What are the benefits of besan : बेसनपासून अनेक चविष्ट पदार्थ तयार केले जातात. बेसनापासून तयार केलेले ढोकळे, भजी, झुनका या सारखे चविष्ट पदार्थांचा तुम्ही नक्कीच आस्वाद घेतला असेल. बेसनाची मिठाई तर तोंडात पाणी आणते. पण तुम्हाला माहितीये का? चव वाढवण्यासह बेसन आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे. बेसनातील आयरन, फायबर, पोटॅशियम आणि इतर पोषक तत्व हे शरीर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. बेसनाचे आरोग्यदायी फायदे कोणते? याबाबत जाणून घेऊया.

१) रक्ताची गरज पूर्ण करते

Here Is How You Can Grow Your Eyebrows Faster and Thicker 10 tips
कमी खर्चात भुवया छान दाट व जाड करण्याचे १० सोपे उपाय; कसा वापर करायचा जाणून घ्या
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
back pain, back pain news, health news, health tips,
Health Special : कंबरेचं दुखणं टाळण्यासाठी काय करावं?
Ghee tea benefits
खरंच तूपयुक्त कॉफीप्रमाणे तूपयुक्त चहा आहे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या, तुपाच्या चहाचे फायदे
Making modak for beloved bappa
लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवत आहात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या मोदकाचे फायदे
Which finger should you get a glucometer test done on?
तुम्हालाही डायबिटीज आहे का? मग टेस्ट करताना कोणत्या बोटावर करायची? जाणून घ्या
Health centers should be capable of diagnosing cancer
‘कर्करोग निदानासाठी आरोग्य केंद्रे सक्षम हवीत’
Fresh ginger vs dried ginger: Which is better for your health?
ताजे आले की वाळलेले आले? आरोग्यासाठी कोणते फायदेशीर; जाणून घ्या कोणते आले वापरायचे?

बेसनामध्ये शरीरासाठी उपयुक्त पौष्टीक तत्व असतात. बेसनात पुरेशा प्रमाणात लोह असते. बेसनाच्या सेवनाने रक्ताचे प्रमाण वाढवण्यात मदत होऊ शकते. जर तुम्हाला अ‍ॅनिमिया असेल तर बेसनाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. दैनंदिन आहारात बेसानाचा समावेश केल्यास शरीरातील लोहची कमतरता भरून येण्यात मदत होऊ शकते.

(Heart fail कधी होणार? या बाबत काही आठवड्यांपूर्वीच कळणार! ‘या’ तंत्रज्ञानाची जगात चर्चा, असे करते काम)

२) उच्च रक्तदाब नियंत्रणात आणू शकते

बेसनात मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते, ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या आहे ते दैनंदिन आहारात बेसनाचा समावेश करू शकतात.

३) हृदयासाठी लाभदायी

बेसन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. बेसनात विरघळणारे फायबर असते जे हृदयासाठी फायदेशीर असते. बेसनाच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका टाळण्यास मदत होऊ शकते.

(हाडं कडाकडा मोडतात? गुळाचे पाणी ‘या’ पद्धतीने प्यायल्यास ‘या’ ५ आजारात मिळू शकतात आश्चर्यकारक फायदे)

४) मधुमेहात उपयुक्त

बेसनात ग्लायसेमिक इंडेक्स फार कमी असते ज्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरते. ते रक्तातील इन्सुलीनचे प्रमाण कमी करते. मधुमेह असल्यास बेसनाची चपाती खाऊ शकता.

५) गरोदरपणात फायदेशीर

गर्भवती महिलांसाठी बेसन फायदेशीर आहे. बेसनात फोलेट आणि ‘जीवनसत्व क’चे प्रमाण अधिक असते जे गरोदरपणात आवश्यक असते.

६) वजन कमी करण्यात मदत करू शकते

बेसन वजन कमी करण्यात मदत करू शकते. बेसनात कॅलरीचे प्रमाण फार कमी असते. वजन कमी करायचे असल्यास आहारात बेसनाचा समावेश केला पाहिजे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)