सध्या डीपफेक तंत्रज्ञान वापरुन केलेले खोटे व्हिडीओ चर्चेत आहेत. पंतप्रधानांनीही याबाबत काळजी व्यक्त केली आहे आणि सायबर जनजागरण आवश्यक आहे असं म्हटलं आहे. नुकतीच दिवाळी झाली. आता ख्रिसमस आणि नवीन वर्ष येईल. पुन्हा एकदा निरनिराळ्या प्रकारचे सेल, डिस्काऊंट्स यांच्यासकट खऱ्या- खोट्या माहितीचा पूर वाहू लागेल. कुठलाही महत्वाचा सण, राष्ट्रीय दिवस किंवा महान व्यक्तींची जयंती पुण्यतिथी आली की व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी आणि इंटरनेटच्या बाजारात खोटी, अर्धवट आणि तोडमोड केलेली म्हणजेच फेक माहिती झपाट्याने पसरायला सुरुवात होते. कशावर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही हे ही अनेकदा अनेकांना लक्षात येत नाही, इतका प्रचंड वेग या माहितीच्या प्रसारणाला असतो. अनेकदा तर माहितीची शहानिशाही केली जात नाही कारण मिळालेल्या माहितीचं रुपडं खरं वाटावं असंच असतं.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फेक अकाउंट्स आणि प्रोफाईल्स रोज तयार होत असतात. सोशल मीडिया कंपन्यांनी कितीही सफाई केली तरी रोजच्या रोज फेक अकाऊंट्सचा कारखाना सुरूच आहे. खोट्या माहितीची जागतिक बाजारपेठ अब्जावधी रुपयांची आहे. खोट्या माहितीची जागतिक बाजारपेठ ७८ दशकोटी डॉलर्सची आहे. (युनिव्हर्सिटी ऑफ बाल्टिमोर,२०१९) असं मानलं जातं की इंटरनेटवरची ५० टक्क्यांहून अधिक माहिती खोटी आणि तोडमोड केलेली असते. २०२० मध्ये फेसबुकवर १.८ दशकोटी फेकन्यूज होत्या. आज २०२३ मध्ये हा आकडा काय असेल? मायक्रोसॉफ्टच्या डिजिटल सिव्हिलिटी इंडेक्सनुसार जगात ५७ टक्के लोकांनी फेकन्यूज पहिली असेल तर भारतात तो आकडा ६० टक्के आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये १८० देशांत भारताचा क्रमांक दीडशेवा आहे. थोडक्यात काय तर आपल्यापर्यंत आणि आपल्या मुलांपर्यंत रोज भरपूर खोटी माहिती पोहोचत असते आणि आपल्याही नकळत आपण आणि आपली मुलं या माहितीचे वाहक म्हणून काम करत असतो.

Union Finance Minister Nirmala Sitharaman highlighted mental health in Economic Survey 2024 25 report
तरुणांचे मानसिक आरोग्य कशामुळे बिघडते ? काय म्हणतो आर्थिक सर्वेक्षण अहवाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार झालेला कृष्णा आंधळे कोण? सुरेश धस यांनी दिली महत्त्वाची माहिती
yamuna revier
यमुनेच्या पाण्यावरून वादाचे तरंग; केजरीवाल यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
Who is Liang Wenfeng?
Liang Wenfeng : लियांग वेंगफेंगची जगभर चर्चा! कोण आहे अमेरिकेत खळबळ उडवून देणाऱ्या ‘डीपसीक’चा कर्ताधर्ता?
Vishwas Nangare Patil told amazing poem of Suresh Bhat
Video : “कधीही हरल्यासारखे वाटेल तेव्हा हे ऐका” विश्वास नांगरे पाटील यांनी सादर केली सुरेश भटांची ही अप्रतिम कविता
Role of government in public health
आरोग्य व्यवस्था ही सरकारचीच जबाबदारी! 

हेही वाचा : कोणते आसन स्नायू बळकट अन् झपाट्याने वजन कमी करण्यास मदत करू शकतात? योग तज्ज्ञांनी दिलं उत्तर…

समाजोपोयोगी आणि जागरूकतेच्या भावनेच्या अतिरेकातून, मलाच पहिल्यांदा समजलं आहे असं वाटून, फॉरवर्ड केलं तर ‘बिघडलं कुठे’ असा विचार करून धडाधड मेसेजेस फॉरवर्ड केले जातात. अशा खोट्या फॉरवर्ड पोस्टच्या गैरसमजातून लोकांचे मृत्यू ओढावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा घटना तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रासह २० राज्यातून नोंदवल्या गेल्या आहेत. माणूस नेहमीच अफवांवर विश्वास ठेवत आला आहे. शहानिशा करण्याइतका धीर अनेकदा माणसांना नसते. त्यातून जे काही लिखित असतं, ते खरं असतं असा समज अनेकांचा असतो. त्यामुळे व्हॉट्सअॅपवरुन आलेलं सगळं खरं असतं असा समज अनेकांचा होतो.
 
