Benefits Of Eating Watermelon Seeds: उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड खाण्याची मजा काही औरच असते. आजवर आपण छान रसाळ व मधाळ कलिंगडाचे अनेक फायदे ऐकले आहेत. शरीर हायड्रेटेड राहते, त्वचा तुकतुकीत दिसते वैगरे. पण कलिंगडाच्या इतक्याच्या त्याच्या बिया सुद्धा अत्यंत फायदेशीर असतात, हे तुम्हाला माहित होतं का? अनेकदा जितक्या कमी बिया असतील तितकं कलिंगड चांगलं असा आपला समज असतो पण मंडळी हे अगदीच चुकीचं आहे. अनेक फळांच्या बियांमध्ये अत्यंत पोषक अशी सत्व असतात, जसे की शिया सीड्स, सूर्यफुलाच्या बिया इत्यादी, त्याच प्रमाणे कलिंगडाच्या बिया सुद्धा तुमच्या आरोग्याला खूप मदत करू शकतात, आता ही मदत नेमकी कशी हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया…

कलिंगडाच्या बिया खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Watermelon Seeds)

अंकिता घोषाल बिष्ट, डायटीशियन, प्राइमस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, यांनी हेल्थ शॉट्सला दिलेल्या माहितीनुसार, कलिंगडाच्या बिया पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहेत. त्याचे फायदे खालीलप्रमाणे:

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
Benefits of lemon water Is Warm Lemon Water On An Empty Stomach Good for You? Expert Says This know more
Lemon water:सकाळी उठून लिंबू पाणी पिण्याची ७ कारणं, आरोग्यासाठी अप्रतिम फायदे वाचून व्हाल थक्क
Distribution of fake inheritance certificates by court clerk navi Mumbai news
न्यायालयातल्या लिपिकाकडून बनावट वारस दाखल्यांचे वाटप;  पनवेल येथील न्यायालयातील प्रकार, लिपिक अटकेत
Mumbai municipal corporation land auction
पालिकेचे भूखंड विकासकांना नकोसे, प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुनर्निविदा काढण्याची पालिकेवर नामुष्की, मलबार हिलचा भूखंड वगळणार
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
minister nitesh rane put on onion garland by the farmer
नाशिक : नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ; शेतकरी ताब्यात
  1. हृदयाचे आरोग्य

कलिंगडाच्या बिया मॅग्नेशियमचा उत्कृष्ट स्रोत आहेत. यामुळे रक्तदाब नियंत्रित करून आणि हृदयाला निरोगी राखण्यात मदत होऊ शकते.

  1. रोगप्रतिकारक शक्तीसाठी

मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी झिंक महत्त्वपूर्ण आहे. कलिंगडाच्या बियांमध्ये झिंक सत्व मुबलक प्रमाणात आढळते. जस्तच्या साहाय्याने संक्रमण आणि कोणत्याही विकाराशी लढण्यास मदत करणाऱ्या रोगप्रतिकारक पेशी तयार होतात आणि सक्रिय होतात.

  1. पाचक आरोग्य

कलिंगडाच्या बियांमध्ये फायबर आणि अनसॅच्युरेटड फॅट्स असतात, जे पाचन आरोग्यास मदत करतात आणि आतड्यांना निरोगी बनवू शकतात.

  1. निरोगी त्वचा आणि केस

कलिंगडाचा फेस मास्क वापरण्यासाठी आपल्या आई- आजीने कित्येकदा सांगितले असेल. पण त्याही पेक्षा प्रभावी कलिंगडाच्या बियांनी बनवलेले हेअर व फेसमास्क ठरू शकतात. कलिंगडाच्या बियांमध्ये प्रथिने आणि आवश्यक फॅटी अॅसिड भरपूर असतात, ज्यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहण्यास मदत होते, असे तज्ज्ञ म्हणतात. हे पोषक घटक सूज कमी करण्यास आणि मुरुमांपासून बचाव करण्यास देखील मदत करू शकतात.

  1. हाडांचे आरोग्य

आपल्याला माहित आहे की मजबूत आणि निरोगी हाडे ठेवण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची आवश्यकता असते आणि कलिंगडाच्या बियांमध्ये कॅल्शियम मुबलक असते. हाडांच्या आरोग्याव्यतिरिक्त, ते स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि योग्य मज्जातंतू प्रणालीसाठी देखील मदत करतात.

कलिंगडाच्या बियांचे सेवन कसे करावे? (How To Eat Watermelon Seeds)

तुम्ही विचार करत असाल की हे फायदे तर सर्व समजले पण आता या बिया खायच्या कशा? कलिंगडाच्या बिया खाण्यायोग्य बनवण्यासाठी तुम्ही ओव्हनमध्ये शिजवू शकता किंवा तव्यावर भाजून घेऊ शकता. चव वाढवण्यासाठी या बियांमध्ये मीठ किंवा इतर मसाले घालून छान चटपटीत स्नॅक्स तयार करू शकता. याशिवाय तुम्ही या भाजलेल्या बियांमध्ये अन्य काही हर्ब्स टाकून छान पावडर बनवून घेऊ शकता जी तुम्ही भाजीत किंवा कोशिंबिरीत घालून चवीची मज्जा घेऊ शकाल.

कलिंगडाच्या बिया किती प्रमाणात खाव्या? (How Much Watermelon Seeds Should We Eat)

बिष्ट म्हणतात की तुम्ही कलिंगडाच्या बिया नियमितपणे खाऊ शकता कारण ते जीवनसत्त्वे, फायबर, आरोग्यदायी चरबी आणि प्रथिने यांचा उत्तम स्रोत आहेत. परंतु ते जास्त प्रमाणात घेऊ नका कारण त्यामध्ये कॅलरी देखील जास्त आहेत. त्यामुळे रोजच्या वापरासाठी सुमारे 30 ग्रॅम किंवा एक लहान कप कलिंगडाच्या बिया भाजून किंवा मोड आणून खाऊ शकता.

कलिंगडाच्या बिया कोणी खाऊ नये? (Who Should Not Eat Watermelon Seeds)

सर्वसाधारणपणे, कलिंगडाच्या बिया खाण्यास सुरक्षित असतात आणि त्यांचे अनेक आरोग्य फायदे आहेत. पण जर तुम्हाला खालीलपैकी कोणतेही त्रास असतील तर कलिंगडाच्या बियांचे सेवन आपण अगदी कमी प्रमाणात किंवा टाळायला हवे.

हे ही वाचा<< एका नजरेत गोड कलिंगड कसे ओळखाल? न कापता, न चाखता भेसळीची ‘ही’ सहा चिन्हे आधी ओळखा

  • त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे इरिटेबल बोवेल सिंड्रोम सारख्या पोटाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी कलिंगडाच्या बिया टाळायला हव्यात.
  • कलिंगडाच्या बियां ऍलर्जी असलेल्या लोकांनी खाऊ नयेत.
  • त्यात पोटॅशियमचे प्रमाणही जास्त असते, जे किडनीचे आजार असलेल्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे, ज्यांना किडनीच्या समस्या आहेत किंवा ज्यांना किडनी डायलिसिस होत आहे त्यांनी बियांचे सेवन मर्यादित करावे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्या)

Story img Loader