Green Chillies Benefits: सध्याच्या काळात फिट राहणे ही गरज ठरली आहे. आपलं शरीर छान सुडौल सुंदर दिसावं असं वाटत असतं यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. आपलं वजन वाढू नये म्हणून रोजच्या जीवनात आपण खाण्यावर नियंत्रण ठेवत असतो, समतोल आहार घेतो ,बऱ्याच गोष्टी आपण खायच्या टाळतो, काही लोक जिमला जातात तर काही डाएटिशियनवर हजारो रुपये खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का आपले भारतीय अन्न इतके समृद्ध आहे की यातून तुमची अतिवजनाची समस्या सुद्धा बरीच कमी होऊ शकते. भारतीय जेवणामध्ये वापरली जाणारी हिरवी मिरची आपले वजन कमी करण्यास कशी मदत करू शकते पाहूया…
हिरवी मिरची व कोलेस्ट्रॉल…
हिरव्या मिरच्यांमध्ये असे अनेक व्हिटॅमीन असतात ज्यामूळे तुम्हला वजन कमी करण्यसाठी मदत होऊ शकते. हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन A , व्हिटॅमिन C आणि लोह यांचे मुबलक प्रमाण असल्यामुळे अनेक फायदे आपल्या शरीराला मिळतात. योग्य प्रमाणात फायबर मिळत असल्याने व खराब कोलेस्टेरॉलपासून मुक्त असल्यामुळे आपल्या हृदयाला बरेच फायदे मिळू शकतात.विविध प्रकारच्या व्हिटॅमीन मुळे डोळे, पचन क्रिया, फुफ्फुस, ह्रदय , शरीराचे अवयव चांगले राहण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत होऊ शकते.
हिरवी मिरची व पचनक्रिया…
हिरव्या मिरच्या खाल्याने आल्या पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कॅप्सेसिन नावाचे अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होते. विशेष म्हणजे आपल्या शरीरातील उष्णता नियंत्रणात ठेवण्यास मदत होते त्यामुळे पचनक्रिया चांगली रहाते. तसेच रक्तभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत होते. हिरव्या मिरच्या मध्ये कॅलरीजही कमी असल्यामुळे वजन कमी करण्यसाठी सुद्धा याचे सेवन उत्तम ठरते.
हिरवी मिरची व मधुमेह…
मिरचीमध्ये असलेले कॅप्सेसिन मधुमेहापासून रक्षण करू शकते. हे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राखण्यास मदत करते, परंतु यासाठी दररोज किमान ३० ग्रॅम हिरव्या मिरच्यांचे सेवन करावे यापेक्षा जास्त सेवन हे तुमचे अन्य त्रास वाढवू शकते.
प्रमाणाच्या बाहेर हिरवी मिरची खाल्ल्यास पोटात जळजळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रमाण ओळखा व त्यानुसार आहार ठेवा तसेच याआधी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम ठरेल.