What does your eye discolouration say about your health?: तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, डोळे म्हणजे मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार होणं ही मोठी सौंदर्य समस्या आहे. ही वर्तुळं का तयार होतात हे समजून न घेता, त्यावर फक्त काॅस्मेटिक उपाय केले जातात. पण, त्यामुळे काळ्या वर्तुळांची समस्या सुटत नाही; उलट ती आणखीनच तीव्र होते. डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण होण्यास एखादं विशिष्ट कारणच कारणीभूत असतं, असं नाही; तर काळ्या वर्तुळांच्या समस्येमागे अनेक कारणं करतात. त्यातील बरीचशी कारणं ही जीवनशैली आणि सवयींशी निगडित असतात. दरम्यान, याची कारणं आणि त्यावर उपचार कसे करावेत याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना गुजरात, डॉकट्यूबचे सदस्य डॉ. जगदीश सखिया यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. जगदीश सखिया यांच्या म्हणण्यानुसार, डोळ्यांचा रंगदेखील बदलतो आणि रंग बदलण्याची विविध कारणं असू शकतात. तसेच तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? हेदेखील जाणून घेऊ.
डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भाग गुलाबी होणे
काहींच्या डोळ्यांचा रंग थोडासा गुलाबी असतो. त्याचं कारण असं की, विषाणूजन्य संसर्ग, अॅलर्जी किंवा चिडचिडेपणामुळे असा रंग होऊ शकतो. त्यावर डॉक्टरांचा सल्ल्यानुसार उपचार घेणं गरजेचं आहे.
हिमोलेक्रिया
हिमोलेक्रिया हा एक दुर्मीळ आजार असून, त्यामध्ये रुग्णाच्या डोळ्यांतून रक्ताचे अश्रू येतात. अश्रूंमधून रक्तस्राव ही एक वैद्यकीय स्थिती आहे; ज्याला हेमोलेक्रिया म्हणतात. ही स्थिती रक्तरंजित अश्रू म्हणून ओळखली जाते. ही एक दुर्मीळ स्थिती आहे. त्यात अश्रूंचा रंग काहीसा लाल असू शकतो किंवा पूर्णपणे रक्तस्राव होऊ शकतो. जर तुम्हाला रक्तरंजित अश्रूंशिवाय इतर कोणतीही लक्षणं; जसे की डोळ्यातील अस्वस्थता किंवा वेदना जाणवत असतील, तर लगेच वैद्यकीय उपचार घ्या.
पिंग्यूक्युला किंवा टेरिगियम
पिंग्यूकुलाचे सर्वांत सामान्य व महत्त्वाचे लक्षण म्हणजे पांढऱ्या भागावर पिवळा डाग दिसणे. गंभीर प्रकरणांमध्ये तो शस्त्रक्रिया काढून टाकणे आवश्यक असू शकते.
बुबुळाचा रंग बदलणे
हेटेरोक्रोमिया म्हणजे बुबुळाचा रंग बदलणे किंवा बुबुळाच्या रंगद्रव्यावर परिणाम करणारी परिस्थिती यांसारख्या दुर्मिळ स्थिती उद्भवणे.
डोळ्यांखालील काळ्या वर्तुळावर उपचार करताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी
अनेकांमध्ये डोळ्यांखाली काळी वर्तुळं येण्यामागे आनुवंशिकता हे कारण असतं. त्यामुळे अशा स्थितीत काळी वर्तुळं पूर्णपणे घालवणं अवघड होतं. आनुवंशिकता हे कारण असल्यास ही काळी वर्तुळं थोडी पुसट करता येतात; परंतु पूर्णपणे घालवता येत नाहीत. दूध, ई जीवनसत्त्व, कॉफी व ग्रीन टी या नैसर्गिक घटकांचा वापर करून, आपण डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करू शकतो.
हेही वाचा >> आठवड्यातून एकदा दुधीचा रस प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या डॉक्टरांकडून…
उन्हापासून संरक्षण : डोळ्यांखालील भागाला सनस्क्रीन लावा किंवा सनग्लासेस घाला आणि त्यामुळे डोळ्यांचं संरक्षण होतं.
झोप आणि जीवनशैली : पुरेशी झोप आणि तणाव पातळी कमी करा. झोपेची कमतरता आणि तणावामुळे काळी वर्तुळं वाढू शकतात.