दारू पिणे वाईट आहे आणि यात शंका नाही. त्याचे माहित असलेले हानिकारक प्रभाव असूनही, अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मध्यम प्रमाणातील मद्यपानाचे काही आरोग्य फायदे असू शकतात. पण, एका नवीन अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कदाचित तसे होणार नाही. मद्यसेवनाचे आरोग्यासाठी फायदे नाहीत उलट त्यामुळे तुमचा मृत्यूचा धाको वाढतो असे संशोधकांनी सांगितले आहे.

संशोधकांनी केले १०७ अभ्यासांचे पुनरावलोकन

व्हिक्टोरिया विद्यापीठातील कॅनेडियन इन्स्टिट्यूट फॉर सबस्टन्स यूज रिसर्चच्या संशोधकांच्या टीमने जानेवारी १९८० ते जुलै २०२१ दरम्यान प्रकाशित झालेल्या १०७ अभ्यासांचे पुनरावलोकन केले ज्यामध्ये ४.८ दशलक्ष सहभागी होते. टीमला असे आढळले की, ज्या मद्यपींनी ( बिअर, वाइन आणि दारू) इथेनॉलचे एक औंस पेक्षा कमी सेवन केले, त्यांच्या आयुर्मानात मद्यपान न करणाऱ्यांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली नाही.

Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Loksatta article Modern capital finance-values Retail loan without salvation
लेख: वाढत्या ‘विनातारण’ सूक्ष्मकर्जांची चिंता!
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

या अभ्यासाचे निष्कर्ष जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित झाले आहेत.

हेही वाचा : रात्रीच्या वेळी अचानक पायात क्रँप्स का येतात? ‘हे’ उपाय करा त्वरित मिळेल आराम

मध्यम प्रमाणात मद्यसेवानाचे आरोग्यास फायदे नाहीत

संशोधकांचे म्हणणे आहे की “मध्यम प्रमाणात मद्यसेवनामुळे आरोग्यास फायदे आहेत या संकल्पनेला कोणताही विज्ञानावर आधारित मजबूत पुरावा नाही.”

दीर्घआयुष्यी व्हायचंय?मग आजच दारू सोडा, जाणून घ्या काय सांगते संशोधन ( Freepik)
दीर्घआयुष्यी व्हायचंय?मग आजच दारू सोडा, जाणून घ्या काय सांगते संशोधन ( Freepik)

हेही वाचा – Diabetic Kidney: तुमच्या शरीरातील ही 5 लक्षणे दर्शवतात मधुमेही मूत्रपिंडाचा धोका

मध्यम प्रमाणात मद्यसेवन केले तरी वाढतो मृत्यूचा धोका

नवीन अभ्यासात असेही आढळून आले आहे की, दररोज एक औंस किंवा त्याहून अधिक मद्यपान करणाऱ्या महिलांसाठी आणि दररोज दीड औंस किंवा त्याहून अधिक दारू पिणाऱ्या महिलांसाठी “सर्व कारणांमुळे मृत्यू होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढला आहे”.

अभ्यास करताना संशोधकांनी मद्य सेवनाचा सर्व-कारण मृत्युदराशी संबंध या विषयावर सर्व उपलब्ध प्रकाशित अभ्यास वापरले. तथापी, आणखी अभ्यास आवश्यक आहे असे ते मानतात.