40kg Weight Loss: नवीन वर्षाच्या संकल्पांची यादी करताना तुमचं वजन नियंत्रणात ठेवणं हा जर तुमचाही संकल्प असेल तर आजचा हा विशेष लेख तुम्हाला काही भन्नाट आयडीयाज व प्रेरणा सुद्धा नक्की देऊ करेल. शेफ व इन्फ्लुएन्सर पलक कपूर हिने इंडियन एक्सस्प्रेससह ४० किलो वजन कमी करण्याचा प्रवास शेअर करताना आपल्याला आलेल्या अडचणी व त्यावर शोधलेले उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तुमच्या आमच्यासारखीच खाण्याची आवड असलेली पलक सांगते की, “मला बटर चिकन एवढं आवडायचं की मी ‘नेहमी’ बटर नानबरोबर त्याच्यावर ताव मारायचे, चार- पाच बटर नान फस्त करायचे.” पण जेव्हा पलकने वजन कमी करायचं ठरवलं तेव्हा तिने इतकं परफेक्ट रुटीन आखलं की कोणताही फॅड डाएट फॉलो न करता, शॉर्टकटच्या नावे जास्त श्रम न घेता, जिममध्ये शरीराची झीज न करता तिने १, २ नव्हे तर तब्बल ४० किलो वजन कमी केलं आहे.

वजन वाढण्याचं कारण म्हणजे तुम्ही ‘कशासाठी’ खाताय?

पलकने वजन कमी करण्याचा प्रवास आपल्या इन्स्टाग्राम, युट्युबच्या माध्यमातून सुद्धा चाहत्यांसह शेअर केला आहे. ती सांगते की, एकेकाळी तिचं वजन १२१ किलो होतं. आता तिचं वजन साधारण ८० किलो आहे पण अजूनही तिच्या उंचीप्रमाणे वजन कमी करण्यासाठी तिचा प्रयत्न सुरु आहे. खवय्या कुटुंबात जन्मल्यामुळे तिने करिअर सुद्धा खाण्यापिण्याशी संबंधित निवडलं. मात्र अचानक हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचे निधन झाल्यावर परिस्थिती बदलू लागली. आवडीमुळे होणारी खवय्येगिरी दु:ख आणि एकटेपणा दडपण्यासाठी फक्त शरीरात कॅलरीज व घातक घटक कोंबण्यापर्यंत बदलली. तिच्या मेंदूला खाण्यामुळे डोपामाइन मिळू लागला याची सवय झाल्यामुळे, तिने तिच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाकडे दुर्लक्ष केले होते.

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Arjun Kapoor confirming breakup with Malaika Arora and told about importance of emotional freedom
मलायका अरोराबरोबर ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने सांगितले, भावनिक स्वातंत्र्य का महत्त्वाचे? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
Robotic Bariatric Surgery, Obesity, Robotic Bariatric,
‘रोबोटिक बॅरिएट्रिक’ शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणाला कात्री! अधिक अचूकपणे, कमी वेळेत होणाऱ्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या…
Common lifting mistakes and how to avoid them
Lifting Heavy Objects Tips : जड वस्तू उचलताना तुम्हीसुद्धा श्वास रोखून ठेवता का? मग थांबा! डॉक्टरांचा हा सल्ला वाचा
Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”
Loksatta article Modern capital finance-values Retail loan without salvation
लेख: वाढत्या ‘विनातारण’ सूक्ष्मकर्जांची चिंता!

‘त्या’ दिवशी तिने तिचे आयुष्य बदलण्याचानिर्णय घेतला

एप्रिल २०२० च्या एका सकाळी, छातीत खूप जळजळ आणि तोंडात कडू आम्लयुक्त चव घेऊन पलकला जागा आली. काही दिवस असंच चालू राहिलं. मग मनात वडिलांप्रमाणेच हृदयविकाराचा झटका येण्याची भीती वाढू लागली. त्यात ‘लठ्ठपणा’ हा एक कौटुंबिक वारसा आणि जोखीम घटक होता त्याने तिला अधिकच अस्वस्थ वाटू लागलं.

वजन कमी करताना पहिले काय बदललं?

अशातच करोनाच्या, लॉकडाऊनमध्ये घरात अडकून पडल्याने वजन कमी करायचं म्हटलं तरी कसं करावं हा प्रश्न मोठा होता. यामुळेच तिने आपल्या आहारातच काही बदल करण्याचं ठरवलं. सगळ्यात आधी मी फोनमध्ये सर्व फूड अॅप्स काढून टाकले.

