श्रावणाचं आणि भाज्यांचं वेगळं नातं आहे. बाजारात हिरव्यागार भाज्यांचे गंध आणि त्याच्या चवीचा देखील गंध दरवळत असतो. याच पोषक शाकाहारी भाज्यांबद्दल थोडंसं.
अळू
पालेभाज्यांमध्ये अळू म्हटलं की त्यासोबत मक्याचं कणीस, लाल भात असं एक मिश्रण आपल्या डोळ्यासमोर येतं. त्यावर थोडे दही एकत्र केलं की त्याची चव वाढते. तर मुळात लोह भरपूर असणारी अळूची भाजी रक्त वाढवणारी, ताकद वाढवणारी आहे. अळूच्या भाजीची पाने आणि देठ या दोन्हीचा उपयोग आहारात करावा. अळूच्या पानांचा रस आणि जिरेपूड असे मिश्रण पित्त असणारे व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त असते. अळूची भाजी करताना त्याच्यामध्ये चिंच गूळ तसेच दाणे आणि दही असं मिश्रण तयार केलं जातं. मुळात अळूच्या भाजीमध्ये कर्बोदके संतुलन राखण्यासाठी आणि प्रथिन तसेच आवश्यक स्निग्ध पदार्थांचे योग्य परिणाम साधून यावेत म्हणून अळूच्या भाजीचं एकंदरच पूर्ण रेसिपी ही पोषक रेसिपी आहे.
आणखी वाचा: डाएट जीआय म्हणजे काय कमी जीआय असलेले पदार्थ कोणते
अंबाडी
ही पालेभाजी अत्यंत चविष्ट आहे विशेषतः त्यात असणाऱ्या पोषक तत्त्वांमुळे. आहारातील या भाजीचे विशेष महत्व आहे. तसेच जीवनसत्व क आणि जीवनसत्व यांचे मुबलक प्रमाण असल्यामुळे अंबाडीची भाजी त्वचेच्या विकारांवर डोळ्याच्या विकारांवर आणि रक्ताचा विकारांवर अत्यंत उपयुक्त असते. मात्र भाजी बऱ्यापैकी उष्ण असल्यामुळे ज्यांना खोकल्याचा त्रास आहे त्यांनी ही भाजी खाणे टाळावे.
आणखी वाचा: Health Special: ‘हा’ आहे हॅपी डाएटिंगचा फंडा
कोथिंबीर
श्रावणात भरपूर कोथिंबीर असलेली बाजारात दिसते. कोथिंबिरीचा जास्तीत जास्त वापर करून खाद्यपदार्थांची चव तर वाढतेच शिवाय आहारातील पोषणमूल्य देखील वाढते. खरंतर सगळ्याच ऋतूंमध्ये आपल्याकडे उपलब्ध असते मात्र श्रावणात. उपलब्ध असणारी कोथिंबीर गर्द हिरवी आणि चविष्ट असते. अंगावर पित्त येतं त्यावेळेला कोथिंबीर सारखा उपाय नाही कोथिंबिरीचा रस त्याचा चोथा किंवा कोथिंबीर वडी या कोणत्याही प्रकारांमध्ये कोथिंबीर अत्यंत उपयुक्त आहे. शरीरातील उष्णता कमी करणे ताप कमी करणे तसेच कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाल्यास त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कोथिंबीर अत्यंत उपयुक्त आहे. बेसन आणि कोथिंबीर यांचे एकत्र मिश्रण करून केलेली कोथिंबीर वडी ही आहारामध्ये विशेषतः श्रावण महिन्यामध्ये नियमितपणे खाल्ल्यास उत्तम प्रमाणात ऊर्जा मिळते स्नायू बळकट होतात आणि त्वचा देखील सुंदर होते
चाकवत
पालेभाज्यांमध्ये आयुर्वेदात सर्वोत्कृष्ट मानली जाणारी चाकवत ही एक भाजी आहे. खरंतर ज्यांना ताप किंवा ज्यांचा मेटाबोलिझम कमी आहे ज्यांना कृमी किंवा जंत होतात किंवा आतड्याची ताकद कमी आहे त्यांच्यासाठी चाकवतासारखी भाजी नाही. मसालेदार पदार्थांबरोबर ही पातळ पालेभाजी तयार केल्यामुळे त्यातील उग्रपणा कमी होतो. आंबट नसलेल्या ताकातील चाकवताची पालेभाजी ही खायला उत्तम ! मात्र चाकवताचा ज्यूस कधीही पिऊ नये.
करटोळी
तोंडली सारखेच दिसणारी हलकी काटेरी असणारी अशी कर्ट्ल्याची भाजी या ऋतूमध्ये मिळते. चवीला हलकीशी तिखट पण अत्यंत स्वादिष्ट असणारी ही भाजी चातुर्मासामध्ये धार्मिक महत्त्व म्हणून आवर्जून खाल्ली जाते. मेटाबोलिझम वाढवते त्याशिवाय यात असणारे उत्तम प्रकारचे तंतुमय पदार्थ जीवनसत्व आणि खनिजे याच्यामुळे शरीराला उत्तम प्रकारचे ऊर्जा आणि पोषण मिळते.
श्रावण घेवडा
श्रावणातली सगळ्यात महत्त्वाची भाजी म्हणजे श्रावण घेवडा. वातवर्धक आणि पित्तशामक असणारा श्रावण घेवडा जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पोटाचे विकार असतील तर उत्तम आहे ज्यांना पोट साफ होत नाही किंवा खूप जास्त लघवीला होतं त्यांना देखील श्रावण घेवडा अत्यंत उपयुक्त आहे. यात असणारे झिंक आणि मॅग्नेशियमचे प्रमाण शरीरातील रक्ताची पातळी योग्य प्रमाणात राखण्यात मदत करते तसेच ज्यांना कृमींचा त्रास आहे त्यांच्यासाठी श्रावण घेवडा अत्यंत उपयुक्त आहे
शेवगा
शेवग्याच्या शेंगा बद्दल तर आपण ऐकलंच असेल पण शेवग्याचा पाला देखील श्रावणात मोठ्या प्रमाणात मिळतो. लाल शेवगा हा अधिक औषधी आहे. मेटाबोलिझम कमी होणे, अपचन होणे, खूप जास्त जेवण जेवणे, वातविकार होणे या सगळ्या विकारांमध्ये शेवग्याचा पाला अत्यंत उपयुक्त आहेत. ज्यांना उचकी लागते त्यांना शेवग्याच्या पाला प्यायलाने पटकन गुण येतो. व्यायामानंतर धाप लागणे किंवा थोडेसे चालल्यानंतर खूप जास्त धाप लागणे अशा प्रकारे विकार असणाऱ्यांना शेवगा अत्यंत उपयुक्त आहे. ताप बरं झाल्यानंतर भूक पूर्ववत व्हावी यासाठी शेवग्याची भाजी अत्यंत उपयुक्त आहे .