Why Do We Hiccup : आपल्या जवळच्या व्यक्तीनी किंवा मित्रांनी आठवण काढली की उचकी लागते असा आपल्या सर्वांचा लहानपणापासून समज आहे. उचकी बऱ्याचदा अचानक उद्भवते आणि त्वरित त्रासदायक होऊ शकते. जरी उचकी सामान्यत: काही मिनिटांत थांबते, परंतु बऱ्याच काळ असलेल्या उचकीपासून लवकर मुक्त होण्यासाठी विविध मार्गांचा प्रयत्न करू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उचकीसाठी वैद्यकीय संज्ञा “सिंगुल्टस” आहे. शरीरविज्ञानाच्या दृष्टीने, जेव्हा डायफ्राम (उदरपटल – छातीतील व पोटातील पडदा) आणि इंटरकोस्टल स्नायू अचानक अनैच्छिकरित्या संकुचित होतात तेव्हा उचकी येते. स्वरयंत्र किंवा व्हॉइस बॉक्स एकाच वेळी आकुंचन पावते आणि व्होकल कार्ड्स बंद होतात, ज्यामुळे हवेचा प्रवाह प्रभावीपणे अडकतो.

भराभर खाणे किंवा पिणे यामुळे बऱ्याचदा उचकी येते. बहुधा उचकी कोणत्याही वैद्यकीय हस्तक्षेपाशिवाय आपोआप थांबते. उचकी लहानांपासून मोठ्या प्रौढांपर्यंत सर्वांनाच होऊ शकते. उचकी येण्याचे नेमके कारण नेहमी माहिती नसते. तथापि, उदरपटलातील मज्जातंतूंना त्रास देणारी कोणतीही स्थिती संभाव्यत: उचकी आणू शकते. इतर अनेक घटक देखील भूमिका बजावू शकतात.

हेही वाचा : Health Special: टकलावर केस उगवतात का?

उचकी कश्याने लागू शकते?

-मसालेदार पदार्थ खाणे
-गरम द्रव पदार्थ पिणे
-कार्बोनेटेड किंवा फसफसणारी पेये पिणे
-खूप वेगाने खाणे

-विशिष्ट औषधे घेणे- मोठ्या आकाराच्या किंवा जास्त प्रभावी, अनेक औषधी गोळ्या एकत्र घेणे
-तीव्र भावना किंवा तणाव अनुभवणे.

बहुतेक प्रकरणांमध्ये, उचकी काही मिनिटांतच स्वतःच निघून जाते. उचकीस कारणीभूत असलेल्या कोणत्याही मूलभूत परिस्थितीचा उपचार केल्यास त्यांची वारंवारता कमी होण्यास मदत होते.

हेही वाचा : दुपारच्या जेवणानंतर झोपण्याची इच्छा होते का? महिलांमध्ये ही इच्छा खूप तीव्र का होते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

उचकी कमी होण्यासाठीचे काही उपाय

श्वासोच्छवास आणि आसन

-उचकी सुरू झाल्यावर काही गोष्टी कराव्यात. श्वास घेणे आणि सुमारे 10 सेकंद श्वास रोखून ठेवणे, नंतर श्वास सोडण्यापूर्वी आणखी दोन वेळा श्वास घेणे
-कागदी पिशवीत श्वास घेणे पण पिशवीने डोके झाकणार नाही याची काळजी घेणे
-गुडघे छातीवर आणून त्यांना मिठी मारणे
-पुढे झुकून छाती हळूवारपणे संकुचित करा

खाणे-पिणे

उचकी थांबविण्यासाठी सुचविलेल्या अनेक तंत्रांमध्ये खाण्यापिण्याचा समावेश आहे. त्यामध्ये हे समाविष्ट आहे:
-बर्फाच्या पाण्याने गुळण्या करणे
-व्हिनेगरचे दोन थेंब तोंडात ठेवणे
-जिभेवर थोडी दाणेदार / खडी साखर ठेवणे आणि नंतर गिळणे
-हळूहळू खूप थंड पाणी पिणे
-लिंबाचा एक तुकडा चावणे

हेही वाचा : नैराश्यग्रस्त दीपिकाला रणवीरने दिली ‘अशी’ साथ; डिप्रेशनवर मात करण्यासाठी जोडीदार, कुटुंबीयांची भूमिका कशी हवी? डॉक्टर सांगतात…

