Effects of drinking carbonated drinks: अनेक जण चायनीज, पिझ्झा किंवा बर्गर अशा प्रकारचे कोणतेही फास्ट फूड खाताना कोल्ड्रिंक्सदेखील आवर्जून पितात. खरं तर कोल्ड्रिंक्स आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहे हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक आहे. तरीही पालक आणि डॉक्टरांकडून वारंवार सावधगिरीचा इशारा देऊनही अशा प्रकारच्या पेयांचा आस्वाद घेण्याला अनेक जण पसंती देतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुम्ही फिजी ड्रिंक्सच्या सेवनामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?

उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधील आहारतज्ज्ञ डॉ. एकता सिंघवाल सांगतात की, जेव्हा आपण फिजी ड्रिंक्स घेतो तेव्हा कार्बन डाय-ऑक्साइड सोडतो; ज्यामुळे तोंड आणि घशात मुंग्या आल्यासारख्या संवेदना होतात. जसजसा कार्बन डाय-ऑक्साइड पोटात गेल्यावर गरम होतो आणि त्यामुळे काही जणांना ढेकर येणे, तर काही प्रकरणांमध्ये छातीत जळजळ होऊ शकते.

तत्काळ परिणामांच्या पलीकडे, या पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. त्यानंतर अनेकदा ऊर्जा कमी होते. डॉ. सिंघवाल सांगतात, “या साखरयुक्त पेयांचे नियमित सेवन केल्यास वजन वाढण्यास, दात किडण्यास आणि मधुमेह व हृदयविकार यांसारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्याव्यतिरिक्त कार्बोनेशनमुळे सूज आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.

अनेकांना कार्बोनेटेड पेये का आवडतात?

“अनेक लोक कार्बोनेटेड पेये आवडीने पितात. कारण- साखर, कॅफिन आणि कार्बोनेशन यांच्या मिश्रणाची चव आवडल्याने आगळ्या आनंदाची अनुभूती मिळते; पण त्यामुळे व्यसन लागण्याचा धोका असतो. साखर मेंदूच्या प्रणालीला चालना देते आणि त्यामुळे उत्साहाची भावना निर्माण होते. अनेक शीतपेयांमध्ये आढळणारे कॅफिन मेंदूला उत्तेजित करते, सतर्कता व अवलंबित्व वाढवते,” असे डॉ. सिंघवाल यांनी स्पष्ट केले.

सिंघवाल यांनी सांगितले की, आपल्या आहारात कार्बोनेटेड पेयांचा समावेश संयमाने केला पाहिजे. “ते अधूनमधून ट्रीट म्हणून आनंददायक असू शकते; परंतु वारंवार सेवन केल्याने त्यांच्या उच्च साखर सामग्रीमुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. आहारातून सोड्याचेही नियमितपणे सेवन केल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

अमेरिकन हार्ट असोसिएशनने महिलांसाठी दररोज साखरेचे सेवन २५ ग्रॅमपेक्षा कमी आणि पुरुषांसाठी ३६ ग्रॅमपर्यंत मर्यादित ठेवण्याची शिफारस केली आहे. चांगल्या आरोग्यासाठी त्यांनी सतत पाणी पिणे किंवा हर्बल टीसारख्या आरोग्यदायी पर्यायांचा विचार मांडला आहे.

हेही वाचा: सतत प्रोटीन बार खाल्ल्याने आरोग्यावर कोणता परिणाम होतो? तज्ज्ञांचे मत काय…

अशी पेये पिणे कोणी टाळावे?

फिजी ड्रिंक्सचा विचार केल्यास, मधुमेहींनी विशेषतः सावध असले पाहिजे. कारण- त्यातील साखरेचे उच्च प्रमाण रक्तातील साखरेच्या पातळीत लक्षणीय वाढ करू शकते. लठ्ठ व्यक्तींनीही या पेयांचे सेवन करणे टाळायला हवे आणि ज्यांना हृदयाची समस्या आहे त्यांनीदेखील या पेयांपासून दूर राहायला हवे. “ॲसिड रिफ्लक्स किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोम यांसारख्या गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या असलेल्या लोकांना कार्बोनेटेड पेयांमुळे बिघडलेली लक्षणे दिसू शकतात. गर्भवती स्त्रिया आणि मुलांना उच्च साखर व कॅफिन पातळीच्या चिंतेमुळे त्यांचे सेवन मर्यादित करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे आई आणि बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो,” असे त्यांनी सांगितले.

Story img Loader