सध्याच्या घडीला वाढत्या वजनाने त्रस्त असणारा प्रत्येक जण वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण- लठ्ठपणा हे अनेक आजारांचे मूळ आहे. वाढत्या वजनामुळे तुम्ही मधुमेह, रक्तदाब यांसारख्या अनेक आरोग्य समस्यांना बळी पडू शकता. भारतात मोठ्या संख्येने लोक पोटावरील चरबीने त्रस्त आहेत. वाढत्या वजनाचा सर्वांत मोठा परिणाम पोटावर दिसून येतो आणि पोटाची चरबी वाढू लागते. त्यामुळे नेहमीचे कपडेही न होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ लागतात. खराब आहार आणि बैठी जीवनशैली वजन वाढण्यास कारणीभूत आहे.

वजन कमी करण्यासाठी चांगला डाएट प्लॅन असणे आवश्यक आहे. आपण आहाराकडे लक्ष दिले आणि नियमित व्यायाम व शारीरिक हालचाली केल्या, तर नक्कीच वजन कमी करणे सोपे होईल. वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल, तर आरोग्य तज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी काही पर्याय सांगितले असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
Actress Deepti Sadhwani weight loss journey
‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्रीने फक्त ‘इतक्या’ महिन्यांत घटवलं १७ किलो वजन; चाहत्यांना सांगितला डाएट अन् वर्कआउट प्लॅन
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
Mushrooms benefits Eating 5 Mushrooms Daily May Help Combat Heart Disease And Dementia
दररोज ५ मशरूम खाल्ल्याने शरिरावर काय परिणाम होतात; फायदे ऐकून लगेच आहारात समावेश कराल

डॉक्टर सांगतात, “खराब जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि त्यामुळे सतत वाढणारे वजन हे सध्या अगदी तरुण पिढीसमोरही मोठे आव्हान ठरू लागलेय. वाढलेल्या वजनाचा परिणाम केवळ व्यक्तिमत्त्वावर न पडता, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारखे गंभीर आजारही यासह जोडले जात आहेत. बदलती जीवनपद्धती, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, फास्ट फूडचा अतिरेक आदी विविध कारणांमुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होत असते.

(हे ही वाचा: गरोदर महिलांनी सनस्क्रीन वापरावे का? डाॅक्टर काय सांगतात…)

वजन कमी करण्यासाठी खालील टिप्स फाॅलो करा

१. पोहण्यामुळे वेगाने वजन कमी करता येते; ज्यांचे वजन जास्त आहे ते पोहण्याने आपले वजन कमी करू शकतात. पोहण्यामुळे शरीरातील कॅलरीज झपाट्याने बर्न होतात. धावण्याने तुम्ही जितके वजन कमी कराल, तितकेच तुम्ही पोहण्यानेही वजन कमी करू शकता.

२. शरीरातील चरबी कमी होण्याकरिता अॅरोबिक्सचा व्यायाम केला जातो. या व्यायामांमुळे बाॅडी फॅट बर्न होतात. अॅरोबिक व्यायाम तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकता. सलग अॅरोबिक कसरती नियमितपणाने केल्यास शरीरामध्ये फरक अनुभवता येतो. कमी वेळामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज बर्न व्हाव्यात म्हणून सायकल चालविणे हा उत्तम पर्याय मानला जातो.

३. जर तुमचे वजन वाढत असेल आणि कामाच्या व्यग्रतेमुळे तुम्हाला जिममध्ये जाऊन वर्कआउट करता येत नसेल, तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी चालायला सुरुवात करा. शारीरिक हालचालींसोबतच आहारातून कॅलरीज कमी केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही नियमित चालत असाल, तर त्यामुळे कॅलरीज बर्न होतात. वजन कमी करण्यासाठी चालणे हा खूप सोपा मार्ग आहे.

४. वजन कमी करण्यासाठी आहार आणि झोप महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या आहारामध्ये भाज्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पालेभाज्या, बिया असणाऱ्या भाज्या आदी पदार्थांचा समावेश करावा. वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचे आहे.

अशा प्रकारे वजन करण्यासाठी तुम्ही वरील टिप्सचा अवलंब करू शकता.

Story img Loader