Wall Squats Benefits: दररोज सकाळी उठून केलेला व्यायाम वर्षानुवर्षे तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करतो असे आपणही अनेकदा ऐकले असेल. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की,नियमित व्यायाम आपल्या शरीराला अनके रोगांपासून दूर ठेवण्याचा मदत करू शकतो. अगदी हृदयासंबंधी विकार असो किंवा डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, अतिवजन असे त्रास. आज आपण उच्च रक्तदाब कमी करण्यासाठीचा प्रसिद्ध व तज्ज्ञांनी सुचवलेला व्यायाम जाणून घेणार आहोत. यासंदर्भात मेडिसिन एक्स्पर्ट डॉक्टर विजय ठक्कर यांनी केलेले मार्गदर्शन जाणून घेऊया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन या जर्नलमध्ये डॉक्टर विजय ठक्कर यांनी व्यायाम आणि उच्च रक्तदाब या बद्दल फरक स्पष्ट केला आहे. धावणे, पळणे,सायकलिंग करणे आणि पर्सनल ट्रेनिंग या सगळ्यांनी उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यातीलच एक व्यायामाचा प्रकार म्हणजे आय्सरोमेट्रीक व्यायाम वॉल स्क्वॉट (अर्धी उठाबशी).

आय्सरोमेट्रीक व्यायाम तुमच्या स्नायूंना मजबूत करण्याचे काम करते. वॉल स्क्वॉट म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊयात. हवेत मांडी घालून, पायांच्या आधारे उभं अर्धवट बसून राहून, दोन्ही हाथ वर करून केलेली अर्धी उठाबशी म्हणजेच वॉल स्क्वॉट.

हा व्यायाम करताना तुम्ही असं समजा कि तुम्ही एखाद्या अद्रुश्य खुर्चीवर बसलेले आहात. भिंतीला पाठमोरं तोंड करून. तुमच्या पायाची दिशा उजव्या बाजूला ठेवून तुम्हाला ही पोजिशन घ्यायची आहे . कोणतीही हालचाल न करता काही मिनिट उभं राहून मग पुन्हा खाली बसून उभे राहू शकता. तुमचे पाय आणि तुमच्या शरीरातील स्नायू तुमच्या पाय दुमडून बसण्याच्या कृतीला बॅलन्स करतात. आयसॉनिक एक्सरसाईज आपण कधीही, कुठेही आणि कोणत्याही वेळी करू शकतो ते सुद्धा कोणतेही व्यायामाचे साधन न वापरता.

१. वासोडिलेशन: जेव्हा अवयवातील स्नायू हालचाल न करता आकुंचन पावतात तेव्हा जवळपासच्या रक्तवाहिन्या संकुचित पावतात. ताण बाजूला होताच थांबलेले रक्त वेगाने वाहण्यासाठी रक्तवाहिन्या पसरतात. कालांतराने, या विस्तारामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

२. ग्लुकोज अपटेक :- स्नायू आणि अवयवांमध्ये ग्लुकोज शोषण्यासाठी इन्सुलिनची आवश्यकता असते. तर काही अभ्यासक सांगतात की
आयसोमेट्रिक व्यायामादरम्यान स्नायूंची उर्जा कमी होत असताना, स्नायू इंसुलिनची आवश्यकता नसताना रक्तप्रवाहातून साखर शोषून घेतात. स्नायूंमधील ही ऊर्जा कमी झाल्यामुळे रक्तातून साखर सहज शोषून घेण्याची त्यांची क्षमता वाढते ज्यामुळे रक्तातील साखर कमी होते आणि रक्तदाब कमी होतो.

तज्ज्ञांच्या मते हा व्यायाम तुम्ही दिवसात १६ मिनिट,आठवड्यातले ३ दिवस आणि काही पथ्य सांभाळत करू शकता. पाय हवेत दुमडून उभे राहणे हा व्यायाम किमान २ मिनिट करावा . तुम्ही तुमच्या सोयीनुसार वेळ कमी जास्त करू शकता. तुम्ही हा व्यायाम प्रकार भिंतीला टेकून अगदी सहजरित्या करू शकता. तुम्ही हि एक्सरसाईज १५० डिग्री सेल्सियस गुडघ्याच्या अँगलपासून हळूहळू ९० डिग्री सेल्सियस पर्यंत नेऊ शकता. या एक्सरसाईजच्या दरम्यान दीर्घ श्वास घ्यावा. पण एका श्वासात हा व्यायाम केल्यास रक्तदाब वाढू शकतो.

हेही वाचा :- आजी-आजोबांची प्यारवाली लव्ह स्टोरी! म्हातारपणीही एकमेकांना स्वयंपाकघरात करतायत मदत; एकदा पाहाच हा गोंडस व्हिडीओ 

आयसोमेट्रिक व्यायाम वॉल स्क्वॉट हा , ज्यांनी नुकतंच फिटनेस जर्नी चालू केली असेल त्यांनि हा व्यायाम करायला काहीच हरकत नाही आहे. नव्याने व्यायाम करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम व्यायाम ठरेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wall squats a surprising solution to lowering blood pressure asp
Show comments