आहार कसा असावा? (Weight Loss Diet)

ग्रील्ड चिकन, पनीर आणि फरसबी यांसारख्या निरोगी प्रथिनांना आहारात जागा करून दिली आणि त्याऐवजी जड व अधिक कॅलरीजयुक्त पदार्थ वगळण्यास सुरुवात केली. मी दुपारच्या जेवणासाठी भात खात होते पण त्याचे प्रमाण कमी केले, पोट भरल्याचा आनंद मिळवता म्हणजं काकडी आहारात सर्वाधिक समाविष्ट केली. रात्रीच्या जेवणासाठी चपातीच्या आकाराच्या दोन बाजरीच्या भाकऱ्या घेतल्या.

इनडोअर फिटनेससाठी, ती एक दिवसही न डगमगता, दररोज ३०- ४० मिनिटे वेगाने चालायची. कधी यातच बदल म्हणून पायऱ्या चढण्याचा उतरण्याचा पर्याय निवडला. यूट्यूबवरून होम फिटनेस रूटीनचे फॉलो करून, तिने २०२० च्या अखेरपर्यंत १० किलो वजन कमी केले.

अचानक कोविडची लागण झाली आणि..

एकदा तिचे वजन कमी झाल्याचे दिसू लागल्यावर पलकने इंटरमिटंट फास्टींग करायला सुरुवात केली. दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत ती आहार घेऊ लागली. सहा तासांच्या या वेळेच्या खिडकीत तिचा आहार मर्यदित असायचा ज्यामुळे तिने शरीरात कॅलरीज कमी करण्याची सुरुवात केली. हे सगळं रुळावर येत असतानाच अचानक तिला २०२१ मध्ये कोविड-19 चा संसर्ग झाला. संसर्ग झाल्यानंतर पलकला कमी रक्तदाब असल्याचे निदान झाले, तेव्हा तिचा वेग कमी झाला. तिचा एकमेव व्यायाम म्हणून ती चालत राहिली आणि सामान्य आहाराकडे परत गेली.

चीट डे ने कशी केली मदत?

मात्र त्यातून बाहेर पडल्यावर, ऊर्जा परत मिळवल्यानंतर, पलकने २०२२ मध्ये ऑनलाइन स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी साइन अप केले. ९,००० रुपयांची वर्कआउट साधने खरेदी केली आणि घरी एक मिनी जिम सुरू केली.यादरम्यान तिच्या हे लक्षात आले की, वजन कमी करताना तिची त्वचा निस्तेज होऊ लागली होती. अशावेळी तिने वेट ट्रेनिंगवर भर द्यायला सुरुवात केली. कमी कॅलरीजचे सेवन करताना ‘चीट डे’ची संकल्पना कशी फायद्याची ठरू शकते याविषयी तिला फिटनेस तज्ज्ञांनी माहिती दिली. तुमच्या अत्यंत कठोर डाएटमध्ये एक चीट डे असल्यास हा एक दिवस २४ तासांपर्यंत चरबीच्या चयापचयासाठी जबाबदार हार्मोन लेप्टिनचे उत्पादन 30 टक्क्यांनी वाढवतो. या कालावधीत कॅलरी बर्न होण्याचा वेग वाढतो शिवाय एरवी वाटणारी लालसा कमी होते.

वजन कमी केलं, पण टिकवण्यासाठी काय करावं?

वजन कमी झाल्यावर आता पलकने क्रॉसफिट व्यायाम पद्धत निवडली आहे. यामध्ये काही उच्च-तीव्रतेचे व्यायाम तसेच काही वेट ट्रेनिंगचे व्यायाम व काही मजेशीर खेळाचे व्यायाम समाविष्ट असतात, आता जिममध्ये जाणे सुद्धा तिने सुरु केले आहे. पलक सांगते की सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिच्यासाठी व्यायाम करणे खूप कठीण होते अगदी एक उडी मारायला सुद्धा नीट जमत नव्हती पण हे सगळं यामुळेच शक्य झालं कारण तिने फिटनेसकडे एक गरज म्हणून पाहायला सुरुवात केली.

हे ही वाचा<< श्रेयस तळपदेने २८ वर्षं केलेली ‘ही’ गोष्ट ठरली हार्टअटॅकचं मोठं कारण; तुम्ही अशी चूक करताय का? डॉक्टरांनी दिलं उत्तर

दरवर्षी संपूर्ण शरीराची तपासणी करणे, आणि आहारात बदल करण्यापूर्वी पोषणतज्ज्ञांचा सल्ला घेणे हे सगळे बदल तिने स्वतःमध्ये केले. इतकेच नाही तर, लठ्ठपणा हा एक ‘टाइम बॉम्ब’ आहे हे जाणून तिने तिच्या आईच्या फिटनेससाठी सुद्धा प्रयत्न सुरु केले. लठ्ठपणा हा शरीर कसं दिसतंय यापेक्षा शरीर कसं आहे याचा आरसा असतो. हृदयविकाराचा झटका आणि अन्य रोग दूर ठेवण्यासाठी तरी प्रत्येकाने वजनावर नियंत्रण ठेवायला हवे.