How Can I Bring My Blood Pressure Down : रक्तदाबाची समस्या सर्व वयोगटांतील लोकांमध्ये दिसते आहे. जर रक्तदाब मर्यादेपेक्षा जास्त वाढला, तर त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसह अनेक जीवघेण्या परिस्थिती उद्भवू शकतात. हे टाळण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी मिठाचे सेवन कमी करण्याचे आणि ताणतणावाचे व्यवस्थापन करणे फायदेशीर ठरते. पण, वेलनेस कन्सल्टंट माइनो यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडियावर रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे ध्येय साध्य करण्याचे पाच अनोखे मार्ग शेअर केले आहेत. ते खालीलप्रमाणे :
जेवणानंतर १५ मिनिटे चला (Take 15 Minute Walk After Lunch)
तुमच्या घरात किंवा पायऱ्या चढून १५ मिनिटे चाला. जेवणानंतर फक्त १० मिनिटे चालल्याने तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीत लक्षणीय फरक पडू शकतो.
नाश्त्यासाठी कार्बोहायड्रेट्सऐवजी प्रथिन निवडा (Choose Protein Over carbs for breakfast)
साध्या ओटमीलमध्ये बेरी आणि ओट्स घाला. प्रथिनेयुक्त नाश्त्यामुळे तुम्हाला पोट भरल्याची अनुभूती देतो आणि रक्तातील साखर स्थिर करण्यास मदत करतो.
जेवण किंवा नाश्त्यात पाच ग्रॅम फायबर खा (Five Grams Of Fiber Per Breakfast)
फायबर हे महत्त्वाचे आहे. सकाळी बेरी, दुपारच्या जेवणात उच्च फायबर स्मूदी आणि रात्रीच्या जेवणात भरपूर भाज्या, असे फायबरयुक्त पदार्थ खाऊन दररोज २५-३० ग्रॅम फायबर घेण्याचा प्रयत्न करा.
सात ते नऊ तासांच्या झोपेला प्राधान्य द्या (Prioritise 9 Hours Of Sleep )
गुणवत्तायुक्त झोप रक्तातील साखर नियंत्रित करते. तुमच्या झोपेच्या चक्रात सुधारणा करण्यासाठी झोपण्याच्या वेळेच्या एक तास आधी तुमची दिनचर्या निश्चित करा आणि समाजमाध्यमांचा वापर करणे सोडून द्या.
ताण व्यवस्थापित करा (Manage stress Effectively)
तुमच्यासाठी काय चांगले आहे ते शोधून कॉर्टिसोल स्ट्रेस हॉर्मोन कमी करा. त्यामध्ये टॅपिंग, चालणे, वाचन करा किंवा फक्त एक कप कॉफीच प्या.
पण, व्हायरल टिप्स पडताळण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संवाद साधला. आणि या उपायांचे पालन केल्याने तुमचा रक्तदाब खरोखर कमी होण्यास मदत होऊ शकते का हे जाणून घेतले…
मुंबईतील परळ येथील ग्लेनिगल्स हॉस्पिटलच्या अंतर्गत औषध क्षेत्रातील वरिष्ठ सल्लागार डॉक्टर मंजुषा अग्रवाल यांनी मान्य केले की, पुरेशी झोप आणि ताण व्यवस्थापन रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत साधे बदल करून तुम्ही तुमच्यावर येणाऱ्या ताणाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला शांत राहण्यास मदत करणाऱ्या गोष्टी करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा. त्यामध्ये खोल श्वास घेणे, ध्यान करणे, फिरायला जाणे, संगीत ऐकणे, तुमचा आवडता चित्रपट पाहणे किंवा सोफ्यावर झोपणे यांसारखे सोपे उपाय समाविष्ट असू शकतात.
कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुधीर कुमार यांच्या मते, सात ते नऊ तास झोपल्याने शरीर बरे होण्यास मदत होऊन ताण कमी होतो. तुम्ही दिवसामधून ३० मिनिटे माइंडफुलनेस (mindfulness), ध्यान किंवा योगासने करावीत. तसेच आठवड्यातून तीन दिवस किमान २५ मिनिटे गाणी ऐकण्याची माइंडफुलनेस पद्धतदेखील मनाला आराम देण्यास मदत करू शकते, असे डॉक्टर सुधीर कुमार म्हणाले आहेत.
तिने असेही सांगितले की, फायबरचा समावेश करणे आणि कार्बोहायड्रेट्सपेक्षा प्रथिने निवडणे वजन व्यवस्थापनात मदत करते, ज्यामुळे तुम्हाला अधिक तृप्त वाटण्यास आणि तुमच्या व्यायामाचे परिणाम सुधारण्यास मदत होते. तसेच ही बाब रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी साह्यभूत ठरू शकते. तुम्ही दिवसभरात किमान ३० ते ५० मिनिटे योगा, स्ट्रेचिंग, वेगात चालणे, सायकलिंग, पोहणे, कार्डिओ किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग यांसारखे विविध व्यायाम किंवा शारीरिक क्रियाकलाप करावेत, असा सल्ला डॉक्टर अग्रवाल यांनी दिला आहे.
बैठ्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे दिवसभर हालचाल करण्यासाठी वेळ काढा. विशेषतः जेवणानंतर किमान १० मिनिटे चालायला जा. याव्यतिरिक्त त्यांनी संतुलित आहार घेण्याचे आणि तेलकट किंवा जंक फूड टाळण्याचे महत्त्वदेखील अधोरेखित केले. जर तुम्ही सतत धूम्रपान किंवा मद्यपान करीत असाल, तर तुम्ही ही सवय सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जास्त प्रमाणात मद्यपान किंवा धूम्रपान उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरू शकते. धूम्रपान किंवा मद्यपान पूर्णपणे सोडल्याने तुमचे एकूण आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होऊ शकते, असे डॉक्टर अग्रवाल म्हणाले आहेत.