तुम्ही तुमच्या आहारात ऑलिव्ह ऑइलचे दररोज सेवन करता का आणि करत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरात काही बदल होतात का? सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे, त्यामुळे बरेच खाद्यपदार्थ बनवण्यासाठी या तेलाचा वापर होतो. तर या तेलापासून बनवलेल्या पदार्थांचा तुमच्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो, तसेच त्याचे दररोज सेवन करणे शरीरासाठी उपयुक्त ठरते का? याबाबतची सविस्तर माहिती डॉ. करण उद्देश तनुगुला, जनरल फिजिशियन आणि डॉ. सोमनाथ गुप्ता, कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट यशोदा हॉस्पिटल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली आहे, ती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर, ऑलिव्ह ऑइल हे भूमध्य सागरीय खाद्यपदार्थातील एक मुख्य पदार्थ असून ते चांगल्या आरोग्याचे प्रतीक मानले जाते. या तेलापासून तयार केलेल्या पदार्थांची चव चांगली असतेच, परंतु त्यापेक्षाही त्याचे आणखी काही आरोग्यदायी फायदे आहेत, ज्याचे तुमच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होऊ शकतात. सध्या दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे, घरोघरी तेलात तळलेले अनेक पदार्थ खायला सुरुवातदेखील केली आहे. या काळात तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरी किंवा एखाद्या मित्राच्या घरी गेलात तर तुम्हाला खाण्यासाठी दिवाळीचा फराळ दिला जातो. त्यामुळे सध्या आपण सगळेच नेहमीपेक्षा जास्त तेलयुक्त पदार्थ खात आहोत.

हेही वाचा- Pollution Effects on Older Adults : वयोवृद्धांच्या आरोग्यासाठी दिवाळीतील वाढते वायुप्रदूषण धोकादायक; अशी घ्या काळजी?

परंतु, अशा सणासुदीच्या काळात तेल आणि तूपाऐवजी दररोज ऑलिव्ह ऑइल खाणे योग्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचे उत्तर देताना डॉक्टर करण उद्देश तनुगुला, जनरल फिजिशियन, यशोदा हॉस्पिटल यांनी सांगितलं की, ऑलिव्ह ऑइल पॉलिफेनॉल आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडने (MUFA) समृद्ध आहे; तर त्याच्यातील अँटिऑक्सिडंट्स जुनाट आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात. MUFA खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यात मदत करते, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग होण्याचा धोका कमी होतो. तसेच ते हृदयाच्या चांगल्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची भूमिका बजावते.

या तेलाच्या वापरामुळे अल्झायमरसारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांच्या समस्या कमी होऊ शकतात, याबाबतचे काही पुरावेदेखील सापडले असल्याचेही त्यांनी सांगितले. तर डॉ. सोमनाथ गुप्ता, कन्सल्टंट फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट, यशोदा हॉस्पिटल यांनीदेखील ऑलिव्ह ऑइलच्या सेवनामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो या डॉ. करण उद्देश तनुगुला यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे.

हेही वाचा- Diwali 2023 : दिवाळीत फराळ बनवताना फॉलो करा ‘या’ हेल्दी टिप्स अन् बिनधास्त मारा ताव लाडू, चकली, चिवड्यावर!

सणाच्या काळात ऑलिव्ह ऑइलच्या सेवनाचे फायदे काय?

  • ऑलिव्ह ऑइल तुमच्या पदार्थांची चव वाढवते, त्यामुळे सणाच्या काळातील जेवणाची चव आणि आनंद वाढवण्यास मदत होते.
  • ऑलिव्ह ऑइल व्हिटॅमिन ईचा एक चांगला स्रोत आहे. शिवाय त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्ससारखे आवश्यक पोषकतत्व असतात, जे तुमच्या जेवणाची पौष्टिकता वाढवतात.
  • ऑलिव्ह ऑइल वापरणे हा एक आरोग्यदायी स्वयंपाक पर्याय आहे, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सक्रिय राहण्यास मदत होते.
  • सणाच्या काळात उच्च कॅलरी पदार्थ मनसोक्त खाल्ल्याने उद्भवणारा ऑक्सिडेटिव्ह तणावाचा सामना करण्यास ऑलिव्ह ऑइलमधील अँटिऑक्सिडंट्स मदत करतात.
  • ऑलिव्ह ऑइलचे दाहकविरोधी गुणधर्म पचनास मदत करतात आणि पाचन समस्या दूर करण्यास मदत करतात.

ऑलिव्ह ऑइल दररोज सेवन करण्याचे तोटे आहेत का?

डॉ. तनुगुला यांच्या मते, संतुलित आहारासोबत दररोज तीन.चार चमचे ऑलिव्ह ऑइल उपयुक्त ठरते. आवश्यक प्रमाणापेक्षा जास्त वापर कॅलरी वाढवू शकते, कारण ऑलिव्ह ऑइल हे मुळातच चरबीयुक्त आहे. तसेच काही व्यक्तींना ऑलिव्ह ऑइलची ॲलर्जी असू शकते, त्यामुळे प्रतिकूल प्रतिक्रियांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. तसेच डॉक्टर गुप्ता यांनी स्पष्ट केले की, ऑलिव्ह ऑइलचे आरोग्याला होणारे फायदे प्रामुख्याने त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असतात; तर पित्ताशयाच्या समस्या किंवा विशिष्ट आरोग्यविषयक समस्या असलेल्या लोकांनी उच्च चरबीयुक्त गुणधर्मामुळे या तेलाचे सेवन कमी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What exactly are the effects of consuming olive oil on the body during the festive season doctor says health news jap
Show comments