cabbage leaves help relieve joint pain : आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक जण अनेक उपाय करून पाहत असतो. मग त्यात घरगुती उपाय, जुगाड किंवा हॅकचासुद्धा समावेश असतो. अशातच पाठदुखी, सांधेदुखी हा सामान्यत: वृद्धापकाळाचा आजार मानला जातो. पण, गेल्या काही वर्षांत तरुणांमध्येही या समस्या दिसून आल्या आहेत. तर सोशल मीडियावरील एका पोस्टवर केलेल्या कमेंटनुसार ‘कोबीच्या पानांमध्ये सांधेदुखी (Joint Pain) कमी करण्याची क्षमता आहे’; तर ही गोष्ट खरी आहे का? कसा करावा याचा उपयोग? याबद्दल आपण या लेखातून सविस्तर जाणून घेऊ.

तर सोशल मीडियावरील एका इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करण्यात आली होती, “माझ्या हृदयातील वेदना कमी करण्यासाठी ६३ व्या दिवसापर्यंत मी माझ्या हृदयाजवळ कोबीची पानं गुंडाळली होती. त्यात जर मेयोनीज टाकलं, तर आणखीन प्रभावी ठरेल. तर, या दाव्यात काही तथ्य आहे का हे जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संवाद साधला.

Is Dandelion Tea Really Beneficial
कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
woman overcomes rare disorder of painful meningioma
वेदनादायी मेनिन्जिओमाच्या दुर्मीळ विकारावर महिलेची मात!
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
How exercising for 2-3 days may help reduce risk of Alzheimer’s Alzheimer Disease exercise
व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितले व्यायाम प्रकार
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण

होलिस्टिक पोषणतज्ज्ञ ईशा लाल यांच्या मते, कोबीमध्ये भरपूर जीवनसत्त्वं व फायटोन्यूट्रिएंट्स असतात आणि त्यात अँटिऑक्सिडंट्स व दाहकविरोधी संयुगे असतात. जेव्हा तुम्ही कोबीची पानं तुमच्या पायांभोवती गुंडाळता तेव्हा त्यातील फायदेशीर संयुगं त्वचेमध्ये शोषली जातात आणि सूज, वेदना कमी करण्यास ती मदत करतात. हा एक साधा, नैसर्गिक उपाय आहे; ज्याचा आजी-आजोबादेखील उपयोग करतात.

हेही वाचा…Fever & Weight Loss : ताप आल्यावर वजन का होते कमी? वजन कमी करण्यासाठी ‘हा’ पर्याय उत्तम ठरेल का? वाचा तज्ज्ञांचे मत

आपण या हॅकचा उपयोग कसा करू शकतो?

मार्केटमधून कोबी आणल्यावर त्याची ताजी पाने निवडा आणि ती स्वच्छ करून घ्या. ती पाने खराब नाही आहेत ना याचीसुद्धा पडताळणी करा. पानांचा रस काढण्यासाठी रोलिंग पिन, लाटणे किंवा हाताच्या साह्याने पाने किंचित कुस्करून व ठेचून घ्या. त्यानंतर तुमच्या पायांच्या किंवा सांध्याच्या (Joint Pain) दुखणाऱ्या भागावर कोबीची ठेचलेली पाने ठेवा आणि ती कापड किंवा पट्टीने बांधून घ्या. चांगल्या परिणामांसाठी पाने सुमारे दोन ते तास किंवा रात्रभर तुम्ही ठेवू शकता. तसेच तुम्ही ही प्रक्रिया दररोज चार ते पाच दिवस किंवा गरजेनुसार पुन्हा पुन्हादेखील करू शकता, असा सल्ला पोषणतज्ज्ञ ईशा लाल यांनी दिला आहे.

सांधेदुखीसाठी (Joint Pain) आणखी काही नैसर्गिक पर्याय :

हळद : हळद ही शक्तिशाली, दाहकविरोधी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. त्यामुळे आपल्या नियमित आहारात तिचा समावेश नक्की करा.

आले : आल्याच्या चहाचे सेवन करा.

एप्सम सॉल्ट : गरम पाण्यात एप्सम सॉल्ट टाकून अंघोळ केल्याने वेदना व जळजळ कमी होण्यास मदत होते.

तेल लावा : वेदना कमी करण्यासाठी निलगिरी, पेपरमिंट व लव्हेंडरसारख्या तेलांनी तुम्ही वेदना होणाऱ्या त्वचेवर मालिश करू शकता.

व्यायाम : योगा, पोहणे आदी सौम्य व्यायाम सांधे लवचिक ठेवण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करतात.

हिट ॲण्ड कोल्ड थेरपी : वेदना होणाऱ्या अवयवांवर हिट किंवा कोल्ड पॅक लावल्याने सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळू शकतो.

हे नैसर्गिक उपाय सांधेदुखीसाठी (Joint Pain) मदत करू शकत असतील तरी एखाद्या नवीन उपचारांचा प्रयत्न करण्यापूर्वी तुमच्या वैयक्तिक डॉक्टरांशी बोलून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच आरोग्य सुधारण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणावाचे व्यवस्थापन करणे हेसुद्धा महत्त्वाचे आहे, असे पोषणतज्ज्ञ ईशा लाल यांनी सांगितले आहे.