Understanding Sunscreens: मेकअप करण्यापूर्वी किंवा नंतर सनस्क्रीन लावल्यास काही फरक पडत नाही.पिगमेंटेशन हा शब्द आणि त्रास आता सर्वत्र कॉमन झाला आहे. अगदी घराच्या घरी बसून लॅपटॉपवर काम करत असताना स्किनच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आजवर तुम्ही असंख्य जाहिराती व तज्ज्ञांकडून हे ऐकले असेल तुम्ही कधीही चेहरा धुतल्यावर चेहऱ्याला सर्वात आधी सन स्क्रीन चोपडायला हवेच. पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही जर लॅपटॉप समोर बसून काम करणार असाल तर तुम्हाला सनस्क्रीनची सर्वात जास्त गरज भासू शकते.आता तुम्ही म्हणाल लॅपटॉप समोर आपला प्रत्यक्ष सूर्याशी संपर्क येतच नाही, राहिला प्रश्न धुळीचा तर तेवढी स्वच्छता आपण घरात किंवा ऑफिसमध्येही बाळगतोच मग सनस्क्रीनची काय गरज? तुमच्या याच शंकेचं निरसन आता आपण तज्ज्ञांकडून करून घेणारआहोत .

डॉ डी एम महाजन, त्वचा तज्ज्ञ, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स, यांच्या माहितीनुसार, सनस्क्रीन केवळ एक सौंदर्यप्रसाधन किंवा त्वचेचा काळसरपणा कमी करण्याची क्रीम नाही. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला सनबर्न, किरणोत्सर्गाच्या हानिकारक प्रभावापासून वाचवते ज्यामुळे त्वचेचा कर्करोग आणि अकाली वृद्धत्व याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. आपण दोन प्रकारच्या अतिनील किरणांच्या संपर्कात असतो. अल्ट्राव्हायोलेट A (UVA) चा विस्तार जास्त असतो व त्याचा प्रभाव त्वचेच्या वृद्धत्वाशी संबंधित आहे. अल्ट्राव्हायोलेट बी (UVB) ची तरंगलांबी कमी असते. हे त्वचेची जळजळ आणि टॅनिंगशी संबंधित आहे जर तुम्ही तुमच्या शरीराच्या सर्व उघड्या भागांना एकसमान सनस्क्रीन लावले नाही, तेही दर दोन तासांनी, तर तुम्ही अजिबात सनस्क्रीन न लावल्यावर जितका धोका होऊ शकतो तितकाच धोका तुम्हाला असेल.

hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
shivali parab mother emotional after seeing the look of Mangla movie
‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?

सनस्क्रीनबद्दलचा आपला गैरसमज हा आहे की आपल्याला ते फक्त उन्हात जाताना लावणे आवश्यक आहे. आपल्याला घरातील वातावरणातही त्याची गरज आहे. उपकरणासमोर दीर्घकाळ काम करत असलेल्या व्यक्तींची त्वचा सहज ८ ते १० टक्के रेडिएशन शोषून घेते. अगदी LED लाईट्स कोणताही फ्लोरोसेंट लाइट, हा रेडिएशनचा स्रोत आहे. जुने एडिसन बल्ब हे रेडिएशनचे सर्वात कमी स्त्रोत आहेत.

SPF म्हणजे काय? (What SPF Shall I Buy)

सनस्क्रीनचा महत्त्वाचा घटक, SPF म्हणजे काय? सन प्रोटेक्शन फॅक्टर (SPF) ही सनस्क्रीनची UVA आणि UVB किरणांच्या विशिष्ट भागापासून संरक्षण करण्याची क्षमता आहे. सहसा, ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही घरी असाल तर तुम्हाला किमान SPF 30 वापरायला हवे, घराबाहेर जाणार असाल तर SPF 60 किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. तसेच दर दोन तासांनी सनस्क्रीन लावा, त्याआधी चेहरा धुवून पुसून घेणे उत्तम. तुम्ही तुमच्या हातात दहा रुपयांच्या नाण्याच्या आकारात सनस्क्रीन घेऊन हाताची मूव्हमेंट वरच्या बाजूने करत क्रीम लावायला हवी

सनस्क्रीन घेताना काय तपासावे? (How To Buy Good Sunscreen)

जर तुम्हाला झिंक ऑक्साईड आणि टायटॅनियम डायऑक्साइड हे घटक दिसले तर ते उत्तम सनस्क्रीन आहे. जर लेबलवर एव्होबेन्झोन, ऑक्सीबेन्झोन, टिनोसॉर्ब आणि असे लिहिलेले असेल तर ते रासायनिक सनस्क्रीन आहे. मिनरल सनस्क्रीन लावून कधीकधी त्वचा पांढरी पडू शकते पण ते निरोगी आहे.त्यावर मेकअप किंवा इतर स्किनकेअर सोल्यूशन्सच्या वर देखील सहजपणे लागू केले जाऊ शकत. मेकअप करण्यापूर्वी किंवा नंतर सनस्क्रीन लावल्यास काही फरक पडत नाही.रासायनिक सनस्क्रीन शरीराद्वारे शोषून घेण्यास वेळ लागू शकतो.

पावसाळ्यात तुम्हाला सनस्क्रीनची गरज आहे का?

ऋतू कोणताही असो सनस्क्रीन लावणे महत्त्वाचे आहे. ढग सूर्याच्या काही किरणांना रोखू शकतात, तरीही अतिनील किरणे त्यांच्यामधून आत प्रवेश करू शकतात आणि १०० नसली तरी ८० ते ८५ टक्के तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचू शकतात. काही अभ्यासांनी असे म्हटले आहे की ढगांचे आवरण अतिनील किरणांना विस्कळीत करून आणि अधिक तीव्र बनवू शकते. याच कारणास्तव, पूलमध्ये जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे खूप महत्त्वाचे आहे.

तुम्हाला सनस्क्रीनसाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असू शकते. संवेदनशील त्वचा असल्यास फक्त तज्ज्ञांनी शिफारस केलेली क्रीम वापरा. याशिवाय त्वचेच्या नुकसानासाठी या सायलेंट ट्रिगर्सबद्दल देखील माहित असणे आवश्यक आहे. परफ्यूम सूर्यप्रकाश शोषून घेतात, म्हणून बाहेर पडण्यापूर्वी त्याचा वापर नीट करायला हवा

Story img Loader