आजच्या धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड, अवेळी जेवण यांसारख्या अनेक गोष्टींमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. एवढेच नाही, तर सतत बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे अनेकांचे वजनदेखील वाढते. वाढत्या वजनाच्या समस्येमुळे अनेक जण त्रस्त आहेत. स्थूलता कोणत्याही परिस्थितीत शरीरासाठी चांगले नाही. कारण- लठ्ठपणा अनेक आजारांना जन्म देतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळीत वाढ, हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी त्रास उदभवू शकतात. वजन कमी करण्यासाठी कोणते अन्न तुमच्या कामी येईल याविषयी गुडगाव येथील आर्टेमिस हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. शबाना परवीन यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खराब जीवनशैली व व्यायामाचा अभाव यांमुळे आजकाल लोकांसाठी चरबीत वाढ होणे ही एक मोठी समस्या बनली आहे. हा लठ्ठपणा उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, दमा, गॅस्ट्रिक यांसह अनेक आजार घेऊन येतो. ॲनाल्स ऑफ इंटर्नल मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या २०१५ च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, दररोज ३० ग्रॅम फायबरचे सेवन केल्याने वजन कमी होऊ शकते. चिया बियांमध्ये भरपूर पोषक घटक असतात, म्हणूनच त्यांना सुपरफूड मानले जाते. त्यात फायबर, प्रथिने, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे व खनिजे चांगल्या प्रमाणात आढळतात.

“चिया बिया हे पौष्टिक अन्न आहे; परंतु ते वजन कमी करण्यासाठी जादूची गोळी नाही,” असे म्हणत अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी सावध करतात. वजन कमी करण्यासाठी निरोगी आहार, नियमित व्यायाम व पुरेशी झोप या सर्व गोष्टी आवश्यक असल्याचे त्या सांगतात.

(हे ही वाचा : उपवास करण्यामुळे वजन कमी, रक्तातील साखर अन् कोलेस्ट्रॉल कमी होतं? तज्ज्ञ काय सांगतात… )

चिया बिया शरीराला अनेक फायदे देतात. त्यामुळे आजच्या काळात त्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. चिया बिया या ओमेगा-3 फॅटी अॅसिडचे सर्वोत्तम वनस्पती-आधारित स्रोतांपैकी एक आहेत. चिया बियांमधील उच्च फायबर आणि प्रथिने ही सामग्री दीर्घ काळासाठी भूक कमी ठेवण्यास मदत करते. साहजिकच त्यामुळे वजनावर नियंत्रण राखणे शक्य होते.

एक वा दोन चमचे चिया बिया : फायबर, प्रथिने, निरोगी चरबी, जीवनसत्त्वे व खनिजे यांसारख्या पोषक घटकांनी समृद्ध असतात. तुम्ही दररोज एक किंवा दोन चमचे घेऊन दिवसाची सुरुवात करू शकता आणि पचनाचा त्रास टाळण्यासाठी हे प्रमाण हळूहळू वाढवा.

हायड्रेटेड राहा : चिया बिया मोठ्या प्रमाणात द्रव शोषून घेतात. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी त्यांचे सेवन करताना योग्य हायड्रेशनची खात्री करा.

संतुलित आहाराचा भाग म्हणून तुम्ही तुमच्या आहारात चिया बियांचा समावेश करू शकता. चिया बिया स्मूदी बनवूनही खाता येतात. स्मूदीमध्ये फळांसह चिया बिया चवदार लागतात. वजन कमी करण्यासाठी चिया बिया भिजवून स्मूदी बनवावी. आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weight loss diet can chia seeds help support weight loss pdb