चांगले आरोग्य राखण्यासाठी व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे, असा तज्ज्ञांचा आग्रह आहे. उष्ण कटिबंधीय देश असूनही, अनेक भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता दिसून येते. “भारतीयांमध्ये अजूनही व्हिटॅमिन डीची ६८ टक्के इतकी कमतरता आहे. हे केवळ शहरी भागातच नाही, तर ग्रामीण भागातही दिसून येते. यामागील कारणांमध्ये शहरीकरण, जीवनशैली, त्वचेचा रंग, ड्रेस कोड व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपली आनुवंशिक पूर्वस्थिती यांचा समावेश असतो. त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता ओळखणे आणि त्यावर मात करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच व्हिटॅमिन डीच्या कमतरतेच्या सुरुवातीच्या काही लक्षणांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे,” असे ‘हेस्टॅक ॲनालिटिक्स’च्या ग्रोथ अँड सायंटिफिक सपोर्ट प्रमुख डॉ. अपर्णा भानुशाली सांगतात.

पोषणतज्ज्ञ रुचिता बत्रा यांनी थकवा आणि अशक्तपणा, ऊर्जेची कमतरता आणि सामान्य अशक्तपणा जाणवणे हे कमतरतेचे सामान्य संकेत असल्याचे सांगितले आहे. बत्रा यांनी सांगितले, ”पुरेशी झोप घेतल्यानंतरही तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल, तर तुमच्यामध्ये व्हिटॅमिन डीच्या पातळी कमी झाली आहे.”

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास

वारंवार आजारी पडणे : व्हिटॅमिन डी निरोगी रोगप्रतिकारक शक्तीला आधार देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्हिटॅमिन डीची कमतरता तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकते; ज्यामुळे संक्रमण, सर्दी व फ्लूची बाधा होण्याचा धोका वाढतो. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल किंवा तुम्हाला आजारातून बरे होण्यासाठी त्रास होत असेल, तर ते व्हिटॅमिन डी कमी असण्याचे लक्षण असू शकते, असे बत्रा म्हणाले.

हाडे आणि स्नायू दुखणे : शरीरामधील कॅल्शियमची गरज पूर्ण करणे आणि हाडांच्या आरोग्य यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. व्हिटॅमिन डीच्या कमी पातळीमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात; ज्यामुळे हाडे दुखणे, सांधे अस्वस्थता किंवा स्नायू दुखणे, अशी लक्षणे दिसू शकतात. तुम्हाला हाडे, स्नायू किंवा सांधे यांमध्ये सतत वेदना होत असतील, तर तुमच्यामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असण्याची शक्यता आहे.

मूड बदलणे : व्हिटॅमिन डीचा मूड बदलण्याशी संबंध जोडला गेला आहे. व्हिटॅमिन डीची पातळी कमी असेल, तर ती बाब उदासीनता, चिंता किंवा सीझनल अफेक्टिव्ह डिसॉर्डर (एसएडी)साठी कारणीभूत ठरू शकते. “विशेषत: थंडीच्या महिन्यांत किंवा जेव्हा तुम्ही सूर्यप्रकाशाच्या कमी संपर्कात असाल आणि तुम्हाला तुमच्या मनःस्थितीत लक्षणीय बदल दिसले, तर ते व्हिटॅमिन डीच्या कमतरतेशी संबंधित लक्षण असू शकते,” असे बत्रा यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ”हळूहळू वजन कमी होणे हे आणखी एक संभाव्य लक्षण असू शकते.”

हेही वाचा – महिनाभर मीठ सोडल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या तज्ज्ञांकडून… 

व्हिटॅमिन डी हे अनेक चयापचय मार्गांचे केंद्रस्थान आहे आणि ती बाब मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग व हाडांची घनता (Bone Density) कमी होणे यांसारख्या रोग वा आजारांसाठीही जबाबदार आहे म्हणून ही कमतरता ओळखणे आणि त्यावर मात करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रथम व्हिटॅमिन डीच्या कमतरतेशी कोणत्याही आनुवंशिक पूर्वस्थितीचा संबंध आहे का ते ओळखावे लागेल. त्यानंतर व्हिटॅमिन डीच्या पातळीचे निरीक्षण करा. त्यावर तुम्हाला व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट घेऊन मात करता येऊ शकते. तसेच हे आवश्यक त्या प्रमाणात घेऊन व्हिटॅमिन डीची पातळी वाढवता येऊ शकते. त्याचबरोबर वैद्यकीय सल्ल्यानुसार पूरक आहाराद्वारेही हे साध्य करता येऊ शकते,” असे डॉ. भानुशाली म्हणाले.

अहमदाबाद येथील एचसीजी हॉस्पिटल्सच्या इंटरनल मेडिसिन, सीनियर कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट डॉ. मनोज विठलानी यांच्या मते, घराबाहेर वेळ घालवणे आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात राहणे फायदेशीर ठरू शकते. “व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थ जसे की फॅटी फिश, फोर्टिफाइड डेअरी उत्पादने, अंड्यातील पिवळा बलक आणि व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेतल्याने व्हिटॅमिनची कमतरता भरून काढण्यास मदत होते.”

हेही वाचा- तुम्ही तीन दिवस झोपला नाहीत, तर तुमच्या शरीर आणि मनावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या …

प्रत्येक व्यक्तीने त्यांची व्हिटॅमिन डीची पातळी नियमितपणे तपासली पाहिजे. व्हिटॅमिन डीची कमतरता किती तीव्र आहे, व्यक्तीची वैद्यकीय परिस्थिती काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण या बाबींवरच एखाद्या व्यक्तीचे पूर्ण बरे होणे अवलंबून असू शकते. पण, योग्य मार्गदर्शनाने व्हिटॅमिन डीची कमतरता लक्षणीयरीत्या भरून काढता येते आणि त्याची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. असे केल्याने संबंधित व्यक्तींना त्यांचे निरोगी आरोग्य परत मिळू शकते,” असे डॉ. विठलानी यांनी सांगितले.