Is Virat Kohli Diet Suitable For You: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, विराट कोहली हा आपल्या आक्रमक फलंदाजीशिवाय फिटनेससाठीही ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून उदयास येताना आपण तसं दिसायला हवं म्हणून फिटनेसवर काम करण्याचे ठरवल्याचा उलगडा विराट कोहलीने केला होता. फिटनेस राखण्यासाठी व्यायामच नव्हे तर आहारात सुद्धा अनेक बदल केल्याचे कोहलीने सांगितले आहे. कोहलीने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की त्याच्या आहारात तळलेले पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ यांचा समावेश अजिबात नसतो. माझ्यासाठी जीवनसत्वे, प्रथिने व पोषणसत्व पुरवणारा हा संतुलित आहार आहे हे प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकते असेही कोहली म्हणाला.

कोहलीने सांगितले की, “सुरुवातीला अशा प्रकारचे जेवण हे त्याच्यासाठी आव्हान होते, पण आता हाच आहार तो सलग सहा महिने दिवसातून तीन वेळा खाऊ शकतो. सवय हेच सगळ्या प्रश्नांवर उत्तर आहे. माझ्या आहारातील ९० टक्के अन्न वाफवलेले, उकडलेले आहे. ज्यात मसाल्याला जागा नाही फक्त मीठ, मिरपूड आणि लिंबाचा रस एवढेच फ्लेव्हर्स आहेत. मला चवीची पर्वा नाही. सॅलड्सवर ड्रेसिंग किंवा पॅन-ग्रील्ड करताना थोडे ऑलिव्ह ऑइल वापरले जाते प कोणत्याही प्रकारचे कालवण किंवा तर्री मी खात नाही. पण मी डाळींमध्ये मसूर, राजमा आणि चवळी टाळू शकत नाही, ते मला आवडतं.”

which food should not eat with curd
दह्याबरोबर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा आरोग्याला विपरीत परिणामांचा धोका
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
which oil is best for deep frying
तळलेले पदार्थ खाऊनही अजिबात वाढणार नाही वजन; तळताना ‘या’ तेलाचा करा वापर
Following PM Modi’s speech Akshay Kumar shares 4 key tips to help tackle rising obesity in India
“गेल्या अनेक वर्षांपासून मी हेच सांगतोय…”, मोदींनंतर आता खिलाडी अक्षयने सांगितल्या लठ्ठपणा कमी करण्यासाठी खास टिप्स
How To Make Dahi Mirchi dahi mirchi recipe in Marathi
झणझणीत दही मिरची; दोन भाकऱ्या जास्त खाल या दह्यातल्या मिरचीसोबत, ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Can eating papaya mangoes help you build muscle
पपई-आंबा खाल्ल्याने स्नायूंच्या निर्मितीसाठी मदत होऊ शकते का? तज्ज्ञांचे काय आहे मत…
PM Modi on obesity Cut oil in diet by 10 per cent
“आहारातून तेलाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करा”: लठ्ठपणा कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला! सामान्य भारतीयाला किती तेलाची आवश्यकता असते?
Nutrition Diet , Maharashtra School, Sweet Food ,
पोषण आहार बदल! साखर लोकांना मागा पण गोडधोड खाऊ घाला, अनुदान नाहीच

पण आहारातून तेल आणि चरबी पूर्णपणे टाळणे योग्य आहे का?

उषाकिरण सिसोदिया, नोंदणीकृत आहारतज्ज्ञ आणि क्लिनिकल पोषणतज्ज्ञ, नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “आहारातून तेल व फॅट्स टाळल्यानेच फायदा होतो का याचे काही ठोस उत्तर नाही. वाफवलेले व उकडलेले अन्न हे वैयक्तिक आवडीनुसार, पोषणाच्या गरजेनुसार आहारात समाविष्ट करायला हवे. सामान्यतः या पद्धतीने शिजवलेले अन्न हे फायदेशीर ठरू शकते कारण यामुळे पोषक सत्व टिकून राहण्यास मदत होते. मात्र तेल व फॅट्सचे सेवन पूर्णपणे बंद करणे आवश्यक नाही. भारतीय मसाल्यांमध्ये आढळणाऱ्या निरोगी फॅट्स आणि विविध चवींमुळे संतुलित आहार राखण्यास मदत होऊ शकतो. याऐवजी नेहमी संपूर्ण, प्रक्रिया न केलेल्या पदार्थांना प्राधान्य द्या.”

निरोगी फॅट्स आणि तेलांचे फायदे

ट्रान्स फॅट्स सारख्या अस्वास्थ्यकर चरबीचे सेवन मर्यादित करणे महत्वाचे असले तरी, तूप किंवा ऑलिव्ह ऑइल सारख्या काही निरोगी फॅट्सचा समावेश आहारात केल्याने आरोग्याला फायदे होऊ शकतात. समीना अन्सारी – वरिष्ठ आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ, केअर हॉस्पिटल्स, हाय-टेक सिटी, हैदराबाद यांनी सांगितले की, तुपात संयुग्मित लिनोलिक ऍसिड असते, जे जळजळ कमी करण्यास आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते, तर ऑलिव्ह ऑइलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

सिसोदिया यांनीही यावर सहमती दर्शवत सांगितले की, “तुमच्या आहारात तेल आणि तूप यांसारख्या आरोग्यदायी फॅट्सचा समावेश करणे आवश्यक आहे. ते ऊर्जा प्रदान करतात, पोषक द्रव्ये शोषण्यास मदत करतात आणि हार्मोन उत्पादन आणि सेल्युलर कार्यासाठी आवश्यक असतात. मात्र, ऑलिव्ह, तीळ, खोबरेल तेल आणि तूप यांसारख्या पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे अन्यथा यामुळे वजन वाढणे व हृदयाच्या संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.”

मसाला पूर्णपणे टाळायलाच हवा का?

संतुलित आहारासाठी ज्याप्रमाणे फॅट्स आणि तेलाची गरज असते, तसेच मसालेही तुमच्यासाठी वाईट नाहीत . खरं तर, यामुळे असंख्य आरोग्य फायदे मिळू शकतात. अनेकांना मसालेदार पदार्थांमुळे शरीराचे तापमान वाढण्याची, अ‍ॅसिडिटी व हार्टबर्न होण्याची चिंता असते. मात्र, प्रमाणात मसाल्यांचा वापर करून आणि इतर निरोगी पदार्थांसह एकूण आहार संतुलित करून, मसालेदार कालवण व भाज्या आहारासाठी स्वादिष्ट आणि पौष्टिक पर्याय असू शकतो. हळद, जिरे आणि धणे यांसारखे मसाले त्यांच्या दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जातात.

विराट कोहली डाएट

हे ही वाचा<< ८ महिन्यांच्या गरोदर टीव्ही अभिनेत्रीचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू! गरोदरपणात धोका का वाढतो व काय काळजी घ्यावी? 

सिसोदिया यांनी अन्सारी यांनी दिलेल्या माहितीबाबत सहमती दर्शवत सांगितले की जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर मसाले पूर्णपणे टाळणे आवश्यक नाही, परंतु मीठ, तेल आणि फॅट्स यांचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे.

Story img Loader