तेरा ते एकोणीस ही वर्ष अतिशय नाट्यपूर्ण असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात, मनात, शरीरात, विचारांमध्ये उलथा पालथ करणारी वर्ष. घरातल्या सुरक्षित वातावरणामधून बाहेर पडून जगाचा अनुभव घेण्याचा काळ. त्या बऱ्या वाईट अनुभवांच्या आधारे मतं बनवण्याचा काळ. याच काळात आजच्या जेन झी आणि जेन अल्फा पिढीच्या हातात मोबाईल आहे आणि इंटरनेटचा अमर्याद ऍक्सेस. खऱ्या आणि आभासी अशा हायब्रीड जगात या दोन्ही पिढ्या जगतायेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन जगात खूप नव्या गोष्टी त्यांना समजत असतात. ऑनलाईन जगातले अनुभव त्या मानाने मुलांसाठी, पालक आणि शिक्षक सगळ्यांसाठीच नवीन असतात. मुळात पालकांनी त्यांच्या किशोरवयात ऑनलाईन जगाचा कसलाच अनुभव घेतलेला नसल्याने त्यांचा या बाबतीतला अभ्यास कच्चा असतो. त्यामुळे अनेकदा मुलांना जे अनुभव येतायेत त्याचा अर्थ काय लावायचा हा प्रश्न मोठ्यांच्या जगात असतो. उदा. मोठ्यांच्या जगात संपर्कासाठी मोबाईल क्रमांक मागणं ही ‘नॉर्मल’ गोष्ट आहे, पण जेन झी आणि जेन अल्फा मंडळी एकमेकांची इंस्टाग्राम हॅन्डल्स मागतात. कुणीही कुणाचेही मोबाईल नंबर मागतच नाही. संवादाच्या पद्धती झपाट्याने बदलत आहेत आणि मोठ्यांच्या जगाला त्याचा पत्ता नसल्याने संवादात अनेक अडथळे निर्माण होतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा