अर्धवट झोप हे व्हर्टिगो (Vertigo) होण्यास कारणीभूत ठरू शकते, हे नुकत्याच झालेल्या एका संशोधनात उघड झाले. या अभ्यासातून समोर आले की, अपुरी झोप किंवा चांगली झोप न होणे ही व्हर्टिगोची लक्षणे दर्शवतात.

“स्लीप डिस्टर्बन्सेस ॲण्ड व्हर्टिगो: ए बायडायरेक्शनल रिलेशनशिप” या नावाचा एक अभ्यास ‘जर्नल ऑफ वेस्टिब्युलर रिसर्च’मध्ये प्रकाशित झाला. ज्यानुसार ज्या रुग्णांना को-मोर्बिड कार्डिओमेटाबॉलिक आजार ( co-morbid cardiometabolic diseases) आहेत त्यांच्यामध्ये अपुऱ्या झोपेचा व्हर्टिगोच्या परिणामाबरोबर संबंध दिसून आला.

Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
neck fat be causing breathing problems
तुमच्या मानेच्या चरबीमुळे श्वासोच्छ्वास घेण्यात अडथळे येऊ शकतात? तज्ज्ञ काय सांगतात…
Naturopathic Medical Treatment know Ayurvedic Herbal Natural remedies at home
औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
kites on Makar Sankranti
मकरसंक्रांतीला पतंग उडवितांना कुठल्या दुर्घटना घडतात माहिती आहे का?

या अभ्यासात असे म्हटले आहे की, अपुरी झोप आणि व्हर्टिगो यांच्यात बायडायरेक्शनल रिलेशनशिप दर्शवणारे पुरावे आहेत. दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार, डॉ पीएन रेन्जेन यांच्या मते, हा संबंध दर्शवणारी यंत्रणा (mechanisms) पूर्णपणे समजलेली नाही, परंतु असे गृहीत धरले जाते की, झोपेच्या कमतरतेमुळे व्हेस्टिब्युलर सिस्टीमवर (vestibular system) परिणाम होतो, जे संतुलन आणि स्पेशिअल ओरिएंटशन (spatial orientation) राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. झोप न लागणे आणि चक्कर येणे यासंबंधात नेमक्या कोणत्या यंत्रणा आहेत हे शोधण्यासाठी आणखी संशोधनाची आवश्यकता आहे.

व्हर्टिगो (Vertigo) चक्कर येण्याचा विशेष प्रकार आहे. ज्यामध्ये तु्म्ही स्थिर असला तरी तुमचं डोकं गरगरत असल्याची खोटी जाणीव होते. तुम्हाला व्हर्टिगो आहे का, हे ओळखण्यासाठी काही महत्त्वाची लक्षणे आहेत का हे तपासा. जसे की, गरगरणे किंवा चक्कर येणे हे व्हर्टिगोचे प्राथमिक लक्षण आहे. ही संवेदना सौम्य किंवा तीव्र असू शकते आणि जेव्हा तुम्ही हालचाल करता किंवा डोके हलवता तेव्हा जाणवू शकते. व्हर्टिगोच्या लक्षणांमध्ये अनेकदा मळमळण्याची भावनादेखील निर्माण होऊ शकते आणि गंभीर प्रकरणांमध्ये एखाद्याला उलट्या होऊ शकतात. व्हर्टिगो असलेल्या व्यक्तींना अशा वेळी स्वत:ला बॅलन्स करताना अडचण येऊ शकते, ज्यामुळे त्यांना अस्थिरता जाणवू शकते किंवा ते अडखळू (unsteadiness or stumbling) शकतात. व्हर्टिगोच्या बर्‍याच प्रकरणांमध्ये, डोळ्यांच्या अनैच्छिक हालचाली होतात, ज्याला नायस्टागमस ( nystagmus occur) म्हणतात. या डोळ्यांच्या हालचाली जलद, धक्कादायक किंवा अगदी लयबद्ध असू शकतात. मेनिरे रोग सारख्या (Ménière’s disease) व्हर्टिगोच्या काही प्रकारांमुळे एखाद्याची ऐकण्याची क्षमता कमी होणे, टिनिटस (कानात आवाज येतो) किंवा कानावर परिणाम होतो, ज्यामुळे कान बंद असल्याची भावना येऊ शकते.