प्रेशर पॉईंट्स

Acupressure तंत्रापैकी हे ही वापरता येते
-जिभेवर हळूवारपणे खेचणे, जे मज्जातंतूला उत्तेजित करू शकते आणि डायफ्रामचा त्रास कमी करू शकते
-डायफ्रामवर हलकेच दाबणे
-गिळताना नाकाच्या दोन्ही बाजूला सौम्य दाब ठेवणे

औषधे

जर उचकी सतत किंवा गंभीर असेल आणि इतर उपचार काम करत नसतील तर डॉक्टर औषधे लिहून देऊ शकतात.
डॉक्टर वेगवेगळ्या औषधांची शिफारस करू शकतात,

  • बॅक्लोफेन (लिओरेसल), स्नायू साथी आरामदायक आहे
  • क्लोरप्रोमाझिन (लार्गाक्टिल), एक अँटीसायकोटिक औषध
  • गॅबापेंटिन (न्यूरॉनटिन), जे डॉक्टर सुरुवातीला अपस्माराच्या उपचारांसाठी वापरतात
  • हॅलोपेरिडॉल (हल्डोल), एक अँटीसायकोटिक औषध
  • मेटोक्लोप्रामाइड (रेगलान), एक औषध जे मळमळ देखील उपचार करू शकते

बऱ्याच काळ उचकी सुरुच राहिली तर नीट खाऊ न शकल्यामुळे वजन कमी होऊ शकतं. निद्रानाश व नैराश्याची लक्षणे जाणवू लागतात.

हेही वाचा : पनीरमुळे वजन वाढण्याऐवजी होईल कमी! लक्षात ठेवा या पाच टिप्स….

उचकी कशी टाळावी ?

काही ट्रिगरमुळे उचकी येऊ शकते . खालील गोष्टी टाळून लोक उचकी कमी होऊ शकते

भरभर किंवा लवकर खाणे किंवा पिणे
जास्त अल्कोहोल किंवा कार्बोनेटेड पेय पिणे
-अति मसालेदार पदार्थ खाणे
-सतत धूम्रपान
-अचानक खूप गरम गोष्टीनंतर खूप थंड पदार्थ खाऊन किंवा प्यायल्याने पोटातील तपमान एकदम बदल होतो
-सारखे च्युइंगगम खाणे

गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स रोग (जीईआरडी) ( अन्न वर येणे) सारख्या वैद्यकीय आजारामुळे कधीकधी उचकी येते. अशा प्रकरणांमध्ये, एखादी व्यक्ती त्यास कारणीभूत असलेल्या आजारावर उपचार करून उचकी कमी होऊ शकते.

हेही वाचा : ७० तास काम करण्याची शक्ती शरीरात असते का? डॉक्टर सांगतात, मेंदूला सतर्क ठेवण्यासाठी किती व कसं काम करावं? 

लहान मुलाना/ अर्भकांना उचकी लागणे

बाळांना बऱ्याचदा उचकी येते, जी त्यांच्या विकासाचा एक भाग असतो आणि सामान्यत: त्यांना त्रास देत नाही. तथापि, उचकी कधी कधी आहार आणि झोपेत व्यत्यय आणू शकते. जर आहारादरम्यान उचकी येत असेल तर बाळाची स्थिती बदलणे, बाळाला कुरवाळणे, बाळाला शांत करणे हे करावे म्हणजे उचकी बंद होईल. बाळाला वारंवार उचकी येत असेल तर डॉक्टरांशी बोलले पाहिजे.

जागतिक विक्रम आणि उचकी

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, चार्ल्स ओसबोर्न अशी व्यक्ती आहे ज्याला उचकीचा सर्वात जास्त झटका आला आहे. १९२२ ते १९९० अशी ६८ वर्षे त्याला उचकी येत होती. तथापि, जास्त काळ टिकणारी उचकी असल्यास ताबडतोब डॉक्टरला दाखवून योग्य ते औषध किंवा एंडोस्कोपी करणे आवश्यक असते. म्हणूनच उचकी लागली की आपल्या जवळच्या माणसाची आठवण काढणे योग्य पण जास्त काळ लांबल्यास ताबडतोब डॉक्टरला दाखवून योग्य ते उपचार करणे योग्य आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the reasons of hiccups occur and what is the solution on it hldc css
Show comments