इंडोनिशियामधील ‘फिटनेस इन्फ्लुएंसर’चा बारबेल उचलताना मान मोडून मृत्यू झाला. व्यायामशाळेत जाणारे अनेक लोक आपल्या शारीरिक मर्यादेहून अधिक व्यायाम करण्याचा प्रयत्न करतात. लवकरात लवकर शरीरयष्टी कमावण्याच्या मोहामुळे अतिव्यायाम करतात. प्रोटीनशेक्सचा वापर, अतिव्यायाम, शारीरिक मर्यादांचा अंदाज न येणे, यामुळे व्यायाम करताना शारीरिक इजा होण्याची शक्यता असते. कधीकधी यामध्ये मृत्यूही होऊ शकतो. यामुळे व्यायामशाळेत व्यायाम करताना, तसेच व्यायामादरम्यान होणारे अपघात, शारीरिक इजा टाळण्यासाठी कोणते उपाय करता येऊ शकतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जस्टिन विकी या ‘फिटनेस इन्फ्लुएंसर’चा मृत्यू का झाला ?

इंडोनिशियामधील जस्टिन विकी हा ‘फिटनेस इन्फ्लुएंसर’ आहे. वेटलिफ्टिंगमध्ये २१० किलोपर्यंत वजन उचलण्याचे विक्रम त्याच्या नावावर आहेत. जस्टिन व्यायामशाळेत वजन उचलण्याचा सराव करत होता. परंतु, अधिक वजनाचे बारबेल उचलून ते मानेवर पडले आणि मान मोडून त्याचा मृत्यू झाला.
कार्यात्मक औषधतज्ज्ञ विजय ठक्कर सल्ला देतात की, वजन उचलण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी योग्य तंत्र शिकणे आवश्यक आहे. वजन उचलताना पूर्ण शरीरावर भार येतो. त्यामुळे पायाच्या शिरांपासून ते मेंदूपर्यंतच्या सर्व शिरा आणि स्नायूंवर त्याचा ताण येतो. जस्टिनला उचललेले वजन झेपले नाही. पण, ते पाठी फेकून देण्याऐवजी त्याने पुढे फेकले. परंतु, ते त्याच्या मानेवर पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा : विश्लेषण : तुम्ही धूम्रपान सोडू इच्छिता? पण, विज्ञानाच्या मते…

‘वेटलिफ्टिंग’ची सुरुवात कशी कराल ?

व्यायामशाळेत कोणताही व्यायाम करताना विशिष्ट नियम असतात. त्याचे योग्य रीतीने पालन केले पाहिजे. वेटलिफ्टिंगची सुरुवात अर्थातच हलक्या वजनांपासून करा. हलकी वजने व्यवस्थित जमू लागली, त्यात योग्य समन्वय साधता येऊ लागला की, वजन वाढवत न्या. परंतु, शारीरिक मर्यादेहून अधिक वजने उचलू नका. वजन उचलण्याची किंवा ते टाकून देण्याची घाई करू नका. रोजच्या रोज वजने बदलू नका. ठराविक अंतराने आणि शरीराला ‘कम्फर्टेबल’ वाटेल एवढीच वजने वापरा. ट्रेनर किंवा एक्स्पर्ट यांचा सल्ला घ्या. सर्व नियम तसेच वजन उचलताना आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास काय केले पाहिजे, हे आधी समजून घ्या. तुमचे शरीर जेवढे वजन घेऊ शकते तेवढेच वजन उचला. शरीराला त्रास होईल, मर्यादेबाहेरील वजने उचलू नका.

हेही वाचा : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड; समाजात अशी विकृती येते कुठून ? प्रत्येक वेळी शिक्षा महिलांनाच का ?

तंत्र जाणून घ्या

वेटलिफ्टिंगला सुरुवात करण्याआधी तुमच्या शारीरिक क्षमतेच्या चाचण्या करून घ्या. योग्य मार्गदर्शकाची मदत घ्या. व्यायामशाळेत ट्रेनरकडून वेटलिफ्टिंगसंदर्भातील सर्व माहिती घ्या. मार्गदर्शकांच्या समोर सुरुवातीला सराव करा.

योग्य श्वसन करा

वजन उचलताना आपल्यापैकी बहुतेकांना आपला श्वास रोखून ठेवण्याचा मोह होतो. योग्य मार्ग म्हणजे वजन उचलताना श्वास सोडणे आणि वजन कमी करताना श्वास घेणे. श्वास रोखून धरल्यामुळे हृदयावर भार येण्याची शक्यता असते. श्वसन नियमित ठेवा.

शारीरिक क्षमता राखा

वेटलिफ्टिंग हे तुमच्या शारीरिक क्षमतांवर अवलंबून असते. शरीर कमावताना योग्य व्यायामाला पौष्टिक आहाराचीही आवश्यकता असते. स्नायूंच्या मजबुतीकडे लक्ष द्या. स्नायूंच्या बळकटीसाठी योग्य आहार घ्या.

आवश्यक विश्रांती

वेटलिफ्टिंग करताना सतत करू नका. यामुळे शरीरावर ताण येऊ शकतो. योग्य ती विश्रांती घ्या. आठवड्यातून एक दिवस शरीरालाही विश्रांती द्या. वेटलिफ्टिंगदरम्यान ब्रेक घ्या.


वॉर्म-अप करा

जिमला गेल्यावर थेट व्यायामाला सुरुवात करू नका किंवा वेटलिफ्टिंग करू नका. योग्य वॉर्म-अप करा. विश्रांती घेतलेल्या शरीराला व्यायामाच्या प्रक्रियेत आणा. वॉर्म-अपमुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते.

महत्त्वाचे म्हणजे, ओव्हरलोड म्हणजे अतिवजन उचलू नका. शरीराच्या मर्यादांचा विचार करा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are dos and donts to avoid gym accidents vvk
Show comments