Weight loss tips for women PCOS patients: अनेक महिला आणि मुलींना पीसीओएसचा त्रास असतो. या समस्येत शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. शरीरात ॲस्ट्रोजनऐवजी टेस्टोस्टेरोन हे पुरुषी हार्मोन्स वाढते. पीसीओएसमध्ये चेहऱ्यावरचे व अंगावरचे केस वाढणे, पाळी अनियमित येणे, चेहऱ्यावर मुरमे वा पुटकुळ्या येणे, ओटीपोट वाढणे, तसेच गर्भधारणेत अडचणी जाणवणे या समस्या जाणवतात. तसेच यामध्ये वजन कमी करणेदेखील कठीण होते. अलीकडेच या पीसीओएसने ग्रस्त असलेल्या दिल्लीच्या पोलिस उपनिरीक्षकाने बाळाच्या जन्मानंतर तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत १५ किलो वजन कमी केले. “जलद वजन कमी होणे, जसे की बाळाच्या जन्मानंतर तीन महिन्यांत १५ किलो वजन कमी करणे, सामान्यत: सुरक्षित किंवा निरोगी नसते. विशेषतः पीसीओएसचा त्रास असलेल्या मातांसाठी. यासंदर्भात होलिस्टिका वर्ल्डचे संचालक, समग्र आरोग्य प्रशिक्षक डॉ. धर्मेश शाह यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. धर्मेश शाह यांच्या मते, जलद वजन कमी करण्यामध्ये बऱ्याचदा महत्त्वपूर्ण घटक शरीरातून निघून जातात, ज्यामुळे आवश्यक पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते. हे विशेषतः स्तनपान करणाऱ्या आईसाठी आहे, कारण तिला आणि तिच्या बाळाला आरोग्य आणि विकासासाठी पुरेसे पोषण आवश्यक आहे. लक्षणीय आणि जलद वजन कमी केल्याने मानसिक परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे प्रसूतीनंतरचे नैराश्य किंवा मूड बदलण्याची शक्यता असते, असेही ते म्हणाले.
PCOS रुग्णाला वजन कमी करायचे असेल तर सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?
“प्रथम आहाराचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी योग्य खाद्यपदार्थांचा समावेश करा आणि उच्च प्रथिनांचे सेवन करा. चरबी आणि साखर टाळण्यासाठी प्रक्रिया केलेले अन्न खाणे बंद करा.
दुसरे म्हणजे, पीसीओएस ही गंभीर समस्या असली तरी योग्य व संतुलित आहार आणि व्यायाम याद्वारे ती नियंत्रित करता येते. हाय इंटेन्सिटी व्यायामामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते. चेहऱ्यावर मुरमे आणि त्वचेवरील केसांची जास्त वाढ यांसारखी लक्षणे कमी होऊ शकतात. शाह यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी हाय इंटेन्सिटी व्यायामाची मदत होते. तणाव व्यवस्थापन हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे. दीर्घकालीन तणावामुळे पीसीओएसमध्ये हार्मोनल असंतुलन बिघडू शकतो, ज्यामुळे वजन कमी करणे कठीण होते. ध्यान, योग आणि दीर्घ श्वासोच्छ्वास यांसारखे व्यायाम केल्यास तणावाचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतात.
जीवनशैलीमध्ये सातत्य राखणे
जसे की पुरेशा झोपेला प्राधान्य देणे आणि नियमित झोपेचे वेळापत्रक राखणे. यामुळेदेखील वजन व्यवस्थापनावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. झोपेच्या आधी मोबाइल, टीव्हीची स्क्रीन पाहू नका, तसेच योग्य पूरक आहार घ्या.
एका महिन्यात कमी करण्यासाठी आदर्श वजन काय आहे?
एका महिन्यात कमी करण्यासाठी आदर्श वजन सामान्यत: २.५ ते ३ किलोग्रॅमदरम्यान असते, ज्यामुळे तुमचे शरीर आरोग्यावर कोणतेही प्रतिकूल परिणाम न होता हळूहळू वजन कमी करू शकते.
लक्षात ठेवण्यासाठी काही खबरदारी
१. तुमची वजन कमी करण्याची योजना सुरक्षित आणि प्रभावी आहे याची खात्री करण्यासाठी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा आणि पोषणतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
२. अति आहार किंवा बाहेरच्या खाद्यपदार्थांपासून दूर राहा.
३. तुमच्या शरीराच्या गरजांकडे लक्ष द्या. तुम्हाला थकवा, अशक्त किंवा अस्वस्थ वाटत असल्यास डॉक्टरांचा आणि पोषणतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
४. वजन कमी करण्यासाठी हाय इंटेन्सिटी व्यायामाची मदत होते. तणाव व्यवस्थापन हा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे.
हेही वाचा>> दह्यात दालचिनी पावडर टाकून त्याचे सेवन करावे का? जाणून घ्या त्याचे अनेक फायदे आणि काही तोटे
५.सहाय्यक मित्र आणि कुटुंबामध्ये राहा, जे तुम्हाला प्रोत्साहित आणि प्रेरित करू शकतात.