हलगी हे पारंपारिक वाद्य आहे. हे एक चर्मवाद्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात उत्सव आणि समारंभामध्ये हलगी वादन केले जाते. सोशल मीडियावर अनेकदा हलगी वादनाचे आणि हलगीवर नाचणाऱ्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हलगीच्या नावाने अनेक गाणी देखील गायली जातात. “बोल मे हलगी बजाऊ क्या”, “हलगी वाजती” अशी काही गाणे प्रसिद्ध आहे. अशाच एका गाण्यावर नृत्य करणाऱ्या चिमुकल्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकल्यांनी राधा खुडे यांनी गायलेले हलगी वाजती या गाण्यावर नृत्य केले आहे. चिमुकल्यांनी पारंपरिक नऊवारी आणि दागिने परिधान केले आहेत. ज्या उर्जेने आणि उत्साहाने या गाण्यावर चिमुकल्या नाचल्या आहेत ते पाहून नेटकरी चक्रावले आहेत. चेहऱ्यावरील हावभाव नेटकरी पाहतच राहिले आहेत.

.

हलगी वाजती गाण्याचे कडवे

“चैत्र पौर्णिमेचा थाट,
भक्तांचा गजबाजट,
लाईटीचा लकलकाट,
दारू गोळ्याचा कडकडाट,
पालकी हारानं तुरीनं अब्दागीरन साजती,
पुढ बाय रांगनाग रांगनांग रागंनाग हालगी वाजती
पुढ बाय रांगनांग रांगनांग रागंनांग हालगी वाजती…”

याच कडव्यावर चिमुकल्यांनी नृत्य सादर केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. इंस्टाग्रामवरshreekaradeyogadanceinstructorनावाच्या पेजवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी चिमुकल्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

अनेकांनी “अप्रतिम सुंदर”, “खूप सुंदर”,”खूप छान”, “भारी” कडक, “खूप मस्त”, “एक नंबर”, “सुपर”, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

तर एकानेनी कमेंट केली की,” “नाद करायचा नाय, डान्सर मुलींचा”

दुसऱ्याने कमेंट केली, “काय एनर्जी आहे राव”

आणखी एकाने कमेटं केली की “डान्सपेक्षा तलवार बाजी शिकवा”