Side Effects Of Using Nasal Spray : आपल्यातील अनेकांना आइस्क्रीम किंवा एखादे थंड पेय किंवा अगदी थंड पाणी जरी प्यायलो तरी महिन्यातून एकदा तरी सर्दी होतेच. त्यामुळे सतत होणाऱ्या सर्दीमुळे कंटाळून आपण सगळेच डॉक्टरकडे जाण्यास नकार देतो आणि क्रोसिन, विक्स, वाफ घेणे वा स्प्रेचा सर्वाधिक वापर करतो. नाकाची एक बाजू सर्दीमुळे बंद पडणे किंवा सततच्या अॅलर्जीपासून आराम मिळविण्यासाठी ‘नेझल स्प्रे’ (Nasal sprays) बहुतेकदा एक उत्तम उपाय ठरतो. त्यांच्या जलद, लक्ष्यित क्रियेमुळे (targeted action) अनेकांसाठी तो एक सोईस्कर पर्याय ठरतो. पण, जर हे निरुपद्रवी दिसणारे द्रावण जास्त प्रमाणात वापरले तर काय होईल? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही… तर त्याचे उत्तर तुम्हाला आश्चर्यचकित करेल एवढे तर नक्की…
दी इंडियन एक्स्प्रेसने याचे उत्तर शोधून काढण्यासाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील कन्सल्टंट ईएनटी सर्जन डॉक्टर शमा कोवळे (Shama Kovale) यांच्याशी चर्चा केली. त्यांनी स्पष्ट केले की, नेझल स्प्रे वेगवेगळ्या प्रकारांत येतात आणि प्रत्येकाचे विशिष्ट उपयोगसुद्धा असतात जसे की,
१. डिकॉन्जेस्टंट स्प्रे (Decongestant Sprays)
डिकॉन्जेस्टंट स्प्रेमध्ये झायलोमेटाझोलिन किंवा ऑक्सिमेटाझोलिन यांसारखे ॲक्टिव्ह साहित्य किंवा सक्रिय घटक (active ingredients) असतात. ते नाकाच्या मार्गातील सुजलेल्या रक्तवाहिन्या आकुंचित करून कार्य करतात, ज्यामुळे रक्तसंचयातून जवळजवळ त्वरित आराम मिळतो.
२. सलाईन स्प्रे (Saline Sprays)
सलाईन स्प्रे सर्वांत सुरक्षित आहे आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय नाकाच्या पोकळीत क्रस्टिंग (crusting) रोखण्यास तो मदत करतो.
३. कॉर्टिकोस्टेरॉईड स्प्रे (Corticosteroid Sprays)
प्रामुख्याने अॅलर्जीक राईनायटिससारख्या आजारांसाठी वापरले जाणारे हे स्प्रे जळजळ कमी करतात आणि अॅलर्जीची लक्षणे प्रभावीपणे व्यवस्थापित करतात.
नेझल स्प्रेच्या (Nasal Sprays) अतिवापराचे धोके…
नेझल स्प्रेमुळे तत्काळ आराम मिळत असला तरीही डॉक्टर शमा कोवळे म्हणतात की, या स्प्रेच्या अतिवापरामुळे अनपेक्षित दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात.
१. रिबाउंड कंजेशन (राइनायटिस मेडिकामेंटोसा) : { Rebound Congestion (Rhinitis Medicamentosa) }
नेझल स्प्रेचा जास्त वापर केल्याने पुन्हा रक्तसंचय होऊ शकतो. ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा नाकाचे मार्ग उघडे राहण्यासाठी स्प्रेवर अवलंबून राहतात, ज्यामुळे वापराचे दुष्टचक्र सुरू होते आणि परिस्थिती आणखी बिकट होत जाते.
२. अवलंबून राहणे (Dependency)
डिकॉन्जेस्टंट स्प्रेचा वारंवार आणि दीर्घकाळ वापर केल्याने मानसिक किंवा शारीरिक अवलंबित्व निर्माण होऊ शकते, ज्यामुळे स्प्रेशिवाय श्वास घेणे कठीण होऊ शकते.
३. कोरडेपणा आणि रक्तस्राव (Dryness and Bleeding)
कॉर्टिकोस्टेरॉईड आणि डिकंजेस्टंट स्प्रे दोन्ही जास्त वापरल्यास, नाकाचा आतील भाग कोरडा होऊ शकतो, ज्यामुळे जळजळ आणि कधी कधी रक्तस्रावसुद्धा होतो.
४. कॉर्टिकोस्टिरॉईड्स स्प्रेचे दीर्घकालीन धोके (Long-term Risks of Corticosteroids)
कॉर्टिकोस्टेरॉईड स्प्रेचा दीर्घकाळ वापर केल्याने कधी कधी विशेषतः महिलांना रजोनिवृत्तीनंतर ऑस्टिओपोरोसिससारखे दुष्परिणाम होऊ शकतात. (ऑस्टिओपोरोसिस- बाधित हाडांची घनता व मजबूती कमी झाल्याचे दर्शवतो)
नेझल स्प्रे (Nasal Sprays) कोणी टाळावा वा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावा ?
खालील नमूद केलेल्या लोकांनी नेझल स्प्रे वापरणे टाळावे किंवा काळजीपूर्वक वापरावा…
१. गरोदर किंवा स्तनपान देणाऱ्या महिला (Pregnant or Lactating Women)
या काळात सुरक्षिततेची नेहमीच हमी दिली जात नाही म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच उपयोगी ठरेल.
२. सहा वर्षांखालील मुले (Children Under 6 Years)
सहा वर्षांखालील मुलांना वैद्यकीय व्यावसायिकाच्या देखरेखीशिवाय वापरण्याची शिफारस केली जात नाही.
३. काचबिंदू (ग्लुकोमा) किंवा उच्च रक्तदाब असलेले लोक (People with Glaucoma or High Blood Pressure)
कंजेस्टंट फवारण्यामुळे ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
नेझल स्प्रे (Nasal Sprays) वापरण्याच्या टिप्स
१. शिफारस केल्यानुसार स्प्रेचा वापर करा (Stick to Recommended Dosages)
बहुतेक कंजेस्टंट स्प्रे सलग तीन ते पाच दिवसांपेक्षा जास्त काळ वापरू नयेत.
२. तज्ज्ञांचा सल्ला घ्या (Consult a Specialist)
ईएनटी तज्ज्ञ सुरक्षित पर्याय किंवा दीर्घकालीन उपचार योजनांची शिफारस करू शकतात.
३. सलाईन स्प्रे वापरा (Use Saline Sprays)
जर तुम्हाला सुरक्षित, दैनंदिन पर्याय हवा असेल, तर सलाईन स्प्रे हा एक उत्तम पर्याय आहे.