी योग्य प्रमाणात प्यायल्यास यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते; पण रिकाम्या पोटी प्यायल्यास संवेदनशील व्यक्तींमध्ये गॅस्ट्रायटिस किंवा ॲसिड रिफ्लक्स वाढू शकतो.
हेही वाचा… दररोज चालायला तर जाताय; पण कॅलरीज बर्न होत नाहीयेत! मग फॉलो करा तज्ज्ञांच्या ‘या’ ९ टिप्स…
े
रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणे कोणी टाळावे?
लोकांनी सकाळी उठल्यावर ब्लॅक कॉफी पिणे टाळावे अशा परिस्थिती खालीलप्रमाणे :
- ॲसिड रिफ्लक्स किंवा GERD
- गॅस्ट्रायटिस किंवा अल्सर
- इरेटेबल बाऊल सिंड्रोम (IBS)
त्याशिवाय गरोदर महिला, हृदयाच्या समस्यांसह असलेले लोक आणि जे कॅफिनबाबत संवेदनशील आहेत, त्यांनी त्यांचे कॉफीचे सेवन कमी करावे, असे डॉ. सोनी म्हणाल्या.
महत्त्वाचे मुद्दे
वैयक्तिक संवेदनशीलता: ब्लॅक कॉफी सेवन करण्याची लोकांची सहनशक्ती वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्या शरीराचे ऐका.
रिकाम्या पोटी टाळा : हा धोका कमी करण्यासाठी कॉफी कोणत्या तरी पदार्थाबरोबर प्या किंवा रिकाम्या पोटी पिण्याऐवजी दिवसभरात नंतर प्या.
संयम महत्त्वाचा: दररोज एक कप ब्लॅक कॉफी यकृताच्या आरोग्यासाठी चांगली असू शकते; पण ती काळजीपूर्वक पिणे महत्त्वाचे आहे.