Why should we practice yoga : शरीराला चांगल्या सवई या नेहमी सरावातून लागतात, असे अभिनेत्री मलाईका अरोराचेदेखील मानणे आहे. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून योगा करतानाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओखाली, “योग माझ्यासाठी फक्त व्यायाम नसून… तो माझ्यासाठी जगण्याचा एक मार्ग आहे”, असे कॅप्शनदेखील लिहिले आहे.

या व्हिडीओमध्ये मलाईका सूर्यनमस्कार करताना दिसत आहे. सूर्यनमस्कार हा एक प्रवाही पद्धतीने केला जाणारा योगा प्रकार आहे. यामध्ये विविध आसने आणि प्राणायाम यांचा समावेश असतो. “सूर्यनमस्कार हा केवळ शारीरिक व्यायाम नसून यामध्ये शरीर आणि मनाची सांगड घालणे, तसेच आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक पैलूंचा समावेश केला जातो”, असे फिटनेसतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी सांगितले असल्याचे, ‘द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून समजते.

Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
10 December Mesh To Meen Horoscope in Marathi
१० डिसेंबर पंचांग: आज वृषभसह ‘या’ राशींच्या कुंडलीत धनलाभाचा योग; आज काय घडल्याने १२ राशींचे मन होईल प्रसन्न? वाचा मंगळवारचे राशिभविष्य
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Mushrooms benefits Eating 5 Mushrooms Daily May Help Combat Heart Disease And Dementia
दररोज ५ मशरूम खाल्ल्याने शरिरावर काय परिणाम होतात; फायदे ऐकून लगेच आहारात समावेश कराल
8 December Aries To Pisces Horoscope Today
८ डिसेंबर पंचांग: कोणाला होईल अचानक धनलाभ ते कोणाचा वाढेल ताण; जन्मराशीनुसार आजचा रविवार १२ राशींसाठी कसा असणार?
Morning Mantra
Morning Mantra: मॉर्निंग वॉक करताना चालावे की धावावे? वजन कमी करण्यासाठी कोणता व्यायाम ठरेल जास्त फायदेशीर?

हेही वाचा : ‘लठ्ठपणा’ आणि ‘मधुमेह’ नियंत्रणासाठी ‘टाइम-रिस्ट्रिक्टेड डाएट’ फायदेशीर? काय सांगतात डॉक्टर, जाणून घ्या

आपण योगा का करावा? त्याचे फायदे काय?

योगासने करणे किंवा योगाभ्यास केल्याने त्याचे आपल्या शरीरावर, मनावर आणि भावनांवर खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतात. शरीराची लवचिकता वाढवण्यापासून ते मानसिक आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत, आपल्या शरीराचे संपूर्ण आरोग्य उत्तम राखण्यासाठी योगासनांना अत्यंत महत्त्व दिले जाते.

जर दररोज योगा केला तर त्याचा फायदा स्नायूंच्या लवचिकतेवर, तसेच तुमच्या एकंदरीत हालचालींवर होत असतो, असे गोयल म्हणतात. “शरीराचा कडकपणा घालवून शरीर जेव्हा लवचिक होते, तेव्हा दैनंदिन आयुष्यात हालचाही करताना, व्यायामादरम्यान होणाऱ्या किरकोळ दुखापतींचा धोकासुद्धा कमी होऊ शकतो”, असे त्या म्हणतात.

योगासने जरी शरीराचा कडकपणा घालवण्याचे काम करत असले, तरीही याचा फायदा स्नायूंच्या मजबुतीसाठी होतच असतो. “अनेक योगासनांमध्ये तुम्हाला एखाद्या विशिष्ट अवस्थेमध्ये काही काळासाठी तसेच राहावे लागते आणि यासाठी शरीरातील वेगवेगळ्या भागांमधील स्नायूंची गरज भासते. परिणामी हळूवारपणे योगासनातून तुमच्या स्नायूंना बळकटी देण्याचे काम होत असते. तसेच स्नायू टोन [muscle tone] करण्याचे कामही केले जाते”, असे गोयल सांगतात.

योगामध्ये आरामात आणि शांतपणे केल्या जाणाऱ्या हालचाली, स्ट्रेचिंग हे आपल्या सांध्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. “आपल्या सांध्यांना वंगण देण्याचे काम करून, तसेच त्यांच्या हालचालींच्या गतीमध्ये सुधारणा करून सांध्यांची दुखणी, खासकरून संधिवातावर योगासनांचा चांगला प्रभाव पडू शकतो.”

हेही वाचा : प्रेमात पडल्यावर वाढू शकते व्यक्तीचे ‘वजन अन् लठ्ठपणा’? ‘ही’ कारणं पाहून, त्यावरचे उपाय जाणून घ्या…

मानसिक ताण हलका करणे हा तर योगासनांचा सर्वात प्रसिद्ध असा फायदा असल्याचे समजले जाते. मात्र असे का? “एकाग्रतेने केले जाणारे श्वासोच्छ्वास आणि केंद्रित हालचालींमुळे पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय होण्यास मदत होत असते. त्यामुळे मन शांत होऊन स्ट्रेस हार्मोन्सची [तणाव संप्रेरके] पातळी कमी होते”, असे स्पष्टीकरण गोयल यांनी दिलेले आहे.

योगात शांतपणे केला जाणाऱ्या श्वासोच्छ्वास आणि मन व शरीर हे एक होण्यामुळे व्यक्तीच्या मनात सजगतेची [mindfulness] स्थिती निर्माण होते. यामुळे व्यक्तीचे चित्त शांत आणि एकाग्र होण्यास मदत होते. “योगामध्ये शरीर आणि मन एक होण्याचा फायदा व्यक्तीच्या भावनांवर, मानसिक आरोग्यावरदेखील होतो. आत्मचिंतनाद्वारे व्यक्ती त्यांच्या भावना, विचार यांची गुंतागूंत सोडवण्याचा प्रयत्न करू शकतात. योगामुळे तो मनातील गोंधळ बाजूला करून, भावनिक संतुलन साधू शकतो”, असे गोयल म्हणतात.

Video credit – @malaikaaroraofficial

योगाभ्यास करणे किंवा नियमित योगा करण्याने व्यक्ती या सरावाचे होणारे फायदे अनुभवू शकतो. तसेच ज्यांना त्याचे आयुष्य अधिक संतुलित आणि परिपूर्ण करायचे असते, अशा व्यक्ती योगाचा मार्ग स्वीकारत असतात.

Story img Loader