हेही वाचा – सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मेथीचे पाणी का प्यावे? काय सांगतात आहारतज्ज्ञ, जाणून घ्या…

व्हर्टिंगो आणि चक्कर येणे हे कार्डिओमेटाबॉलिक आजार, अपुरी झोप, चिंता आणि नैराश्याशी कसे संबंधित आहे?

व्हर्टिगो आणि चक्कर येणे अनेक अंगभूत स्थितींशी संबंधित असू शकते, ज्यात कार्डिओमेटाबॉलिक आजार (Cardiometabolic diseases), अपुरी झोप, चिंता आणि नैराश्य यांचा समावेश आहे. उच्च रक्तदाब आणि एथेरोस्क्लेरोसिससारखे( atherosclerosis) कार्डिओमेटाबॉलिक आजार कानाच्या आतील रक्त प्रवाहामध्ये व्यत्यय आणू शकतात किंवा वेस्टिब्युलर सिस्टीमच्या कार्यावर परिणाम करू शकतात, ज्यामुळे व्हर्टिगो आणि चक्कर येऊ शकते. याव्यतिरिक्त, मधुमेह आणि उच्च कोलेस्टेरॉलसारख्या परिस्थितीमुळे रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंचे ( nerves) नुकसान होऊ शकते, जे योग्य बॅलन्स आणि स्पेशिअल ओरिएंटशनसाठी आधार देते.

स्लीप एपनिया, निद्रानाश आणि झोपेची कमतरता यासह अपुरी झोप हे व्हर्टिगो आणि चक्कर येण्याच्या वाढत्या जोखमेशी संबंधित आहे. चांगल्या झोपेची कमतरता मेंदूचे संतुलन आणि स्पेशिअल परसेप्शन( spatial perception) नियंत्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते, ज्यामुळे या लक्षणांमध्ये भर पडते.

चिंता आणि नैराश्य हे मनोवैज्ञानिक घटक (psychological factors) आहेत जे व्हेस्टिब्युलर सिस्टीमवरदेखील परिणाम करू शकतात आणि व्हर्टिगो आणि चक्कर येणे सुरू होऊ शकते किंवा वाढू शकते. भावनिक ताण आणि मनःस्थिती विकारांमुळे (mood disorders ) स्नायूंवर ताण (muscle tension) वाढू शकतो, न्यूरोट्रान्समीटरची पातळी बदलू शकते आणि सेन्सरी इनपुटसाठी ( sensory input) वाढलेली सेन्सटीव्हिटी, हे सर्व चक्कर येण्याच्या जाणिवेवर (perception of dizziness) प्रभाव टाकू शकते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, व्हर्टिगो, चक्कर येणे आणि या परिस्थितींमधील संबंध क्लिष्ट असून त्यामध्ये अनेक घटक महत्त्वाचे आहेत.

हेही वाचा – सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मेथीचे पाणी का प्यावे? काय सांगतात आहारतज्ज्ञ, जाणून घ्या…

चिंतेमुळे चक्कर येते का?

व्हर्टिगोच्या लक्षणे दिसण्यामध्ये किंवा वाढण्यासाठी चिंता (anxiety) भर टाकू शकते. चिंतेमुळे थेट चक्कर येऊ शकत नाही, परंतु चिंतेचे शारीरिक आणि मानसिक परिणाम चक्कर येणे आणि असंतुलन या संवेदना उत्तेजित करू शकतात किंवा तीव्र करू शकतात.

