Wedding Night Horror Turned Into Physical Condition: न्यूरॉलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी अलीकडेच आपल्या X अकाउंटवर एका नवविवाहित जोडप्याची (खरी) कहाणी शेअर केली आहे. आधी आपण ही कहाणी वाचूया, व त्यानंतर या स्थितीमागील कारण, उपाय, याविषयी तज्ज्ञांचे मत जाणून घेऊया

आंतरजातीय विवाहावरील आक्षेपरूपी अडथळा पार करून मिनी (नाव बदललं आहे) आणि मनोज (नाव बदललं आहे) यांचा विवाह पार पडला. लग्नानंतर पहिल्या रात्रीसाठी दोघेही उत्सुक होते पण त्या दोघांनाही माहित नव्हतं की ज्या क्षणाची त्यांनी अनेक वर्षे वाट पाहिली तोच क्षण इतका विचित्र वळण घेऊन त्यांच्यासमोर आव्हान म्हणून उभा ठाकणार आहे. लग्नाच्या सोहळ्यात प्रत्येक विधीचा अनुभव घेताना मिनीच्या चेहऱ्यावर हसू होतं, तिचे सगळे बालपणीचे मित्र लग्नासाठी आले होते, अगदी दूरहुन वेळ काढून सगळे मिनी- मनोजच्या लग्नाचा आनंद साजरा करत होते. सगळे विधी संपेपर्यंत रात्री खूप उशीर झाला होता आणि धावपळीमुळे दोघेही खूप दामले होते पण असं असूनही ‘मधू चंद्राच्या रात्रीसाठी’ दोघेही उत्सुक होते. दोघांच्याही मनात भीती व उत्साह सांगड घालून धाकधूक वाढवत होते. दोघांचेही वेगवेगळे प्लॅन्स होते पण दोघांपैकी कुणीही पहिले पाऊल उचलण्याआधी थकव्याने आपला प्रभाव दाखवला आणि दोघेही थेट झोपी गेले.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

अचानक रात्री मध्येच मिनीला मनोजच्या आरडाओरड्यामुळे जाग आली, मनोज मिनीला जोरजोरात हलवून जागं करण्याचा प्रयत्न करत होता व तिच्यावर ओरडत होता. पहिलं वाक्य जे मिनीने ऐकलं ते म्हणजे, “तू हे काय केलंस, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती”, साहजिकच लग्नाच्या पहिल्या रात्री पतीकडून हे वाक्य ऐकल्यावर मिनीला धक्काच बसला पण अगदी काही सेकंदात तिच्या संदर्भ लक्षात आला. मिनीने पलंगावर झोपेतच लघवी केली होती ज्यामुळे तिचे कपडे, चादर भिजली होती व खोलीतही दुर्गंध पसरला होता.

डॉ कुमार पुढे म्हणाले की, मिनीने झोपेत चुकून लघवी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तिला लहानपणापासून हा त्रास आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी हे असेच घडायचे. तिच्या पालकांनी ज्या बालरोग तज्ज्ञांशी सल्लामसलत केली होती, त्यांनी त्यांना आश्वासन दिले की ती मोठी झाल्यावर ही समस्या स्वतःच संपून जाईल. आणि खरंच, काही काळानंतर, मिनीने अंथरुण भिजवण्याची वारंवारता कमी झाली परंतु ती पूर्णपणे थांबली नाही. किशोरवयात, मिनीला याची खूप लाज वाटायची पण डॉक्टरांचा सल्ला घेण्याइतके धैर्य तिला एकवटता आले नाही. या समस्येमुळे तिचा आत्मविश्वास कमी झाला होताच पण ती अनेकदा नैराश्याचा सामना करत होती.

मिनीने तिच्या समस्या तिच्या पतीला तपशीलवार सांगण्यासाठी पुरेसे धैर्य एकवटले आणि मग त्यानेच तिला डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. मिनीची स्थिती ही ‘nocturnal bedwetting’ म्हणजे रात्रीच्या वेळी अंथरुणात लघवी होण्याची सवय याचे उदाहरण होती, याला वैद्यकीयदृष्ट्या नॉक्टर्नल एन्युरेसिस असे संबोधले जाते. डॉ. कुमार यांनी या प्रकरणात मिनीवर युरोलॉजी आणि मानसोपचार तज्ज्ञांची मते घेऊन औषधोपचार सुरू केले. उपचाराने तिच्यात लक्षणीय सुधारणा झाली. ही झाली मिनी व मनोजची गोष्ट पण आता आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे की ही ‘नॉक्टर्नल एन्युरेसिस’ स्थिती उद्भवते कशामुळे? त्यावर उपाय काय? चला तर मग आपण डॉ. कुमार यांचे मत वाचूया..

नॉक्टर्नल एन्युरेसिस/ रात्री अंथरुणात लघवी होणे ही स्थिती का उद्भवते?

सोप्या शब्दात, ही एक सामान्य स्थिती आहे जिथे एखाद्याला त्यांच्या मूत्राशयाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवता येत नाही परिणामी झोपेच्या वेळी चुकून लघवी होते. लहान मुलांमध्ये हा त्रास अत्यंत सामान्य आहे पण वेळेनुसार वय व समज वाढत असताना ही सवय सुटते. काही असामान्य स्थितींमध्ये प्रौढ वयात सुद्धा ही अवस्था कायम राहते. नॉक्टर्नल एन्युरेसिस ही प्रौढांमधील अत्यंत दुर्मिळ स्थिती आहे व केवळ २ ते ३ टक्के प्रौढांना याचा त्रास होतो. दर सहा महिन्यांनी ते आठवड्यातून/महिन्यातून किमान एक वेळा असा त्रास होत असतो.

डॉ जगदीश काथवटे, सल्लागार नवजात रोग विशेषज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल खराडी पुणे यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, मेंदू आणि मूत्राशय यांच्यात समन्वय नसणे, नियंत्रण क्षमतेचा उशिराने किंवा कमी झालेला विकास, मूत्राशयाचे अपेक्षापेक्षा कमी क्षमता, थकवा, भावनिक ताणतणाव, हे विविध पैलू नॉक्टर्नल एन्युरेसिससाठी कारणीभूत ठरू शकतात.

टाळण्यासाठी उपाय काय?

झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी द्रवपदार्थ टाळणे किंवा मर्यादित करणे, बाथरूम ब्रेक शेड्यूल करणे आणि बाथरूम सहज उपलब्ध आहे याची खात्री करून तुम्ही अंथरुण ओले जाण्याचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेऊ शकता, असे डॉ. काथवटे यांनी सांगितले.

हे ही वाचा<< रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा

काय लक्षात ठेवावे?

पालक आणि भागीदारांनी समस्या समजून घेणे आणि त्या व्यक्तीला वैद्यकीय मदत घेण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. “सतत ओरडणे आणि टोमणे मारणे याने मन दुखावले जाऊ शकते आणि हळूहळू त्यांचा आत्मविश्वास कमी होऊन त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो,” असेही डॉ काथवटे यांनी नमूद केले.

Story img Loader