Hair loss: केस गळणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सामान्य: प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरचे केस ठराविक प्रमाणात नियमितपणे गळत असतात. पुढे काही काळानंतर त्यांच्या जागी नवे केस येऊ लागतात. पण जेव्हा गळालेल्या केसांच्या जागी नव्या केसांचे उत्पादन होणे बंद होते, त्यावेळेस केस गळतीची समस्या सुरु झाली असे म्हटले जाते. भारतामधील असंख्य लोक या समस्येचा सामना करत आहेत. खराब लाइफस्टाइल, चुकीच्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश अशा अनेक कारणांमुळे केस गळतीची समस्या उद्भवते. व्हिटामिन बी १२ या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळेही केस गळायला लागतात असे म्हटले जाते.
व्हिटामिन बी १२ शरीरासाठी आवश्यक का असते?
मानवी त्वचेमध्ये लाखो सूक्ष्म छिद्रे असतात. यातील काही जागी छिद्रांमधून केस उगवतात. या सूक्ष्म छिद्रांना पोषण देण्याचे काम व्हिटामिन बी १२ करत असते. यामुळे केसांची वाढ होण्यास देखील मदत होते. हे व्हिटामिन मुबलक प्रमाणात असल्याने डोक्यावरची त्वचा निरोगी राहते. त्यासह टाळूचा भाग देखील मजबून बनतो. शरीरात व्हिटामिन बी १२ आवश्यक प्रमाणात असल्याने केस लांब, दाट आणि घनदाट बनतात.
व्हिटामिन बी १२ ची कमतरता असल्यावर काय होते?
केसांपर्यंत ऑक्सिजन पोहचण्यासाठी व्हिटामिन बी १२ ची मदत होत असते. याच्या सहाय्याने डोक्यातील लाल रक्तपेशींची निर्मिती होत असते. शरीरामध्ये या व्हिटामिनचे प्रमाण कमी असल्यास डोक्यापर्यंत कमी प्रमाणामध्ये ऑक्सिजन पोहचतो. यामुळे रक्तभिसरण प्रक्रियेवर देखील परिणाम होतो. पुढे यातून गळालेल्या केसांच्या जागी नवे केस उगवत नाही. या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे जास्त केस गळल्याने टक्कल पडू शकते.
आणखी वाचा – विश्लेषण : इन्फ्लुएंझा विषाणूला खरेच घाबरावे का? काय काळजी घ्यावी? जाणून घ्या
व्हिटामिन बी १२ चे प्रमुख स्त्रोत कोणते?
शरीरामध्ये व्हिटामिन बी १२ योग्य प्रमाणामध्ये असावे यासाठी आहारामध्ये दूध, पनीर, अंडी, मांस, मासे आणि काही हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. यांच्या नियमित सेवनामुळे केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होईल.