जेव्हा एखादी व्यक्ती चिंता अनुभवते तेव्हा त्यांचे शरीर ॲड्रेनालाइनसारखे तणाव संप्रेरक (stress hormones ) बाहेर सोडते. जे संतुलन आणि स्पेशिअल ओरिएंटशनसाठी जबाबदार असलेल्या व्हेस्टिब्युलरसह विविध शारीरिक प्रणालींवरवर परिणाम करू शकते. यामुळे हालचालींची वाढती संवेदनशीलता आणि शरीराच्या स्थितीत बदल होऊ शकतो, परिणामी व्हर्टिगोची भावना निर्माण होते. शिवाय, चिंतेमुळे स्नायूंचा ताण आणि हायपरव्हेंटिलेशन होऊ शकते, ज्यामुळे मेंदूला ऑक्सिजन आणि रक्तप्रवाहात व्यत्यय येऊ शकतो. या शारीरिक प्रतिक्रियांमुळे चक्कर येणे आणि हलके डोके दुखणे वाढू शकते.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की चिंतेमुळे होणारा व्हर्टिगो (anxiety-induced vertigo) हा मानसिक आणि शारीरिक घटकांमधील एक क्लिष्ट परस्पर क्रिया (complex interaction) आहे. तुम्हाला सतत किंवा गंभीर चक्कर आल्याची लक्षणे आढळल्यास, त्याचे मूळ कारणे निश्चित करण्यासाठी आणि योग्य उपचारांसाठी एखाद्या आरोग्यसेवा व्यावसायिकाशी, जसे की डॉक्टर किंवा मानसिक आरोग्यतज्ज्ञाशी सल्लामसलत करण्याची शिफारस केली जाते.

हेही वाचा – बहुतांश भारतीय कोलेस्ट्रॉल, डायबेटीजसह ‘या’ आजारांनी आहेत ग्रस्त; ICMRच्या अभ्यासामध्ये मोठा खुलासा 

चिंतेचा सामना करताना रात्रीची चांगली झोप घेणे आव्हानात्मक असू शकते, परंतु असे काही उपाय आहेत, जे चांगल्या झोपेसाठी प्रोत्साहन देण्यास आणि आठ तासांच्या शांत झोपेची शक्यता सुधारण्यास मदत करू शकतात.

  • झोपण्याआधी आरामशीर दिनचर्या तयार करा, जेणेकरून तुमच्या शरीराला आणि मनाला सूचित करावे लागेल की आता झोपण्याची वेळ झाली आहे. यामध्ये पुस्तक वाचणे, उबदार आंघोळ करणे किंवा दीर्घ श्वास घेणे किंवा ध्यान करणे, विश्रांतीतंत्रांचा सराव करणे, यांसारख्या गोष्टींचा समावेश असू शकतो.
  • तुमची बेडरूम थंड ठेवा, थोडासा अंधार करा आणि तिथे शांतता ठेवून झोपण्यासाठी योग्य वातावरण तयार करा.
  • कोणतेही झोप मोडणारे आवाज किंवा लाइटसह संपर्क टाळण्यासाठी इअरप्लग, आय मास्क किंवा व्हाइट नॉइज (white noise machines) मशीन वापरण्याचा विचार करा.
  • कोणत्याही स्क्रीनच्या संपर्कात येण्यावर मर्यादा घाला.
  • आपल्या दैनंदिन दिनचर्येत तणाव व्यवस्थापनतंत्रांचा (stress management techniques) समावेश करा.
  • कॅफिन, निकोटिन आणि अल्कोहोलचा वापर कमी करा किंवा बंद करा, कारण हे पदार्थ झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतात.
  • झोपेच्या वेळापत्रकात सातत्य ठेवा.

झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि आदर्श वेळा काय आहेत?

चांगल्या झोपेला प्रोत्साहन देण्यासाठी, झोपण्यापूर्वी काही गोष्टी आणि पदार्थ टाळणे महत्त्वाचे आहे.

  • झोपेच्या किमान सहा तास आधी कॉफी, चहा आणि एनर्जी ड्रिंक्स यांसारखी कॅफिनयुक्त पेये घेणे टाळा.
  • Stimulants झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतात आणि झोप येणे कठीण करू शकतात.
  • जेवण (heavy meals ) आणि मसालेदार पदार्थ टाळा, झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी स्मार्टफोन, टॅब्लेट आणि कॉम्प्युटर यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे टाळा.
  • स्क्रीनद्वारे उत्सर्जित होणारा निळा प्रकाश झोपेचे नियमन करणाऱ्या हार्मोन मेलाटोनिनच्या निर्मितीमध्ये व्यत्यय आणू शकतो.
  • नियमित व्यायाम झोपेसाठी फायदेशीर असला तरी, झोपेच्या अगदी काही वेळ आधी जोरदार व्यायाम केल्याने शरीराला चालना मिळते आणि आराम करणे कठीण होते.

Story img Loader