Weight Loss with House Chores: वजन कमी करताना आहारात बदल कसा करावा याची कल्पना कमी अधिक प्रमाणात आपल्यालाही असतेच. आहाराइतकंच व्यायामाचं महत्त्व सुद्धा आपल्याला ठाऊक असतं. पण समस्या तेव्हा येते जेव्हा व्यायाम करायचं ठरवूनही नेमका व्यायाम काय करावा हे आपल्याला कळत नाही. व्यायामासाठी जिम लावायला जावं तर जिमची आणि त्यात पर्सनल ट्रेनरची फी ऐकूनच आधी घाम फुटतो. या स्थितीत तुम्ही घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी काही व्यायाम करू शकता ज्याने तुमच्या वेळेची, पैशांची दुप्पट बचत होऊ शकते. दुप्पट बचत का, तर व्यायामासाठी आपल्याला घरची कामंच करावी लागणार आहेत, त्यामुळे व्यायामाशिवाय आवराआवर, स्वच्छता करण्यासाठी लागणारा वेळ कमी होऊ शकेल. लॅन्सेट पब्लिक हेल्थ संशोधनात सुद्धा अलीकडेच हे मान्य करण्यात आले आहे की, घरगुती कामे करून हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि अगदी अकाली मृत्यूचा धोका किती कमी होऊ शकतो.

लादी पुसणे, केर काढणे, काचेच्या खिडक्या पुसणे यांसारख्या कामांमध्ये व्यायामाचे वेगेवेगळे प्रकार आपोआप होत असतात, उदाहरणार्थ, जमिनीवर बसून लादी पुसताना आपोआप आपल्याकडे डक वॉकसारखी शारीरिक हालचाल होते. केर काढताना, खिडक्या पुसताना वाकणे, वळणे या हालचाली करून स्ट्रेचिंग करता येते. अनेकदा हे सगळं करताना आपल्याला बॅलन्सिंग व्यायाम ज्याने शरीराला संतुलन साधण्याची सवय लागते ते ही करता येतात.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
How to use banana peel for mosquito
घरात डासांचा सुळसुळाट वाढतोय? केळीच्या सालीचा ‘हा’ सोपा उपाय डासांचा करेल नायनाट
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
Common lifting mistakes and how to avoid them
Lifting Heavy Objects Tips : जड वस्तू उचलताना तुम्हीसुद्धा श्वास रोखून ठेवता का? मग थांबा! डॉक्टरांचा हा सल्ला वाचा
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास

आवराआवर करताना वस्तू, फर्निचर हलवत असल्यास वेट ट्रेनिंग सुद्धा होते. या सगळ्यापेक्षा आणखी महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता केल्यावर त्या वातावरणातील प्रसन्नता मानसिक आरोग्याला सुद्धा हातभार लावले. थोडक्यात काय तर एक तासभर जरी तुम्ही घराची स्वच्छता करण्यासाठी वेळ काढला तरी त्याचा प्रभाव २० मिनिटांच्या व्यायामाइतका किंवा त्याहून जास्त असू शकतो. नेमकं कोणतं काम तुमची कशी मदत करू शकतं हे पाहा..

  1. फर्निचर, बॉक्स आणि इतर घरगुती सामान उचलताना आणि हलवताना ताकद लागते व असं करताना स्नायू सक्रिय होतात.
  2. उंच कपाटाच्या वरपर्यंत पोहोचणे, वस्तू उचलण्यासाठी वाकणे आणि कानाकोपऱ्यात स्वच्छता करणे यामुळे सांध्यांची लवचिकता सुधारते.
  3. साफसफाईसाठी सतत हालचाल आवश्यक असते, ज्यामुळे कॅलरी बर्न होतात आणि चयापचय सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते.
  4. स्वच्छता केल्यावर, एकूणच पसारा कमी होतो, वस्तू जागच्या जागी दिसतात, यामुळे तणावातूनही सुटका मिळते. तुमचे विचार सुद्धा कपाटातल्या एखाद्या खणाइतकेच नीट व्यवस्थापित होऊ लागतात. यामुळे उत्पादकता, एकाग्रता, स्पष्टता वाढू शकते.
  5. स्वच्छता करताना जेव्हा शरीर सक्रिय होतं तेव्हा शरीरात एंडोर्फिनचा प्रवाह उत्तेजित होतो, हा एक न्यूरोट्रांसमीटर आहे जो मूड सुधारण्यास व आनंदी राहण्यास मदत करू शकतो.

घरगुती काम करताना किती कॅलरीज बर्न होतात?

आता आपण मुद्द्याकडे वळूया. फायदे जरी असले तरी आपल्या मुख्य प्रश्न हाच असतो की घरगुती काम करताना कॅलरीज किती बर्न करता येतील. तर, समजा..

तुम्ही व्हॅक्युम क्लिनरने किंवा झाडूने अर्धा तास केर कचरा काढत असाल आणि तुमचे वजन ७० किलोग्रॅम असेल तर साधारण १२५ कॅलरीज बर्न होऊ शकतात. जर तुमचे वजन ८० किलोपेक्षा जास्त असेल तर ३० मिनिटांसाठी वाहनांची स्वच्छता करताना आपण २०० कॅलरीज बर्न करू शकता. बेडवरील चादर बदलणे, किचन ओटा स्वच्छ करणे, पलंगाच्या खालून कचरा काढणे/ धूळ पुसणे ही कामं ३० मिनिटांसाठी केली तरी आपल्याला २०० कॅलरीजला सहज बर्न करता येऊ शकतं.

हे ही वाचा<< मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी ‘या’ वेळी व ‘इतका’ वेळ झोपणं गरजेचं! खाणं-पिणं, व्यायामाशिवाय ‘ही’ चूक ठरते घातक

ही सगळी माहिती खरी असली किंवा तज्ज्ञांनी सांगितलेली असली तरी कृपया कोणतीही क्रिया करताना अतिरेक करू नका. खूपच वेगाने काम करायला जाणं, खूपच जड वस्तू उचलणं यामुळे तणाव वाढू शकतो. शक्यतो साफसफाईचा कालावधी हा आनंदी वेळ असुद्या, छान गाणी लावू शकता, स्वच्छता झाल्यावर आपल्याला एखादं बक्षीस देऊ शकता.