“जेवताना एक घास ३२ वेळा चावून खाल्ला पाहिजे” असे म्हणतात, जेणेकरून घास नीट चावला जाईल आणि पुढील पचनक्रिया सुलभ होईल. पण, घास चावताना आपण कोणत्या बाजूने चावतो हे देखील महत्त्वाचे ठरते आहे. तुम्ही जेवताना तोंडातील घास एका बाजूने चावता की दोन्ही बाजूने? प्रश्न ऐकायला विचित्र वाटेल, पण तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हे मान्य करा की, आपण सर्व जण जेवताना फक्त एका बाजूने घास चावतो. हे सोपे, आरामदायक आणि नैसर्गिक वाटते; मग त्यात बदल का करावा? दंतचिकित्सक (Dentists) या सवयीबाबत चेतावणी देतात की, “घास तोंडात टाकल्यानंतर तो एका बाजूने चावल्यास विविध समस्या उद्भवू शकतात.”

प्रतिमपुरा येथील क्राउन हब डेंटल क्लिनिकमधील एमडीएस (प्रोस्टोडोन्टिस्ट), बीडीएस, डॉ. नियती अरोरा याबाबत सांगतात की, “मी कोणालाही एकाच बाजूने अन्न खाण्याचा सल्ला कधीही देणार नाही. हे सामान्य शारीरिक हालचालींच्या विरुद्ध आहे, जेथे जबड्याच्या दोन्ही बाजू घास चावण्यासाठी सममितीने कार्य करतात.”

Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
winter healthy recipe in marathi mulyachi bhaji recipe how to prepare radish vegetable in winter
मुळ्याची भाजी न आवडणाऱ्यांसाठी अशी बनवाल तर नक्की खातील; जाणून घ्या पौष्टिक भाजीची सोपी रेसिपी
Carrot is beneficial for body how to make gajar ki kanji recipe in marathi
हिवाळ्यात सगळ्यात भारी, निरोगी, आणि चवदार गाजर कांजी! पिढ्यानपिढ्या बनवली जाणारी खास रेसिपी
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती

तोंडातील घास फक्त एकाच बाजूने चावला तर काय होईल? (What happens if the grass in the mouth is bitten on only one side?)

“सर्वप्रथम, तुम्ही जास्त वापरत असलेल्या बाजूच्या दातांची झीज झाल्याचे तुमच्या लक्षात येईल. ज्या बाजूचा वापर केला जात नाही, तो अधिक कॅल्क्युलस आणि टार्टर जमा करू शकतो. यामुळे हिरड्या बधीर होतात आणि जीवाणूंच्या वाढीसाठी योग्य वातावरण निर्माण होऊ शकते, परिणामी संसर्ग होऊ शकतो”, असे अरोरा यांनी स्पष्ट केले

अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, “ज्या बाजूने घास चावतो त्या बाजूचे स्नायू हे घास चावत नसलेल्या बाजूच्या स्नायूंपेक्षा जास्त विकसित होतील, ज्यामुळे चेहर्‍याचा आकार बदलू शकतो. यामुळे टेम्पोरोमँडिबुलर (टीएमजे) जॉइंटचा असमान आकार होतो. हे असेच चालू राहिल्यास, तोंड उघडताना आणि बंद करताना रुग्णांना कानाजवळ वेदना होऊ शकतात किंवा सांधेमध्ये क्लिकचा आवाज येऊ शकतो,” असेही अरोरा म्हणाल्या.

अरोरा यांच्या मते, “घास चावताना एका बाजूला अस्वस्थता किंवा वेदना जाणवत असेल तर अनेकदा दुसऱ्या बाजूने घास चावण्याची सवय लावते.” अशा स्थितीमध्ये आपल्या दातांची काळजी घेण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी दंतचिकित्सकाचा सल्ला घेण्याची शिफारस अरोरा यांनी केली.

हेही वाचा – झोपेतून उठताच आणि वर्कआऊटच्या आधी दोन ग्लास पाणी प्यायल्यास वजन कमी होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा….

उत्तम मौखिक आरोग्यासाठी योग्य प्रकारे घास चावण्याची प्रक्रिया (Ideal chewing process for better oral health)

“घास खाण्याच्या योग्य प्रक्रियेमध्ये तोंडाच्या दोन्ही बाजूने घास चावला गेला पाहिजे आणि हळूहळू आणि पूर्णपणे चावणेदेखील महत्त्वाचे आहे. घास चावताना दोन्ही जबड्याच्या बाजूंमध्ये समान रीतीने घास चावल्याने दातांवर जास्त ताण आणि झीज टाळण्यास मदत होते. हळूहळू आणि पूर्णपणे घास चावल्याने अन्नाचे लहान तुकडे होतात, ज्यामुळे केवळ पचनच होत नाही तर जबड्यांवरील ताणही कमी होतो,” असे अरोरा यांनी सांगितले.

अरोरा यांनी पेन्सिल, पेन किंवा बर्फ यांसारख्या वस्तू वापरू नये असा सल्ला दिला, कारण या सवयींमुळे दात खराब होऊ शकतात आणि कदाचित फ्रॅक्चर होऊ शकतात, ज्याची दुरुस्ती करणे कठीण आहे.

हेही वाचा – पावसाळ्यात श्वसनाचे आजार का वाढतात? त्यापासून संरक्षण कसे करावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या….

तुमच्या चावण्याच्या पद्धतीचा पचनावर परिणाम होतो का? (Does the way you chew impact digestion)

“होय, चघळणे ही पचनाची पहिली पायरी आहे आणि जर आपण ते योग्य प्रकारे केले नाही तर संपूर्ण प्रक्रियेला त्रास होऊ शकतो,” असे अरोरा म्हणाले. अयोग्य पद्धतीने घास चावणे म्हणजे अन्न व्यवस्थित चावले जात नाही.

“जेव्हा हे व्यवस्थित न चावलेले अन्न पोटात जाते, तेव्हा ते पचवण्यासाठी पाचक रस आणि ॲसिडस् यांना अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे पोषक तत्वांचे शोषण कमी होणे, पोटदुखी आणि फुगणे अशा समस्या होऊ शकतात,” असे अरोरा म्हणाले.