Health Benefits of Eating Watermelon: उन्हाळ्यात आढळणारे कलिंगड हे अनेक पौष्टिकतेने समृद्ध एक चवदार आणि आरोग्यदायी फळ आहे, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. आंब्यापेक्षाही कलिंगड आवडीने खाणारे अनेक लोक आहेत. उन्हाळ्यात आढळणारे कलिंगड हे अनेक पौष्टिक घटकांनी समृद्ध एक चवदार व आरोग्यदायी असे फळ आहे. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. उन्हाळ्यात शरीराला थंड आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी कलिंगड हे खूप चांगले फळ मानले जाते. त्यात पोटॅशियम, राइबोफ्लेविन, लोह, कॅल्शियम, झिंक, फायबर, नियासिन, लोह, अ, ब, क ही जीवनसत्त्वे आणि लाइकोपिन असे अनेक प्रकारचे पोषक घटक असतात; जे शरीराला तंदुरुस्त ठेवण्याचे काम करतात.

कलिंगडमध्ये भरपूर पाणी असते आणि त्यामुळे ते शरीराला कधीही पाण्याची कमतरता भासू देत नाही. टरबूजमध्ये क जीवनसत्त्व आढळते; जे मजबूत प्रतिकारशक्तीसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याशिवाय त्यात अ जीवनसत्त्वदेखील आढळते; जे रोगप्रतिकार शक्ती नियंत्रित करते आणि संक्रमणापासून संरक्षण करते. कलिंगडचे सेवन तुम्ही ज्यूसच्या स्वरूपातही करू शकता. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी कलिंगड खाण्याचे फायदे सांगितले असल्याचे वृत्त वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबाबत जाणून घेऊ…

डॉ. दीक्षा भावसार यांच्या मते, “कलिंगडामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणी असते, जे व्हिटॅमिन सी, ए, बी६ आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, फोलेट आणि कॅल्शियम सारख्या खनिजांचा चांगला स्रोत आहे. केवळ लगदाच नाही तर टरबूजाच्या बिया देखील फायदेशीर असल्याचे त्या सांगतात.”

कलिंगड खाण्याचे फायदे

  • जास्त तहान कमी करते
  • थकवा कमी करते
  • शरीरातील जळजळ दूर करण्यास मदत करते
  • वेदनादायक लघवी कमी करते
  • रक्तदाब नियंत्रित करते
  • वजन कमी करण्यास मदत होते
  • पचन सुधारते

कलिंगड खाण्याचा सर्वोत्तम मार्ग

तज्ज्ञांनी कलिंगड कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला. कलिंगडामध्ये पाणी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने अतिसार, सूज येणे, पोट फुगणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याबरोबरच कलिंगड जेवणाबरोबर खाऊ नये, असेही त्या सांगतात.

कलिंगड खाण्याची सर्वोत्तम वेळ

कलिंगड खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत आहे. कारण ही वेळ नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मध्ये येते. तुम्ही संध्याकाळी ५ वाजण्यापूर्वी नाश्ता म्हणूनही खाऊ शकता.  रात्री किंवा जेवणाबरोबर कलिंगड खाऊ नये असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला.