Vicky Kaushal confesses using reverse psychology on Katrina Kaif: कॉफी विथ करणच्या एपिसोडमध्ये, विकी कौशलने कतरिना कैफवर ‘रिव्हर्स सायकोलॉजी’ वापरत असल्याची कबुली दिली. कियारा व विकी कौशलने आपल्या जोडीदारांच्या काही सवयींबाबत केलेले काही खुलासे केल्याने हा एपिसोड चांगलाच चर्चेत आला होता. गप्पांदरम्यान करण जोहरने विकी कौशलला तू तुझ्या मनाप्रमाणे वागायला कतरिनाला कसं तयार करतोस अशा आशयाचा प्रश्न केला होता. ज्यावर विकीने उत्तर देताना, “मला जे हवंय ते तिने मान्य करायला मला हवं असेल तर मला ती काय म्हणते हे पूर्णपणे मान्य करावं लागतं. मग ती कुठेतरी असा पण विचार करते की तू जे म्हणतोयस ते पण थोडं बरोबर वाटतंय.” एकीकडे हा मुद्दा विकी आपल्या जोडीदाराला किती ओळखतो हे दाखवणारा असला तरी अशा प्रकारची वागणूक ही कितपत योग्य आहे व त्याचा नातेसंबंधांवर काय परिणाम होऊ शकतो हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे.
डॉ. पवना एस, सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ, नातेसंबंध तज्ज्ञ आणि सेक्सोलॉजिस्ट, यांनी इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना ‘रिव्हर्स सायकोलॉजी’ची व्याख्या सांगितली. त्या म्हणतात, जिथे व्यक्ती इतरांना त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध कृती करण्यास प्रोत्साहित करतात. विविध ठिकाणच्या संदर्भांकडे पाहिल्यास हे लक्षात येते की मन वळवण्याचा थेट प्रयत्न झाल्यास नैसर्गिकरित्या विरोध होण्याची शक्यता असते पण ‘रिव्हर्स सायकोलॉजी’ अशावेळी अनपेक्षित परिणाम देऊ शकते.
मन वळवण्याच्याच पद्धतींमधला हा एक प्रकार प्रकार आहे. यामध्ये ज्या टार्गेटला त्याच्या मनाविरुद्ध वागण्यासाठी तयार करायचे आहे त्याला ‘तू निर्णय घेतोय्स’ हे भासवून देणे महत्त्वाचे असते. अगदी पालकांपासून ते मार्केटिंग कंपन्यांपर्यंत अनेक ठिकाणी याचा वापर केला जातो. ही वादग्रस्त पद्धत नातेसंबंध व सामाजिक संबंध जपताना मानसिक फसवणुकीच्या सीमा हाताळू शकते का याविषयी अजूनही प्रश्न आहे, असे डॉ. पवना म्हणतात.
‘रिव्हर्स सायकोलॉजी’ नात्यात कोणत्या प्रकारची भूमिका बजावते?
नातेसंबंधांमध्ये, ‘रिव्हर्स सायकोलॉजी’ चा वापर दुधारी तलवारीप्रमाणे असू शकतो. जोडीदाराला पर्यायी दृष्टीकोन विचारात घेण्यास प्रवृत्त करणे हे चांगल्या हेतूने वापरलेले तंत्र असले तरी त्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतो आणि कालांतराने विश्वास कमी होऊ शकतो.
जोडीदाराच्या वर्तनात फेरफार करण्यासाठी उलट मानसशास्त्र वापरणे हे फसवे मानले जाऊ शकते, तसेच यामुळे एकमेकांच्या मताचा आदर करण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. निरोगी नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता आणि मुक्त संवाद महत्त्वाचा असल्याने या नीतीच्या नैतिक बाजूंचा विचार व्हायला हवा,
अगदी काही वेळा संघर्ष टाळण्यासाठी हे अल्पकालीन धोरण म्हणून काम करू शकते, परंतु समस्या सोडवण्यासाठी किंवा दीर्घकालीन उत्तरासाठी त्याची संभाषण व समजूतदारीच महत्त्वाची ठरू शकते.
अशा रणनीतींवर जास्त अवलंबून राहिल्याने संवाद बिघडू शकतो आणि नातेसंबंधांमधील खरेपणा कमी होऊ शकते. निरोगी संवाद, सहानुभूती आणि तडजोड हे भांडण सोडवण्यासाठीचे खरे व योग्य मार्ग आहेत.
रिव्हर्स सायकॉलॉजी ऐवजी वापरू शकता ‘हे’ पर्याय?
प्रभावी संभाषण: गरजा आणि चिंता थेट व्यक्त करण्यासाठी मुक्त आणि प्रामाणिक संवाद करा.
ऐकणे: तुमच्या जोडीदाराचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी सहानुभूतीपूर्वक ऐकण्याचे कौशल्य जोपासा.
तडजोड आणि सहयोग: तडजोड करून, टीमवर्कला प्रोत्साहन देऊन परस्पर फायदेशीर उपाय शोधा.
हे ही वाचा<< कानाच्या पाळीवरील ‘ही’ खूण असते हृदय व रक्तवाहिन्यांच्या विकाराचं चिन्ह? हृदयरोग तज्ज्ञांनी दिली स्पष्ट माहिती
तसेच संघर्षांवर मात करण्यासाठी आणि संवाद सुधारण्यासाठी व्यावसायिक मार्गदर्शन सुद्धा आपण मिळवू शकता. अनेक कपल थेरपीजमध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली जाते. मुळातच कोणत्याही नात्यात विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे आहे. नातेसंबंधात प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेचा पाया तयार करण्यासाठी काम करा.