दरवर्षी २५ जून हा दिवस “जागतिक कोड दिन” म्हणून पाळला जातो. कोड या विकाराबद्दल जनसामान्यांचे प्रबोधन करण्यासाठी आणि कोडाने ग्रस्त असलेल्यांना भेडसावणाऱ्या सामाजिक कलंकाची भीती घालविण्यासाठी आणि मानसिक आव्हानांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने पाळला जातो. जागतिक त्वचारोग दिन म्हणून २५ जूनची निवड ही सुप्रसिद्ध पॉपगायक मायकेल जॅक्सन याच्या स्मरणार्थ आहे. त्याला हा आजार झाला होता. त्याचा मृत्यू २५ जून २००९ रोजी झाला होता. चला तर आज आपण या आजाराबद्धल जाणून घेऊ.

कोड, ज्याला इंग्रजी मध्ये Vitiligo म्हटले जाते, या आजाराबद्दल जनसामान्यांत फार गैरसमज आहेत.

Symptoms and Treatment of Guillain-Barré Syndrome in Pune
Guillain-Barre Syndrome Pune: पुणेकरांना पिण्याच्या पाण्याबाबत पालिका आयुक्तांचं ‘हे’ आवाहन; जीबीएसचा उल्लेख करत म्हणाले…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
As Pune reports over 50 suspected cases of Guillain-Barré syndrome, doctors explain why cerebrospinal fluid examination is done
हाता-पायाला मुंग्या, अशक्तपणा… पुण्यात नव्या व्हायरसची एन्ट्री! काय आहे हा दुर्मीळ आजार? डॉक्टरांनी दिली माहिती…
Guillain Barre syndrome outbreak in Pune
Guillain Barre Syndrome :‘जीबीएस’ची रुग्णसंख्या ७३ वर; ३० जण आयसीयूमध्ये तर १४ जण व्हेंटिलेटरवर
Guillain Barre syndrome, contaminated water,
दूषित पाणी अथवा अन्नामुळे गुइलेन बॅरे सिंड्रोम! काळजी काय घ्यावी जाणून घ्या…
Hepatitis B vaccine , private hospitals, medical college
पुणे : ‘हिपॅटायटिस बी’ची लस मिळेना! खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांना सर्वाधिक समस्या
Guillain-Barré Syndrome
Guillain-Barre Syndrome : पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे रुग्ण वाढले, बाधितांमध्ये सर्वाधिक लहान मुले; वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : “एक दिवस तुमच्या सुसंस्कृतपणाचा पाढा…”, भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना थेट इशारा

कोड म्हणजे काय?

कोड हा एक त्वचेचा आजार आहे. यामध्ये आपल्या त्वचेतील रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशी (MELANOCYTES) नष्ट होतात व त्वचेवर सफेद रंगाचे डाग दिसू लागतात.

हा आजार कोणाला होऊ शकतो ?

हा आजार कोणालाही होऊ शकतो. शंभरात एखाद्याला (१%) हा आजार होतो. हा आजार काही प्रमाणात अनुवंशिक आहे, पण काही व्यक्तींमध्ये हा आजार घराण्यात कोणाला नसतानाही होऊ शकतो. कोडाचा आजार असणाऱ्यांपैकी बहुतेकांना या आजाराचा पहिला डाग हा लहानपणी किंवा ३० वर्षाच्या आत आलेला असतो.

या आजाराची कारणे काय?

स्वयंप्रतिरोध (Autoimmunity) – या आजारात आपलीच रोगप्रतिकार शक्ती आपल्या रंगाच्या पेशींविरुद्ध काम करते व रंगपेशींना नष्ट करते. हे होण्यामध्ये जनुकीय प्रभावही (Genetic Susceptibility) असतो. फार थोड्या व्यक्तींना हा आजार आपल्या नेहमीच्या वापरातील वस्तूंमुळेही होतो. उदा. प्लास्टिक चप्पल, प्लास्टिक चष्मा, घड्याळाचा पट्टा, अंडरवेअरचे इलास्टिक इ. अशावेळी हा आजार या वस्तूंचा जिथे संपर्क होतो त्याच ठिकाणी होतो. अशा वस्तूतील केमिकल्समुळे रंगपेशींना इजा होते व त्या नष्ट होतात.

हेही वाचा… Health Special: पावसाळ्यात खाता- पिताना काळजी घ्यावी? (उत्तरार्ध)

आणखी एक प्रकार काही जणांमध्ये पहायला मिळतो. त्याला Segmental Vitiligo म्हणतात. हा शरीराच्या एकाच बाजूला तेही थोड्या विशिष्ट भागापुरता मर्यादित रहातो. उदा. उजवा हात किंवा डावा पाय. क्वचित प्रसंगी ज्यांच्या रक्तामध्ये Thyroid या मानेकडे असणाऱ्या ग्रंथी विरुद्ध मारक शक्ती (Antibodies) तयार होते त्यांना देखील असे डाग येऊ शकतात.

