Apple Cider Vinegar for Weight loss: आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये कामाच्या व्यापात बहुतांश लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. वेळेवर जेवण न करणे, व्यायाम न करणे, तासनतास एकाच जागेवर बसून राहणे अशा सवयींमुळे वजन वाढत जाते. वयोमानानुसार, वजन वाढणे आवश्यक असले, तरी त्या गोष्टीलाही मर्यादा असते. अधिकच्या वजनामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवतात. अशा वेळी डॉक्टर, आहारतज्ञांचा सल्ला घेऊन वाढलेल्या वजनाबाबत उपाय करणे फायदेशीर ठरते. वजन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रमाणामध्ये अॅप्पल सायडर व्हिनेगर घेण्याचा सल्ला दिला जातो.
अॅप्पल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar/ACV) यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. याच्या सेवनामुळे पचनक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी मदत होते. पचनक्रियेला वेग आल्याने खालेल्या अन्नपदार्थामधील घटक लवकर पचतात. वजन नियंत्रणामध्ये राहावे यासाठी अॅप्पल सायडर व्हिनेगर पिऊ शकता.
अॅप्पल सायडर व्हिनेगर कधी प्यावे?
वजन कमी करण्यासाठी अॅप्पल सायडर व्हिनेगर जेवणापूर्वी प्यावे. सकाळी उठल्यावर लगेच आणि रात्री झोपायच्या आधी हे पेय पिणे टाळावे. वजन नियंत्रणात आणण्यासाठी याची नक्की मदत होईल.
आणखी वाचा – किडनी निकामी होण्याआधी त्वचेवर दिसतात ‘ही’ ५ लक्षणे; वेळीच ओळखा नाहीतर..
जेवणापूर्वी अॅप्पल सायडर व्हिनेगर पिणे योग्य असते का?
अॅप्पल सायडर व्हिनेगर प्यायल्याने पोट भरले आहे असा आभास होतो. यामुळे व्यक्ती तुलनेने कमी जेवते. सोप्या शब्दात, याच्या सेवनाने एका प्रकारे जेवणाचे प्रमाण कमी होते. हे पेय प्यायल्यामुळे जेवणातील स्टार्चसारखे घटक पचायला मदत होते. पचनक्रिया सुधारल्याने वजन नियंत्रणात आणणे शक्य होते.
अॅप्पल सायडर व्हिनेगर पिण्याची योग्य पद्धत कोणती?
अॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये नेहमी एक ग्लास पाणी मिसळून तयार झालेले मिश्रणाचे सेवन करावे. पाणी न मिसळता प्यायल्याने अन्ननलिका आणि दातांना त्रास होऊ शकतो. हे पेय पाण्यामध्ये मिसळल्याने त्याची दाहकता कमी होते.
आणखी वाचा – तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य हवे आहे? मग सकाळी नाही तर, ‘या’ वेळेत करा व्यायाम, रिसर्चमधून खुलासा
अॅप्पल सायडर व्हिनेगर पिण्याचे प्रमाण किती असावे?
हे पेय दाहक असल्यामुळे त्याच्या सेवनाचे प्रमाण अधिक असल्यास नुकसान होऊ शकते. त्यामुळे १५ मिलीलीटर किंवा एक चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर पाण्यामध्ये टाकून पिण्याचा सल्ला तज्ञ देतात.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टर किंवा आहारतज्ञ यांच्याशी संपर्क साधून मगच उपाय करावेत.)