Vitamin D Deficiency : व्हिटॅमिन डी शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. नुकतेच स्वीस न्युट्रिशन आणि हेल्थ फाउंडेशनच्या (Swiss Nutrition and Health Foundation) एका अभ्यासात व्हिटॅमिन डीची मात्रा आणि हृदयाशी संबंधित आजारांचा संबंध सांगितला आहे.
नामवंत हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन डी ग्लुकोजची मात्रा संतुलित करून आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत राहतात. हृदय हा स्नायुंचा एक महत्त्वाचा अवयव आहे.

दिल्लीच्या एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अपर्णा जस्वाल सांगतात, “व्हिटॅमिन डीची मात्रा संतुलित ठेवणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता दूर केली तर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो. यासाठी अधिक चाचण्यांची गरज आहे. या अभ्यासातून हृदयाशी संबंधित आजारांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. जर या अभ्यासातून अपेक्षित परिणाम समोर आले तर व्हिटॅमिन डी एक उपचार म्हणून चांगला पर्याय असू शकतो.”

Tips To Measure Your Blood Pressure
Tips To Measure Your Blood Pressure : रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत कोणती, हात कसा ठेवावा? अचूक रीडिंग टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ‘या’ टिप्स
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
Robotic Bariatric Surgery, Obesity, Robotic Bariatric,
‘रोबोटिक बॅरिएट्रिक’ शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणाला कात्री! अधिक अचूकपणे, कमी वेळेत होणाऱ्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या…

हेही वाचा : Binge Drinking : महिन्यातून एकदा दारूचे अतिसेवन केल्यामुळे स्नायूंच्या आरोग्यावर परिणाम होतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

व्हिटॅमिन डी हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले का आहे?

हार्वर्ड टी एच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थनुसार, व्हिटॅमिन डी शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करते. याशिवाय उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. शरीरातील अनेक अवयव आणि टिश्यूमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रोटिन्स असतात, जे या व्हिटॅमिन डीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की, व्हिटॅमिन डीची सीरम पातळी जास्त असणाऱ्या लोकांच्या तुलनेत कमी सीरम पातळी असणाऱ्या लोकांना हृदय आणि स्ट्रोकशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो; पण त्या बरोबरच या हार्वर्ड टी एच चान स्कूलने असेही सांगितले की, व्हिटॅमिन डीचे सेवन केल्यानंतरही हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी झालेला नाही.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्या आणि हृदयाशी संबंधित कार्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. पुण्याच्या भारती हॉस्पिटल येथील सर्जिकल सर्व्हिसचे संचालक आणि कार्डिॲक सर्जन डॉ. विजय नटराजन सांगतात, “रक्तदाब नियंत्रणावरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. व्हिटॅमिन डीच्या संतुलित मात्रेमुळे मधुमेह असलेल्या लोकांच्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे एकंदरीत विचार केला तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हृदय आणि रक्तवहिन्यांसंबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.
काही अभ्यासांतून असेही समोर आले आहे की, शरीरात व्हिटॅमिन डीची मात्रा कमी असेल तर शरीरात खराब कोलेस्ट्रॉलसुद्धा वाढते. व्हिटॅमिन डीची कमतरता आणि लठ्ठपणा यांच्यातील संबंध दर्शवणाऱ्या अभ्यासातून चांगल्या निरोगी जीवनशैलीसाठी हे योग्य नाही असे दिसून आले आहे. यामुळे व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.”

हेही वाचा : International Music Day : ‘म्युझिक थेरपी’ म्हणजे काय? या उपचाराच्या मदतीने मानसिक आजार दूर होऊ शकतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

विजय नटराजन पुढे सांगतात, “ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या ऑस्ट्रेलियन अभ्यासातून असे समोर आले की, व्हिटॅमिन डी हे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजार, हृदयविकाराचा झटका आणि अँजिओप्लास्टीसारख्या गोष्टी कमी करण्यास मदत करते. कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या किंवा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित औषधींचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हा परिणाम अधिक स्पष्टपणे दिसून येतो.”
नटराजन सांगतात, ‘डी-हेल्थ’ चाचणीतून असे समोर आले आहे की, व्हिटॅमिन डीच्या सेवनामुळे मोठ्या प्रमाणात हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो.”

आपल्याला किती व्हिटॅमिनची आवश्यकता असते?

व्हिटॅमिन डीची मात्रा ही प्रत्येकाच्या वयानुसार वेगवेगळी असते. व्हिटॅमिन डीची सामान्य मात्रा ३० ते ५० nmol/L असते. डॉ. नटराजन सांगतात, “दररोज व्यक्तीला ६०० IU व्हिटॅमिन डीची गरज असते.