कोड म्हणजे कुष्टरोग का?

हा मोठाच गैरसमज आहे. कोडामध्ये सफेद डाग सोडल्यास बाकी ती व्यक्ती निरोगी असते. कुष्ठरोग हा आजार जंतूंमुळे होतो व या आजारात अंगावर पांढुरके (एकदम सफेद नव्हेत) किंवा लालसर चट्टे येतात. या चटयांना सुन्नपणा असतो. कोड हा आजार संसर्गजन्य नाही तर कुष्ठरोग हा (जास्त प्रमाण असल्यास) संसर्गजन्य आहे.

कोडाचा आहाराशी काही संबंध आहे का?

आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये एखादी गोष्ट जास्त खाल्ल्याने किंवा आहारातून वगळल्यामुळे कोड होतात, असे आढळून आलेले नाही. दुध जास्त घेतल्यामुळे, दुध व मासे एकाच वेळी खाल्ल्याने कोड होतात, याला आधुनिक वैद्यकशास्त्रात तरी काही ठोस आधार नाही. आंबट खाद्यपदार्थ जसे आवळा, लिंबू , मोसंबी, संत्रे इ. टाळावे असे आयुर्वेद सांगतो व त्यात तथ्य आहे . यामध्ये क जीवनसत्व असते व ते जास्त प्रमाणात घेतल्यास त्वचेतील रंगद्रव्य तयार होण्याच्या प्रक्रियेत बाधा येऊ शकते. त्यामुळे असे पदार्थ कोड असणाऱ्यांनी माफक प्रमाणात खावेत.

हेही वाचा… जांभूळ रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मदत करते का? जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात …

रंगपेशींपासून रंगद्रव्य तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये जीवनसत्व ब १२ , ब ९ ( फॉलिक अ‍ॅसिड ) व जीवनसत्व ड यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. ब जीवनसत्व समूहातील ब १२ या जीवनसत्वाचा स्त्रोत हा पूर्णपणे मांसाहार व दुग्धजन्य पदार्थांमध्ये आहे. कोड असलेली व्यक्ती जर शाकाहारी असेल तर तिने दूध व अन्य दूधजन्य पदार्थाचे सेवन करावे. हल्ली बाजारात तयार शाकाहारी पदार्थ मिळतात ज्यामध्ये जीवनसत्व टाकून त्यांचे पोषणमूल्य वाढवलेले असते. (Fortified cereals) जीवनसत्व ब ९ म्हणजेच फॉलिक अ‍ॅसिड हे हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, अख्खे दाणे, (whole grains) ताजी फळे व फळांचे रस, मासे, अंडी, प्राण्यांचे यकृत, (Liver) या खाद्यपदार्थांत जास्त प्रमाणात असते; त्यांचे सेवन करावे. ड जीवनसत्व हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यामध्येही महत्त्वाची भूमिका बजावते.

अंडी, मासे, लाल मांस, यकृत,  कॉर्डलिव्हर ऑइल, अळंबी हे खाद्य पदार्थ ड जीवनसत्त्वाचा स्त्रोत आहेत. आपण खाल्लेल्या ड जीवनसत्वाचे सक्रिय ड जीवनसत्वात रूपांतर करण्याचे काम हे उन्हामुळे होत असल्याने दिवसातून कमीत कमी दहा मिनिटे सकाळी दहा ते चार यामधील ऊन घेणे आवश्यक आहे. पण एकूणच चौकस आहार ( Balanced diet) व ज्यामध्ये Beta- Carotene व Antioxidants जास्त आहेत (गाजर, टोमॅटो, फळे, फळ भाज्या, पालेभाज्या) असा आहार उत्तम.

कोड हा आजार अंगभर पसरतो का?

हाही एक गैरसमज आहे. फक्त ५ – १०% कोड असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसतो. बाकी ९०% रुग्णांमध्ये हा आजार शरीराच्या ठराविक भागात सीमित रहातो. अंगभर पसरलेल्यांचा आजार आपल्याला दिसतो. त्यामुळे आपला गैरसमज होतो की प्रत्येकाचे कोड अंगभर होते.

कोड पूर्णपणे बरा होतो का?

कोडावर जर लवकर उपचार सुरु केले व तो जास्त पसरलेला नसेल तर आधुनिक औषधोपचाराने तो बरा होऊ शकतो. काही जणांच्या बाबतीत त्याची वाढ थांबून काही डागांवर रंग परत येतो. काही जणांच्या बाबतीत हा आजार फक्त ओठ व बोटे, तळहात, तळपाय या ठिकाणी सीमित असतो (LIP TIP SYNDROME). या ठिकाणी केस नसल्यामुळे तिथे रंग पूर्णपणे परत येईलच असे नाही. (डागांमधील काळ्या केसांच्या मुळाशी रंगपेशी जिवंत असतात) अशा ठिकाणी शस्त्रक्रिया करावी लागू शकते. (क्रमशः)

Story img Loader