What are Vitamin patches: पारंपरिक पूरक आहारांसाठी व्हिटॅमिन पॅचेस एक लोकप्रिय पर्याय बनत आहेत, जे तुमच्या पोषक घटकांची पातळी वाढवण्याचा एक सोपा, वेदनारहित मार्ग असल्याचे आश्वासन देतात. हे पॅचेस त्वचेद्वारे थेट रक्तप्रवाहात जीवनसत्त्वे आणि खनिजे पोहोचवण्याचा दावा करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘व्हिटॅमिन पॅचेस’ कसे काम करतात?

सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी indianexpress.com ला सांगितले की, “व्हिटॅमिन पॅचेस ट्रान्सडर्मल डिलिव्हरी सिस्टीम वापरतात, ज्याची रचना जीवनसत्त्वे आणि पोषक घटक त्वचेद्वारे थेट रक्तप्रवाहात सोडण्यासाठी केली जाते. हे व्हिटॅमिन पॅचेस सामान्यतः चिकट असतात आणि त्यात नियंत्रित प्रमाणात पोषक घटक असतात, जे हळूहळू शोषले जातात.”

जीवनसत्त्वे त्वचेच्या बाह्य थरातून (stratum corneum) जातात आणि केशिकांमार्फत रक्तप्रवाहात पसरतात. तोंडावाटे घेतलेल्या ओरल सप्लिमेंट्सच्या विपरीत, ज्यांना गॅस्ट्रोइंटेस्टायनल (GI) ट्रॅक्ट आणि यकृत (फर्स्ट-पास मेटाबोलिझम)मधून जावे लागते. व्हिटॅमिन पॅचेस थेट रक्तप्रवाहात पोषक घटक पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवतात.

ओरल सप्लिमेंटपेक्षा व्हिटॅमिन पॅचेसचे फायदे काय?

डॉ. हिरेमठ यांच्या सूचीबद्धतेनुसार व्हिटॅमिन पॅचेसचे फायदे खालीलप्रमाणे् :

गोळ्या गिळण्याची किंवा डोस शेड्युल्स मॅनेज करण्याची आवश्यकता नाही.

पचनाच्या समस्या असलेल्या व्यक्तींसाठी : क्रोहन रोग (Crohn’s disease) किंवा गॅस्ट्रिक बायपास रुग्णांसारख्या खराब शोषण स्थिती असलेल्या लोकांसाठी योग्य.

काही तासांत पोषक तत्वांचे नियंत्रित प्रकाशन प्रदान करते, ज्यामुळे पोषक तत्वांच्या पातळीत वाढ आणि घट कमी होते.

“तथापि, त्वचेद्वारे केले जाणारे शोषण अत्यंत निवडक आणि मर्यादित प्रमाणात असते. कारण- त्वचेमधून सर्व जीवनसत्त्वे प्रभावीपणे आत प्रवेश करू शकत नाहीत, ज्यामुळे ही पद्धत कमी विश्वासार्ह ठरते,” यावर त्यांनी अधिक जोर दिला.

इतरांपेक्षा त्वचेद्वारे अधिक प्रभावीपणे शोषली जाणारी विशिष्ट जीवनसत्त्वे किंवा पोषक घटक

“व्हिटॅमिन डीसारखी जीवनसत्त्वे सूर्यप्रकाशाद्वारे त्वचेमध्ये नैसर्गिक संश्लेषणामुळे ट्रान्सडर्मल शोषणासाठी अत्यंत प्रभावी आहेत. सायनोकोबालामिन आणि मिथाइलकोबालामिन यांसारख्या लहान रेणूंसह व्हिटॅमिन बी१२ त्वचेत प्रवेश करू शकते. जरी मॅग्नेशियमच्या शोषणाचे पुरावे मर्यादित असले तरी ट्रान्सडर्मल थेरपीमध्ये मॅग्नेशियमचा सामान्यतः समावेश केला जातो.”

व्हिटॅमिन पॅचेस वापरण्याचे संभाव्य धोके किंवा दुष्परिणाम आणि घ्यावयाची खबरदारी

डॉ. हिरेमठ यांनी अधोरेखित केलेले धोके खालीलप्रमाणे :

त्वचेची जळजळ किंवा अ‍ॅलर्जीक रिअ‍ॅक्शन: पॅचेसमध्ये चिकटलेले किंवा जोडलेली रसायने (उदा. परमिशन एन्हान्सर्स) पुरळ किंवा जळजळ निर्माण करू शकतात.पॅचेसमध्ये चिकटलेले किंवा जोडलेले रसायने (उदा., परमिशन एन्हान्सर्स) पुरळ किंवा जळजळ निर्माण करू शकतात.

परिवर्तनशील शोषण : त्वचेचा प्रकार, हायड्रेशन व पॅच लोकेशन यांसारख्या घटकांमुळे पोषक घटकांचा पुरवठा विसंगत होऊ शकतो.

अति प्रमाणात सेवन : इतर पूरक आहारांसोबत पॅचेसचा गैरवापर केल्याने जास्त प्रमाणात पोषक घटकांचे सेवन होऊ शकते, जे हानिकारक असू शकते. विशेषतः ए किंवा डीसारख्या चरबीविद्रव्य जीवनसत्त्वांसाठी.

“व्हिटॅमिन पॅचेस वापरण्यापूर्वी आरोग्य सेवा प्रदात्याचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे; विशेषतः जर तुम्हाला आधीच काही आजार असतील किंवा तुम्ही औषधे घेत असाल तर. तुम्हाला त्या संबंधात अ‍ॅलर्जी नाही ना हे तपासण्यासाठी आणि तुमचे प्रॉडक्ट सुरक्षित आहे ना याची खात्री करण्यासाठी त्वचेची पॅच टेस्ट करा. याव्यतिरिक्त तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय हाय डोसचे ओरल सप्लिमेंट्स पॅचेस एकत्र करणे टाळा,” अशी शिफारस त्यांनी केली.