कधीकधी अचानक जास्त भूक लागने किंवा जास्त प्रमाणात खाणे ही सर्वसामान्य आणि सर्वांसोबत घडणारी गोष्ट आहे. परंतु जर तुम्ही नियमित योग्य पद्धतीने जेवण करत असाल आणि आणि तरीही तुमचे पोट भरत नसेल आणि तुम्हाला सतत काहीतरी खावंसं वाटत असेल, तर कदाचित तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते. कारण असं होणं म्हणजे तुमचे वजन जलद गतीने वाढणार वाढण्याचे ते संकेत आहेत. त्यामुळे सतत भूक लागण्यावर ती नियंत्रित करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा, तुम्हाला सतत लागणारी भूक ही वजन वाढण्यासह इतर आजारणाही निमंत्रण देण्याची शक्यता आहे.
शिवाय आजकाल लठ्ठपणा ही एक अतिशय गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे लोक आपलं वजन कसे वाढणार नाही याची खूप काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतात. शिवाय वाढत्या वजनामुळे केवळ शरीरच खराब दिसत नाही तर अनेक गंभीर समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे अनेकांना आपलं वजन कमी करण्याची इच्छा असते पण त्यांना भूक कंट्रोल करता येत नाही. यासाठीच आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल माहिती देणार आहोत की, जे खाल्ल्यानंतर भुक लागणे कमी होतेच शिवाय आणि वजन वाढण्याचा धोकाही कमी होतो. पोषणतज्ञ लवनीत बत्रा यांनी अशा ५ सुपरफूडबद्दल माहिती दिली आहे. जे खाल्ल्यानंतर जास्त भूक लागत नाही आणि लठ्ठपणाची समस्याही उद्भवत नाही. चला तर जाणून घेऊया त्या ५ सुपरफूड्सबद्दलची माहिती.
हेही वाचा- सेक्स करताना पायात गोळे येतायत? मोक्याच्या क्षणी येणाऱ्या Muscle क्रॅम्पवर उपाय काय?
वजन कमी करण्यासाठीचे ते ५ सुपरफूड्स –
बदाम –
लवनीत बत्रा सांगतात की, बदाम हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले सुपरफूड आहे. त्यात व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, हेल्दी फॅट, प्रथिने आणि फायबर असतात. एका अभ्यासात सिद्ध झाले आहे की, बदाम खाल्ल्याने भूक लागणं खूप कमी होते. तसंच त्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ई मुळे वजन वाढण्यास आळा बसतो, असंही लवनीत यांनी सांगितलं आहे.
नारळ –
हेही वाचा- सकाळी उठताच शिंका करतात हैराण? या समस्येपासून बचाव करण्याचे ५ उपाय जाणून घ्या
नारळ हे आपणाला सहज आणि कुठेही उपलब्ध होणारे फळ आहे. नारळात लॉरिक ऍसिड, कॅप्रोइक ऍसिड, कॅप्रिलिक ऍसिड असे अनेक घटक आढळतात. ज्यामुळे आपणाला पोट भरल्यासारखे वाटते. नारळाला जलद गतीने फॅट बर्न करणारे फळ मानले जाते.
ताक –
ताक हे प्रोबायोटिक पेय आहे. शरीराची तरलता राखण्यासाठी ताकापेक्षा चांगला पर्याय नाही. ताक प्यायल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. त्यामुळे आपोआप लठ्ठपणाला आळा बसतो.
मोड आलेले हरभरे –
हेही वाचा- हिवाळ्यात नेहमी थकल्यासारखं वाटतं का? तर आजपासून ‘हे’ पदार्थां खा आणि फ्रेश राहा
मोड आलेल्या हरभरामध्ये जास्त प्रथिने आढळतात. त्यामध्ये भूक कमी करणारे हार्मोन्स असतात. याशिवाय त्यात फॅट आणि कार्बोहायड्रेट्स खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे मोड आलेला हरभरा हा लठ्ठपणाचा शत्रू असल्याचे मानले जाते.
भाज्यांच्या रस –
भाज्यांच्या रस हा लठ्ठपणा मुळापासून दूर करतो. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर जास्त वेळेपर्यंत भूक जाणवू देत नाहीत. भाजीपाल्याच्या रसात जवसाच्या बिया मिक्स केल्या तर ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जाते.