हृदयविकार म्हणजे काय ?
आपल्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया हृदयाद्वारे केली जाते. अनेक धमन्यांद्वारे हे रक्त इतर अववयवांतून हृदयाकडे आणि हृदयाकडून परत इतर अवयवांकडे पोहोचविले जाते. काही कारणाने जर धमन्यांची क्षमता कमी झाली तर हा रक्तपुरवठा कमी होतो पर्यायाने त्यातील पेशींना नुकसान पोहचते आणि पेशी अकार्यक्षम होतात आणि रक्तपुरवठा खंडित होतो . आणि हृदयावर विपरीत परिणाम होतो .
हृदयविकाराचे काही प्रकार आपण जाणून घेऊ
१. उच्च रक्तदाब –
नेहमी रक्तवाहिन्यांवर रक्ताभिसरणाची संतुलित जबाबदारी असते. काही कारणाने जर धमन्यांना रक्ताचं वहन करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत असतील किंवा जोर लावावा लागत असेल तर त्यावर येणार ताण हा रक्तदाब म्हणून मोजला जातो.
रक्तदाब हा ८० ते १२० च्या दरम्याने असायला हवा. जर सलग तपासणीअंती रक्तदाब ९० ते १४० किंवा या उपर
हार्ट अटॅक : अचानक हृदयक्रिया थांबणे
कॉग्निटिव्ह हार्ट फेल्युअर : हृदयाचे रक्ताभिसरण थांबणे
अरिथमिआ : हृदयाची धडधड अचानक कमी किंवा जास्त होणे .
पेरीफेरल आर्टरी डीसीझ : हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांच्या आकार निमुळता किंवा बारीक झाल्यामुळे रक्तपुरवठा कमी होणे
स्ट्रोक : हृदयापासून मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे स्ट्रोक येतो
कंजेनायटल हार्ट डिसीज : जन्मतः हृदयाची वाढ कमी होणे.
कोणत्याही आजारासाठी सगळ्यात मोठी गोष्ट कारणीभूत असते ते म्हणजे मानसिक आरोग्य. सातत्याने केली जाणारी काळजी आणि चिंता हा माणसाच्या जीवनशैलीवर परिणाम करते आणि आहार विहार देखील बदलतो.
अनेक चिंतातुर व्यक्ती खूप वेळ बसून राहणे, अविचारी खाणे खाणे, व्यायाम न करणे, झोप न लागणे , लठ्ठपणा येणे यासारख्या विळख्यात अडकतात.
शरीराला होणाऱ्या पोषण मूल्यांचा पुरवठा हेच सगळं हृदयाच्या सहज किंवा संतुलित प्रक्रियेवर अवलंबून आहे. जर तुम्हाला कोणताही प्रकारचे शारीरिक दुखणं असेल
-पाठीचा वरचा भाग दुखणे
-अचानक मान खूप दुखणे
-सातत्याने अपचनाचा त्रास होणे
-अन्न खावेसे न वाटणे आणि दिवसभर थकवा असणे
-वारंवार उलट्या होणे ( विशेषतः उलटीमधून रक्त पडणे )
-छातीमध्ये दडपण जाणवणे असेल
ही लक्षणे तुमचं हृदय कमकुवत असण्याची लक्षणं आहेत.
याव्यतिरिक्त जीवनशैली हृदयरोगाचे मूळ आहे
-लठ्ठपणा
-कुपोषित आहार ( यात निकस आहार , अवेळी खाणे , अतिरेकी खाणे आणि अन्नत्याग या दोन्हीचा समावेश आहे )
-बैठी जीवनशैली
-आहारातील मिठाचे अतिरिक्त प्रमाण
-दारू , सिगारेट , तंबाखूचे सेवन
यासारख्या गोष्टी हृदयाच्या कार्यक्षमतेच्या आड येतात. स्वस्थ हृदयक्रियेसाठी सकस आहार , पुरेशी झोप , नियमित व्यायाम आणि मानसिक आरोग्य यांची योग्य घडण असणं आवश्यक आहे. हृदयविकाराची शक्य शक्यता जाणून घेण्यासाठी नियमित रक्त तपासणी करणे कोणतेही घरगुती उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वाढत्या वयानुसार झोप, भूक आणि दैनंदिन हालचाल कमी होत जाते अशा वेळी सकारात्मक मानसिकतेसोबत योग्य जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे. कोणतेही पदार्थ विकत घेऊन खाताना किंवा अन्नपदार्थ खरेदी करताना त्यात पोषणमूल्ये , मीठ ,साखर , वाढीक अन्नघटक यांचे प्रमाण जाणून घेणे महत्वाचे ठरते.