Bollywood Actor Weight Loss Tip : राम कपूर आणि साक्षी तन्वर यांची ‘बडे अच्छे लगते है’ ही मालिका प्रचंड गाजली. त्यांच्या मालिकेतील राम कपूर आणि प्रियाच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात आजही घर केले आहे. तर काही दिवसांपूर्वी राम कपूर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांचे वजन प्रचंड कमी झाले (Weight Loss) आहे असे दिसून आले होते. ५५ किलो वजन कमी करणारा अभिनेता राम कपूर, देवना गांधी यांच्या पॉडकास्टवर आपल्या आहाराबद्दल सांगताना म्हणाला, ‘मी आता दिवसातून दोनदा जेवतो. सगळ्यात पहिला सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी किंवा ११ वाजेपर्यंत… त्यानंतर दुसऱ्यांदा संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी जेवतो. मध्ये कोणतेच स्नॅक खात नाही. ४५ मिनिटे कार्डिओ, ४५ मिनिटे वजन ट्रेनिंग, नैसर्गिक आहार आणि झोपेसह त्यांच्या जीवनशैलीवर काम करतो’ असे त्यांनी सांगितले.
दिवसातून फक्त दोनदा जेवणे योग्य आहे का हे जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने मुंबईच्या झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्या म्हणाल्या की, काही व्यक्तींसाठी वजन कमी करण्यासाठी दिवसातून दोनदा खाणे हा एक सस्टेनेबल अप्रोच असू शकतो. पण लोकांना हे समजून घेणे आवश्यक आहे की, वजन कमी करताना (Weight Loss) त्याचे चांगले परिणाम दिसण्यासाठी, एखाद्याने सतत प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे. निरोगी वजन कमी करणे पौष्टिक आहाराच्या मदतीने साध्य करता येते. फक्त , ते तुमच्या जेवणाची क्वालिटी, जेवणाचा आकार किंवा भाग आणि वैयक्तिक जीवनशैली यांसारख्या घटकांवरदेखील अवलंबून असते. वजन कमी करण्यासाठी दोनदा खाणे हे इंटरमिटंट फास्टिंग करण्यासारखेच आहे. म्हणजेच इंटरमिटंट फास्टिंग करताना, एखादी व्यक्ती जसे फक्त ठराविक वेळेत आहार घेते.
वजन कमी करण्याऐवजी तुमचे वजन वाढू शकते (Weight Loss)
पण, हा उपाय प्रत्येकासाठी काम करेलच असे नाही. वजन कमी करण्याऐवजी (Weight Loss) तुमचे वजन वाढू शकते. कारण उपवासामुळे तुमचे चयापचय लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते, ज्यामुळे वजन कमी करणे आव्हानात्मक ठरू शकते. खाण्याच्या निर्बंधांमुळे काही लोक जास्त खाण्याकडे प्रवृत्त होतात, ज्यामुळे वजन वाढते; असे जिनल पटेल म्हणाल्या आहेत.
त्यामुळे वजन कमी करताना हेल्दी बॅलेन्स राखणे, अस्वास्थ्यकर पदार्थ टाळणे, पोर्शन साईझ तपासणे ही मुख्य गोष्ट आहे. जीवनसत्त्वे, निरोगी चरबी, फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिडस् आणि प्रथिने यांसारख्या चांगल्या किंवा आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध असलेले अन्न खाल्ल्यास चांगले परिणाम मिळण्यास मदत होते. हे तुम्हाला दिवसभर उत्साही राहण्यास मदत करू शकते. “पॅक केलेले, प्रक्रिया केलेले किंवा प्रिझर्व्हेशन असलेले पदार्थ काटेकोरपणे टाळा. अनहेल्दी पर्यायांपेक्षा निरोगी अन्न पर्याय निवडा; असे जिनल पटेल म्हणाल्या आहेत.