शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने, फायबर व कार्ब्स इत्यादींची गरज असते. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन बी-१२ किंवा कोबालामीन (Cobalamin) हे एक असे जीवनसत्त्व आहे की, जे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. शरीराला ताकद मिळण्यासाठी व्हिटॅमिन बी-१२ ची नितांत गरज असते. शरीरामध्ये व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता निर्माण झाल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. शरीरातील पेशींसाठी तसेच नसा आणि डीएनएसाठी विटामिन बी-१२ हा अत्यंत गरजेचा घटक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिटॅमिन बी-१२ किंवा कोबालामिन हा मानवी शरीराला विविध चयापचय प्रक्रियांसाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा पोषक घटक आहे. व्हिटॅमिन बी-१२ हा असा एक पोषक घटक आहे; जो तुमच्या नसा निरोगी ठेवणे, सामान्य मेंदूचे कार्य राखणे आणि डीएनए व लाल रक्तपेशी तयार करणे यांसाठी आवश्यक आहे. त्यामुळेच इतर जीवनसत्त्वांप्रमाणे व्हिटॅमिन बी-१२ देखील शरीरासाठी खूप महत्त्वाचा घटक समजला जातो. पण, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये महिलांमध्ये व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता दिसून येते. त्यामुळे महिलांमधील व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता कशी दूर करता येईल, याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजना सिंह यांनी माहिती दिली आहे.

डॉ. अंजना सिंह सांगतात, आजच्या धावपळीच्या जीवनात व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता ही लोकांमध्ये एक सामान्य समस्या बनत आहे. व्हिटॅमिन बी-१२ हे एक असे जीवनसत्त्व आहे; जे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. मात्र, त्याची कमतरता शरीरासाठी खूप हानिकारक आहे. व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे त्वचा, डोळ्यांच्या समस्यांसह न्यूरॉलॉजिकल आजार होतात. त्यामुळे या व्हिटॅमिनच्या कमतरतेच्या सर्व लक्षणांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, असे डाॅक्टर सांगतात.

स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणतात, व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरात लाल रक्तपेशींचे उत्पादन कमी होते; ज्यामुळे अशक्तपणाचा धोका वाढतो. व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे अनेक मोठ्या आजारांचा धोकाही वाढतो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे गर्भपात, बाळाचा अयोग्य विकास आणि जन्मादरम्यान होणाऱ्या समस्यांमुळे गर्भवती महिलांमधील समस्या अधिक वाढतात. ज्या स्त्रिया बाळाला दूध पाजतात, त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असू शकते.

बी-१२ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे लोकांना डिप्रेशनलाही सामोरे जावे लागू शकते. या व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यासाठी डॉक्टर व्हिटॅमिन बी-१२ सप्लिमेंट्सचा वापर करायला सांगू शकतात. महिलांना कधी कधी असे होते की, सकाळी उठल्यावर थकवा जाणवू लागतो. दिवसभर फक्त झोपूनच राहावे, असे वाटते. त्याचप्रमाणे हाता-पायांमध्ये मुंग्या येणे किंना सुन्न पडणे, धूसर दिसणे, खूप जास्त घाम येणे ही सर्व लक्षणे वास्तविकत: व्हिटॅमिन बी-१२ च्या कमतरतेमुळे जाणवत असतात.

व्हिटॅमिन्स हा सेंद्रिय संयुगांचा समूह आहे; ही व्हिटॅमिन्स मानवी शरीराच्या सामान्य वाढीसह पोषणासाठीही आवश्यक असतात. मासे हा विटामिन बी-१२ चा मुख्य स्रोत आहेत. त्याचप्रमाणे ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी-१२ असल्यामुळे ते खाणे फायदेशीर ठरु शकते.

मांस, मासे आणि दुग्धजन्य पदार्थ यांसारखे खाद्यपदार्थ या जीवनसत्त्वाचे प्रमुख नैसर्गिक स्रोत असल्याने, दररोज सुमारे ३ एमसीजी (गर्भवती किशोरवयीन आणि स्त्रियांना २.६ mcg आवश्यक आहे; तर स्तनपान करवणाऱ्या किशोरवयीन आणि स्त्रियांना २.८ mcg आवश्यक आहे) हे पदार्थ खाणं आवश्यक आहे. ज्या स्त्रिया जास्त प्रमाणात मांस किंवा मासे खात नाहीत, त्यांना दूध, दही, कॉटेज चीज, चीज व दही हे पर्याय उपयोगी पडू शकतात, असेही त्या सांगतात. परंतु, कोणत्याही पदार्थाचे सेवन करताना डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या, असेही त्यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vitamin b12 is an important nutrient needed by the human body why does vitamin b12 deficiency need to be addressed in women faster pdb
Show comments