आपण कंबरेतून खाली वाकलो तर आपली मणक्यामधील डिस्क ‘स्लिप’ होईल. वजन उचलण, चालणं अशा गोष्टींमुळे डिस्क वर ताण येईल हे किंवा असे समज तुमचेही असतील तर आजचा लेख खास तुमच्यासाठी आहे. आपण सगळे ‘स्लिप डिस्क’ हा शब्द नेहमी वापरतो, ऐकतो आणि या शब्दासोबत येणारी भीती सुद्धा अनुभवतो. यासोबत कंबरेच्या हालचालींवर येणाऱ्या मर्यादा आपण पाळतो बऱ्याचदा त्या आवश्यकही असतात. पण हे सगळं करत असताना ही डिस्क म्हणजे दोन मणक्यांमधील गादी नक्की कसं काम करते, तिची रचना नेमकी कशी आहे आणि पाठीच्या कण्यात या डिस्कचं असण का महत्वाचं आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे.

इंटरव्हर्टेब्रल डिस्क म्हणजेच मणक्यांमधील गादी तीन प्रमुख घटकांनी तयार होते. पहिला भाग म्हणजे ‘केंद्र’ ज्याला न्यूक्लियस पलपोसीस असं म्हणतात, हा भाग एखाद्या जेली प्रमाणे असतो. डिस्कची बहुतेक शॉक शोषण्याची क्षमता हे प्रदान करते. न्यूक्लियस पलपोसीसच्या बाहेरच्या बाहेरच्या बाजूने अन्यूलस फायब्रोसिस नावाचा प्रामुख्याने टाइप वन प्रकारच्या कोलॅजनने तयार झालेला थर असतो. तिसरा आणि सगळ्यात वरचा भाग म्हणजे वर्टेबरल एंड प्लेट (Vertebral End प्लेट), या प्लेट वरच्या आणि खालच्या बाजूने डिस्कला पुरेपूर आधार देतात. हे तीनही भाग कमी अधिक प्रमाणात पाणी, प्रोटीओग्लायकेनस आणि कोलॅजन यापासून तयार झालेले असतात. हे पदार्थ डिस्क ला ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तर मदत करतातच शिवाय डिस्कवर येणारा भारही कमी करतात.

Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा

हेही वाचा… Health Special: फास्टफूड खा पण पौष्टिक असं!

निरोगी डिस्कमध्ये पाणी, प्रोटीओग्लायकेनस आणि कोलॅजन मुबलक प्रमाणात असतात आणि म्हणून डिस्क तिची कार्ये विनासायास पार पाडत असते.

आता डिस्क ची कार्ये कोणती ते पाहू…

१. वजन उचलणं, धावणं, कंबरेतून वळणं, कंबरेतून खाली वाकून गोष्टी उचलणं, कंबरेतून मागे वाकण, उड्या मारणं, चालणं, हसणं, खोकणं इतकच काय मोठ्याने श्वास घेणं यापैकी एक किंवा अनेक क्रिया एकदम होतात तेव्हा आपल्या पोटातल्या प्रेशरमध्ये वाढ होते, शिवाय कंबरेच्या मणक्यांवरही विशिष्ट प्रकारचा ताण येतो. हा ताण आणि पोटातलं वाढलेले प्रेशर सक्षमपणे पेलण्याचं काम इंटरव्हर्टेब्रल डिस्क करते (या क्रिया आपण आयुष्यभर अव्याहतपणे करत असतो, यावरून संपूर्ण आयुष्यात इंटरव्हर्टेब्रल डिस्कवर येणाऱ्या ताणाची कल्पना आपण करू शकतो, साहजिकच हा ताण क्रिया किती तीव्रतेने आणि वेगाने केली जाते यावरही अवलंबून असतो.)

२. इंटरव्हर्टेब्रल डिस्क दोन मणक्याना वेगळं करते, त्यामुळे दोन मणके एकमेकांवर आणि एकत्रितपणे जास्त चांगल्या प्रकारे हालचाल करू शकतात. (डिस्कशिवाय मणके एकमेकांच्या अगदी जवळ येतील आणि त्यांच्या जागाच न राहिल्यामुळे हालचाल सुलभपणे होणार नाही)

३. तिसरं आणि महत्वाचं कार्य म्हणजे पाठीच्या कण्यावर येणार ताण एक मणक्यामधून दुसऱ्याकडे ट्रान्सफर करणं आणि ह्याच कार्यास अनुसरून मानेच्या आणि कंबरेच्या डिस्क आकाराने वेगळ्या आहेत. कंबरेवर येणार ताण लक्षात घेता तिथल्या डिस्कचा आकार मानेच्या डिस्कपेक्षा मोठा आहे. आकाराने लहान डिस्क या मानेची हालचालीची गरज अधोरेखित करतात. तर मोठ्या डिस्क कंबरेची वजन पेलण्याची आणि हालचलीची आशा दोन्ही गरजा अधोरेखित करतात.

डिस्कमध्ये होणारे बदल वय,अनुवंकशिकता, कामाचं स्वरूप, जीवनशैली, वजन, आहार, अपघात, झोप, मानसिक स्थिती इतर आजार या आणि अशा अनेक गोष्टी डिस्कचं आरोग्य ठरवत असतात. याबद्दल जाणून घेऊया पुढच्या लेखात…