Vinesh Phogat Paris Olympics 2024 : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या कुस्ती स्पर्धेतून ५० किलो वजनी गट) अपात्र ठरविण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे तिचे वजन. वजन मर्यादेपेक्षा जास्त असल्याने विनेश अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरली. ऑलिम्पिक नियमानुसार विनेशचे वजन मर्यादित वजनापेक्षा १०० ग्रॅम जास्त होते. अशा स्थितीत कुठल्याही कुस्तीपटूला कुठल्याही वजनी गटात फक्त १०० ग्रॅम जास्त वजनाची परवानगी दिली जाते. पण विनेशच वजन यापेक्षा जास्त होते. यावर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननेही आपल्या निवेदनात म्हटले की, रात्रभर सर्वोत्तम प्रयत्न करूनही तिचे वजन सकाळी ५० किलोपेक्षा जास्तच होते.

पण, अशा प्रकारे एका रात्रीत दोन ते तीन किलो वजन कमी होऊ शकते का? असे केल्यास शरीरावर काय परिणाम होतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिल्लीच्या महाराजा अग्रसेन हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. संजय गुप्ता यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली आहेत. डॉ. संजय गुप्ता यांच्या मते, रात्रभरात दोन ते तीन किलोग्रॅम वजन कमी करणे केवळ अशक्यच नाही, तर तसे करण्याचा प्रयत्न धोकादायकही आहे. त्यावर आणखी एक इंटर्नल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. मनजिता नाथ दास यांनी सहमती दर्शवीत म्हटले की, असे करणे शरीरासाठी घातक ठरू शकते.

triphala in excess is beneficial or harmful for health
जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
heart attack rising in yougsters
तरुण वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण का वाढतेय? याचा अपचनाशी काही संबंध आहे का?
Kolkata Rape Case
Kolkata Rape Case : “मुलीच्या वेदना आठवल्या तरी…”, कोलकाता प्रकरणातील पीडितेच्या आईची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या…
bombay hc impose fine of two lakhs to accused and victim while canceling the rape case
बलात्काराचा गुन्हा रद्द करताना आरोपी आणि पीडितेला प्रत्येकी दोन लाखांचा दंड; सैनिकांसाठी दंडाची रक्कम वापरण्याची सूचना
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
article about painless normal delivery method of painless childbirth
स्त्री आरोग्य : वेदनारहित बाळंतपणाचा पर्याय
significant reduction in infant mortality in the state
राज्यात बालमृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट!

Read More Health News : रोज आंघोळ करण्याची सवय बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांनी दिले धक्कादायक उत्तर वाचाच

एका रात्रीत २ ते ३ किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न केल्यास काय होईल? (Vinesh Phogat’s Weight-Loss Ordeal)

आपल्या शरीराचे वजन आपली हाडे, स्नायू व चरबी या घटकांवर आधारित असते. रात्रभरात इतके वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत धोकादायक आहे. कारण- असे करताना पाणी न पिणे, मीठ न खाणे अशा गोष्टी कराव्या लागतात. कार्बोहायड्रेट्स किंवा प्रथिने या गोष्टी तर दूरच आहेत. दरम्यान, बॉक्सर निखत जरीनलाही अशा परिस्थितीचा सामना करावा लागला होता. पण, विनेशसारख्या २९ वर्षांच्या कुस्तीपटूसाठी विशेषतः रात्रभर अशा प्रकारे वजन कमी करणे दुप्पट अवघड काम होते.

श्वास घेत असताना, काही काम करीत असताना व्यक्तीच्या शरीरातून पाण्यासह क्षार कमी होत असतात. अशा वेळी शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली आणि डिहायड्रेशनची समस्या जाणवली, तर ती स्थिती आरोग्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकते. यावेळी आरोग्य स्थिती अधिक गुंतागुतीची होऊ शकते. डॉ. दास यांनी सांगितले की, तुम्ही ॲथलीट असो वा नसो; पण अशा प्रकारे वजन करण्याची पद्धत वैद्यकीयदृष्ट्या कधीही सुचवली जात नाही.

डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले की, शरीरातील पाणी आणि कर्बोदकांच्या खालवलेल्या पातळीमुळे शरीर हायपोग्लायसेमियासारख्या स्थितीत जाऊ शकते. कारण- रक्तातील साखरेची पातळी ७० मिलिग्रॅम प्रति डेसिलिटर (mg/dl) च्या खाली जाते.

जेव्हा तुम्ही पटकन वजन कमी करण्यासाठी कॅलरीजचे सेवन कमी करता तेव्हा तुमच्या शरीरातील ग्लायकोजेनचे प्रमाण वेगाने कमी होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. विशेषत: जर तुम्ही पुरेशा प्रमाणात कर्बोदकांचे सेवन करीत नसाल; जे या खेळाडूंना करावे लागते.

हायपोग्लायसेमियाच्या लक्षणांमध्ये थरथरणे, घाम येणे, चक्कर येणे, गोंधळ उडणे व हृदयाचे ठोके जलद होणे यांसारख्या बाबींचा समावेश होतो. त्यात मूत्राशय निकामी होण्याचीही शक्यता असते, असेही डॉ. दास म्हणाले.

डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले की, आपला मेंदू ग्लुकोजशिवाय २-३ मिनिटांपेक्षा जास्त वेळ तग धरू शकत नाही. त्या दोन-तीन मिनिटांमुळे मेंदूचे गंभीर आणि कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. परंतु, त्यापलीकडेही तुमच्या मेंदूचे कायमस्वरूपीही गंभीर नुकसान होऊ शकते म्हणजे तुम्ही कोमातही जाऊ शकता.

उपचार न केल्यास गंभीर हायपोग्लायसेमियामुळे फेफरे, बेशुद्धी आणि मृत्यूदेखील होऊ शकतो.

दोन्ही डॉक्टरांनी अशा प्रकारे वजन कमी करण्याचा प्रयत्न न करण्याचा सल्ला दिला आहे. कारण- ते आरोग्यासाठी हानिकारकच नसून, प्राणघातकदेखील ठरू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.