Virat Kohli Fitness, Diet and Workout Plan : जेव्हा फिटनेसची गोष्ट येते तेव्हा विराट कोहली हे नाव आपोआप डोळ्यांसमोर येतं. विराट कोहली हे नाव फक्त मुलींसाठीच नाही तर मुलांनाही वेड लावतं. त्याची मैदानावरील ऊर्जा, जोश आणि फिटनेस पाहून प्रत्येक जण चाट पडतो. नुकताच भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला, पण या पाकिस्तानविरुद्ध त्याने आपले शतकही पूर्ण केले. जिथे वयाच्या ३० मध्येच आपण हाडांच्या वेदना आणि लठ्ठपणा घेऊन बसलेले आहोत तिथे ३६ वर्षांचा विराट कोहली दोन मुलांचा बाबा आहे यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही, इतका फिट आणि यंग दिसतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जाणून घेऊया त्याच्या डाएट आणि फिटनेस प्लॅनची अशी रहस्ये आणि त्याच्या सवयी, ज्यामुळे तो सतत राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा चर्चेत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये विराट कोहलीने अनेक सवयी अंगीकारल्या आहेत, ज्यांनी त्याला जगातील सर्वात फीट खेळाडूंपैकी एक बनवले आहे. पण, त्याची फिटनेस पद्धत नेमकी कशामुळे इतकी प्रभावी बनते जाणून घेऊयात. MPT, Tone30 Pilates मधील फिटनेसतज्ज्ञ डॉ. वजल्ला श्रावणी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना सविस्तर माहिती दिली आहे. फिटनेसतज्ज्ञ डॉ. वजल्ला श्रावणी सांगतात, “तुम्ही ॲथलिट नसला तरीही कोहलीच्या फिटनेस दृष्टिकोनातून अनेक मौल्यवान धडे शिकायला हवेत. तुमच्या दैनंदिन वेळापत्रकात नियमित शारीरिक हालचाली आणि योग्य पोषण यांचा समावेश करा.”

‘या’ चार सवयी, ज्यामुळे यश त्याच्या पायाशी लोटांगण घालतं

सातत्य – द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत विराट सांगतो की, सातत्य सर्वात जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी माझे वर्कआउट कधीही चुकवू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. पुढे डॉ. श्रावणी स्पष्टपणे सांगतात की, यामध्ये उच्च-तीव्रता मध्यांतर वर्कआउट्स, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि फंक्शनल एक्सरसाइज समाविष्ट आहेत.

शिस्तबद्ध पोषण : पोषणासाठी त्याचा शिस्तबद्ध दृष्टिकोन लक्षणीय आहे; तो संतुलित, पोषक समृद्ध आहाराचे पालन करतो, जो त्याच्या वर्कआउट्सला फायदेशीर ठरतो. फिटनेससाठी हायड्रेशन अत्यंत आवश्यक आहे. यावेळी विराटनेही मुलाखतीत “माझ्या दैनंदिन दिनक्रमात हायड्रेटेड राहणे, माझ्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करणारे पदार्थ मी खातो,” असं सांगितलं.

मानसिक तंदुरुस्ती : कोहली मानसिक तंदुरुस्तीवर जास्त भर देतो. “इच्छुक ॲथलिट्ससाठी माझ्या टिप्स आहेत की होय, शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आपल्या अंतर्मनाशी सातत्याने संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे.”

ध्यान : indianexpress.com सोबतच्या दुसऱ्या एका मुलाखतीत विराट कोहलीने नमूद केले होते की, तो नियमित कसरत, ध्यान करतो. डॉ. श्रावणी सांगतात, हेच सातत्य त्याला या स्तरावर घेऊन जाते.

तुम्ही व्यावसायिक ॲथलिट नसले तरीही कोहलीच्या फिटनेस टीप्स फॉलो करून तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. सातत्यपूर्ण व्यायामाचा अवलंब करणे-मग ते कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग असो. तुमच्या दैनंदिन वेळापत्रकात नियमित शारीरिक हालचालींचा समावेश करा. पोषण हा आणखी महत्त्वाचा भाग आहे. संपूर्ण अन्न, प्रथिने, फळे आणि भाज्यांनी समृद्ध संतुलित आहाराची निवड केल्याने ऊर्जेची पातळी वाढू शकते आणि सर्वांगीण विकास होऊ शकतो.” सोबतच मानसिक आरोग्यासाठी ध्यान करणेही महत्त्वाचे आहे. शेवटी विराट कोहलीने दाखवलेले सातत्य आपल्याला आठवण करून देते की, दीर्घकालीन आरोग्य शाश्वत ठेवण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी दैनंदिन सवयींवर लक्ष दिलं पाहिजे