दुसरं म्हणजे प्रश्न न विचारण्याची आपली वृत्ती. आपण स्वतःला आणि दुसऱ्यांना प्रश्न विचारात नाही. हे खरं असेल का? खरंच खरं असेल का? असे अगदी साधे प्रश्न आपल्याला प्रश्न पडत नाहीत. आलेला मेसेज खरा आहे का? माहिती योग्य आहे का? आणि हा मेसेज जर पुढे पाठवला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतील?  हे तीन अगदी मूलभूत प्रश्नही स्वतःला कुणीही विचारत नाही. असे प्रश्न विचारले पाहिजेत हे प्रशिक्षण आपण मुलांना देत नाही कारण मुलांना माध्यम शिक्षित करण्याबाबत आपण अगदीच उदासीन आहोत. त्यामुळे खोटी माहिती सहज चौफेर पोहोचते.

हेही वाचा : Health Special: दोन मणक्यांमधील गादी नेमकं काम करते तरी काय?

अमेरिकन मानसोपचारतज्ञ ऑलपोर्ट आणि पोस्टमन यांनी १९४७मध्ये अफवा या विषयावर एक संशोधन केले होते आणि त्यातून अफवांमागची मानसिकता मांडली होती. ज्याला ‘द बेसिक लॉ ऑफ रूमर्स’ असं नाव त्यांनी दिलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, कशाची अफवा तयार होईल हे तो विषय त्या समाजासाठी किती महत्वाचा आहे यावरुन ठरतं. विषयांचं गांभीर्य त्या लोकांना किती वाटतंय त्यानुसार अफवा किती गंभीर स्वरूप घेते हे अवलंबून असतं.

आता प्रश्न येतो तो फेक बातम्या आणि माहिती ओळखायची कशी? मुलांना प्रशिक्षित करायचे कसे?

काही मूलभूत मुद्दे बघूया! १) समजा, व्हॉट्सअॅप वर एखादा मेसेज आला आहे, तर त्यातले तपशील गुगल वर जाऊन चेक करा. त्या संदर्भातील बातम्या किंवा इतर खात्रीशीर माहिती योग्य सोर्समधून मिळतेय का ते पाहा. अनेक वेबसाइट्स आणि न्यूज पोर्टल्स हल्ली फॅक्ट चेक करत असतात. त्यामुळे गुगलवर असलेली माहिती खरी की खोटी हे समजू शकेल. जर खात्री पटली नाही तर फॉरवर्ड करू नका. २) जेव्हा तुम्ही गुगल सर्च करता, तेव्हा प्रत्येक लिंकवर तारीख असते, ती पाहा. म्हणजे मेसेज कधीचा आहे, कुठला आहे हे समजतं. अनेकदा परदेशी घटना त्याही जुन्या आपल्याच गावात झाल्यागत फेक माहिती फॉरवर्ड होत असते. ३) गुगलवर images.google.com वर जा. तिथे उजवीकडे तीन चिन्ह आहेत. त्यातला सर्च बाय इमेज पर्याय निवडा. त्यावर क्लिक केलं की तुम्हाला ज्या फोटोची माहिती हवी आहे तो अपलोड करता येतो. किंवा फोटोची लिंक असेल तर ती पेस्ट करता येते. मग सर्च केलं की फोटो खरा आहे की खोटा, मूळ फोटो कुठून आला आहे ही सगळी माहिती कळू शकते. ४) याशिवाय प्रेस इन्फॉर्मशन ब्युरोच्या वेबसाईट नुसार 918799711259 या व्हॉट्सअप नंबरवर किंवा socialmedia@pib.gov.in मेल आयडीवर संपर्क करुन भारत सरकारशी संबंधित माहिती खरी की खोटी तपासू शकता. ५) याखेरीज हे पाच प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवेत. जसेकी, ही माहिती खरी असू शकेल का? आहे का? आपण पूर्वग्रहदूषित विचार करतोय का? पोस्ट लॉजिकल आहे का? आपण जो फोटो बघतोय तो फोटोशॉप किंवा डीपफेक केलेला तर नसेल ना? एखादी गोपनीय माहिती न्यूज चॅनलकडे, वृत्तपत्राकडे असणं वेगळं आणि व्हॉट्स अॅप आणि सोशल मीडियावर अचानक फिरायला लागणं वेगळं. मिळालेली माहिती खोटी तर नाही का? हा मेसेज मी का फॉरवर्ड करतेय? त्याचा समोरच्याला उपयोग आहे का? त्याचा समोरच्याला त्रास होणार नाही ना? 

हेही वाचा : तुम्ही रोज तूप खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या….

खोटी माहिती ओळखणं इतकंही अवघड नाही, मात्र आपल्यापर्यंत जे पोहोचतं ते सगळं खरं नाही किंवा नसू शकतं हे मान्य केलं पाहिजे. आणि जोवर माहितीची शहानिशा होत नाही मी संबंधित माहिती इतर कुणाशीही शेअर करणार नाही हा विचार मनात पक्का हवा. माहिती पुढे ढकलण्याचा मोह आवरता आणि टाळता आला पाहिजे.

Story img Loader