सकाळी झोपेतून उठल्यानंतर लगेच तोंडावर, डोळ्यांवर पाणी मारण्याची अनेकांना सवय असते. असे उठल्या उठल्या सपासप डोळ्यांवर पाणी मारण्याने अत्यंत थंडगार आणि ताजेतवाने वाटते नाही का? मात्र, तुम्हाला हे सवयीचे असल्यास ती एक ‘वाईट सवय’ असल्याचे लेसिक व मोतीबिंदूचे सर्जन, डॉक्टर राहुल चौधरी यांचे मत आहे. अशी माहिती दी इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून मिळाली आहे. “आपल्या डोळ्यांमध्ये अश्रूंच्या ग्रंथी असतात. त्यांवर तेलाचा एक थर असतो. जेव्हा आपण डोळ्यांवर पाणी मारतो, तेव्हा त्याचा परिणाम त्या थरावर होत असतो. परिणामी तुमच्या डोळ्यांना कोरडेपणा येतो. डोळ्यांमधील अनावश्यक गोष्टी / कचरा बाहेर काढण्यासाठी डोळ्यांमध्ये नैसर्गिक यंत्रणा असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे”, अशी माहिती डॉक्टर राहुल चौधरी यांनी यूट्युब पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया यांच्याशी झालेल्या संभाषणात सांगितली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा