वैद्य अश्विन सावंत

आचार्य वाग्भट यांनी काश्मीर मध्ये इसवी सन ५५० ( 550 AD) मध्ये रचलेल्या अष्टांगसंग्रह या आयुर्वेदामधील महत्त्वाच्या ग्रंथामध्ये मानवी आरोग्य ढासळण्याची कारणे दिली आहेत, ती आज २१ व्या शतकात तुम्हांला आम्हांला लागू होतात का ते बघा.

Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
20 years after Indian Ocean tsunami
Indian Ocean Tsunami: २००४ च्या त्सुनामीची भीषणता २० वर्षांनी काय शिकवून गेली?
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
fish die due to polluted water in miraj
मिरजेत प्रदूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत; मिरजेतील ऐतिहासिक गणेश तलावातील घटना
Loksatta editorial Dr Babasaheb Ambedkar Lok Sabha Elections Constitution Convention
अग्रलेख: कोणते आंबेडकर?
Will neutering leopards stop human leopard conflict
बिबट्यांच्या नसबंदीने मानव-बिबटे संघर्ष थांबणार का? हा उपाय व्यवहार्य आहे का?
CAG report reveals errors in Maharashtras health services from 2016 to 2022
राज्यातील आराेग्य व्यवस्थेवर कॅगचे ताशेरे

अति प्रमाणात अन्नसेवन करणे
भूक नसतानाही अन्न सेवन करणे

आंबट,खारट,तिखट,क्षारयुक्त आहार सेवन करणे

कोरडे अन्नपदार्थ खाणे

अभिष्यन्दी( शरीरात स्त्राव व सूज वाढवणारा) आहार सातत्याने अतिप्रमाणात खाणे जसे- दही, उडीद, मासे

ग्राम्य आहार सेवन करणे
(ग्राम्य आहार म्हणजे गावामध्ये पाळलेले प्राणी जसे घोडा, गाढव, डुक्कर, गाय, बैल, खेचर, यांचे मांस)

असात्म्य (तुमच्या शरीराला – आरोग्याला अनुकूल नसलेला) आहार सेवन करणे.

हेही वाचा : Mental Health Special : तुम्ही तुमचा फोन, टॅब सार्वजनिक ठिकाणी चार्जिंगला लावलाय का?

विरुद्ध आहार सेवन करणे
(तुमची प्रकृती, अग्नी, बल, व्यायामशक्ती, प्रदेश, अनुवंशिकता, सवयी, आवड, आहार गुण-दोष वगैरे घटकांचा विचार न करता केलेले आरोग्य विरोधी अन्न पदार्थांचे सेवन)

कुजलेला-सडलेला आहार खाणे
सुकलेल्या भाज्या खाणे
सुकलेले मांस खाणे
शिळे जेवण खाणे

नवीन (नुकतेच शेतातून आणलेले) धान्य खाणे.
तीळ, कुळीथ, दही, शिरका, कांजी यांच्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे नित्य सेवन
पिष्टान्न (पीठापासून तयार केलेल्या पदार्थांचे) नित्य सेवन

अंकुरीत धान्यांचे नित्य सेवन

वरील पदार्थांचे अतिप्रमाणात दीर्घकाळ सेवन.

हेही वाचा : Health Special : वाढतं वय दिसतं, ते कसं थोपवायचं?

नियमित मद्यपान करणे,
अति प्रमाणात मद्यपान करणे
रोज मैथुन ( शरीर संबंध)करणे,
मद आणणार्‍या पदार्थांचे सेवन करणे, जसे तंबाखू, गुटखा, भांग,गांजा,मारुज्वेना,वगैरे

दिवसा झोपणे
अयोग्य प्रकारे वा अतिप्रमाणात व्यायाम करणे
अति परिश्रम (अति प्रमाणात कष्टाची कामे करणे)

अति क्रोध करणे
अति लोभ करणे
भय, शोक, चिंता यांना तोंड देणे

Story img Loader