भारतासह जगभरातील अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात कॉफी प्यायल्याशिवाय होत नाही. मात्र, तुम्ही रोज आवडीने पिता ती कॉफी शरीरासाठी किती फायदेशीर आहे की नाही? ती पिणे बंद केले तर त्याचे शरीरावर काय परिणाम होऊ शकतात? याबाबतची माहिती जाणून घेऊ या. कॉफीच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटलमधील सल्लागार जनरल फिजिशियन व डायबेटोलॉजिस्ट डॉ. रंगा संतोष कुमार यांच्या मते, कॅफिन चयापचय वाढवण्यासाठी, चरबी जाळण्यासाठी व भूक कमी करण्यासाठी ओळखले जाते. दररोज १०० मिलिग्रॅमच्या सेवनाने सुमारे १०० कॅलरी ऊर्जा वाढण्याची शक्यता असते.

कॉफीबाबत केलेल्या सुरुवातीच्या अभ्यासात असे आढळून आले की, कॉफीमुळे आरोग्याच्या समस्या उदभवू शकतात. पण, अलीकडील एका संशोधनात असे दिसून आले आहे की, कॉफी पिण्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारचे फायदे होतात. याबाबतचे पुरावेदेखील खात्रीशीर आहेत. त्यानुसार कॉफी आरोग्याच्या परिणामांच्या दृष्टीने हानिकारकपेक्षा आरोग्यदायी जास्त आहे, असेही डॉ. रंगा संतोष कुमार यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, “मध्यम कॉफीचं सेवन दिवसातून सुमारे दोन ते पाच कप टाईप-२ मधुमेह, हृदयरोग, यकृत व एंडोमेट्रियल कर्करोग, पार्किन्सन व नैराश्याच्या कमी शक्यतांशी संबंधित आहे.”

dead butt syndrome
तुम्हीही तासनतास बसून काम करता का? मग तुम्हाला होऊ शकतो डेड बट सिंड्रोम
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
triphala in excess is beneficial or harmful for health
जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
article analysis about close relationships zws 70
तुम्हालाही आहे जवळीकतेचं वावडं ?
What Happens If You Drink Coconut Water, Lemon Water, Ginger Shot Every Day
नारळ पाणी, लिंबू पाणी, आले गोळीचे रोज सेवन केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या
Making modak for beloved bappa
लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवत आहात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या मोदकाचे फायदे
Health Benefits of Milk in marathi
सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास दूध प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतात? वाचा, डॉक्टर काय सांगतात….
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?

डॉ. सोमनाथ गुप्ता, कन्सल्टंट फिजिशियन व डायबेटोलॉजिस्ट, यशोदा हॉस्पिटल, हैदराबाद यांच्या मते, गरोदर महिला, हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब असलेले लोक, झोपेचा त्रास, गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स रोग, चिंताग्रस्त समस्या आणि कॅफिनची संवेदनशीलता असलेल्यांनी मात्र कॉफी पिणे टाळावे.

हेही वाचा- सावधान! तुम्ही पण अ‍ॅसिडिटी झाल्यावर ‘ही’ घातक औषधे घेताय का? थांबा वाचा डॉक्टर काय सांगतात

एका महिन्यासाठी कॉफी सोडण्याचे सुरुवातीचे परिणाम काय?

जेव्हा तुम्ही एका महिन्यासाठी कॉफी पिणं बंद करता, तेव्हा तुमचं शरीर कॅफिनच्या अभावामुळे समायोजित कालावधीतून जाऊ शकते, असं डॉ संजय कुमार (एमडी मेडिसिन, सिग्नस लक्ष्मी हॉस्पिटल) यांनी सांगितले. तसेच सुरुवातीला तुम्हाला डोकेदुखी, थकवा, चिडचिडेपणा व लक्ष एकाग्र करण्यात अडचण यांसारख्या लक्षणांचा अनुभव येऊ शकतो. ही लक्षणे सहसा काही दिवसांनी कमी होतात. कारण- तुमचे शरीर कॅफिनच्या कमतरतेशी हळूहळू जुळवून घेते, असेही डॉक्टर म्हणाले.

डॉ. गुप्ता यांनी स्पष्ट केले की, एक महिन्यासाठी कॉफीचे सेवन बंद केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारू शकते. ऊर्जेसाठी कॅफिनवरील अवलंबित्व कमी होऊ शकते आणि कॉफी निर्जलीकरण करू शकते; ज्यामुळे चांगले हायड्रेशन होऊ शकते. याव्यतिरिक्त लोक त्यांच्या पचनामध्ये झालेले बदल लक्षात घेऊ शकतात. कारण- कॉफी कधी कधी पोटाच्या समस्या किंवा ॲसिड रिफ्लक्सला कारणीभूत ठरू शकते; जे कॉफीशिवाय महिनाभरानंतर सुधारू शकते.

हेही वाचा- हृदयासाठी सर्वात आरोग्यदायी आहेत ‘हे’ भारतीय पदार्थ? पोषणतज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण

कॉफी सोडण्याचे आरोग्य फायदे

चांगली झोप : कॅफिन तुमच्या झोपेच्या गुणवत्तेत व्यत्यय आणू शकते. त्यामुळे तुम्ही कॉफी पिणे बंद केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारू शकते; ज्यामुळे तुमची ऊर्जा पातळी वाढू शकते.

अवलंबित्व कमी होणे : कालांतराने काही लोक कॅफिनवर अवलंबून राहतात. कॉफी सोडल्याने हे अवलंबित्व कमी होण्यास मदत होते आणि दिवसभर ऊर्जा पातळी अधिक संतुलित होते.

ॲसिडचे सेवन कमी होते : कॉफी अम्लीय असल्यामुळे काही लोकांना पचनास त्रास होऊ शकतो. कॉफी पिणे बंद केल्याने ॲसिड रिफ्लक्स किंवा अपचनाशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात.

हायड्रेशन : कॉफीच्या जागी नॉन-कॅफिनयुक्त पेये उत्तम हायड्रेशनमध्ये योगदान देऊ शकतात; जे एकंदर आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

वजन कमी होते : जरी कॉफी सोडल्याने थेट वजन कमी होत नसले तरी साखर आणि मलईसारख्या उच्च-कॅलरी कॉफी ॲडिटीव्ह काढून टाकल्याने कॅलरीजचे सेवन कमी होऊ शकते; जे संभाव्य वजन व्यवस्थापनात योगदान देऊ शकते. तसेच वजन कमी करणे ही एक जटिल प्रक्रिया आहे; जी संपूर्ण आहार आणि शारीरिक क्रियाकलापांवरही अवलंबून असते.